सीएसआरची लक्ष केन्द्रित करण्याची मुख्य क्षेत्रे

उच्च शिक्षणाचा प्रसार : स्कॉलरशिप कार्यक्रम

२०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये, एमएमएफएसएल ने ग्रामीण भागातील युवक उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळविण्यासाठी सक्षम व्हावा यासाठी स्कॉलरशिप योजना सुरू केली. या योजनेची माहिती खालील प्रमाणे :

 • उद्दीष्ट : एमएमएफएसएल च्या स्कॉलरशिप योजनेचा उद्देश पदवीपूर्व आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण पूर्ण करता यावे हा आहे. भारतातील जवळपास सर्व राज्यांतील महाविद्यालतील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना रु. २५,०००/- आणि पदवीपूर्व विद्यार्थ्यांना रु. १०,००० स्कॉलरशिप देऊ केली.

 • उपक्रमाचा कालावधी: जुलै ते जानेवारी

 • लाभार्थी:भारताच्या ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबातील गुणवान विद्यार्थांना ही स्कॉलरशिप दिली जाते. दरवर्षी २ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना एमएमएफएसएलने लक्ष्य केले.

- प्रत्यक्ष लाभार्थी: पदवीपूर्व आणि पदव्युत्तर विद्यार्थी.

- अप्रत्यक्ष लाभार्थी: विद्यार्थ्यांची कुटुंबे

 • लाभार्थी ची एकंदर संख्या : महिन्द्रा फायनान्स स्कॉलरशिप कार्यक्रमाने ८७०० पेक्षा जास्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांचे उच्चशिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित केले.

 • उपक्रमाचे स्थान:महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, ओरिसा, पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, कर्नाटक, गुजरात आणि राजस्थान.

हुन्नर: कौशल्य बांधणी आणि व्यावसायिक प्रशिक्षणाला चालना देणे

युवकांना अर्थव्यवस्थेशी निगडीत कौशल्याचे प्रशिक्षण देणार्‍या उपक्रमास एमएमएफएसएल मदत करते. विद्यार्थ्यांना शिकविल्या गेलेल्या मोड्यूल मधील आशय निश्चित करण्यात एमएमएफएसएल ने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 

 • उद्दीष्ट: या उपक्रमात काम-प्रशिक्षण-नेमणूक (Hire-Train-Deploy) या एचटीडी मॉडेलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बेरोजगार सुशिक्षीत युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना या क्षेत्रातील प्रवेश–स्तरावरील रोजगार शोधण्यास सक्षम बनविणे हा हेतू आहे.

 • प्रकल्पाचा कालावधी: जुलै ते जानेवारी

 • लाभार्थी :

  - प्रत्यक्ष लाभार्थी : रोजगार कमविण्याची इच्छा असलेले ग्रामीण भारतातील अकुशल युवक.

  - अप्रत्यक्ष लाभार्थी : युवकांचा समाज आणि कुटुंबे.

 • लाभार्थी ची एकत्रित संख्या : २२०० पेक्षा अधिक बेरोजगार, अकुशल युवकांना अर्थव्यवस्थेचे प्रशिक्षण मिळाले. त्यापैकी ११२२ प्रमाणित होते आणि ६०० पेक्षा जास्त युवकांनी बीएफएसआय इंडस्ट्रीत प्रवेश-स्तरावरील नोकरी मिळवली.

 • ठिकाणे: उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि पंजाब.

हुन्नर: महिलांसाठी उपजीविकेचे प्रशिक्षण

२०१५-१६ मध्ये एमएमएफएसएल ने एका वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाला मदत केली, जो दुर्लक्षित कुटुंबातील अकुशल महिलांवर लक्ष केन्द्रित करून त्यांना व्यावसायिक चालक बनण्यास सक्षम बनवतो. या उपक्रमाबद्दलची अधिक माहिती खालील प्रमाणे:

 • उद्दीष्ट: महिला सबलीकरण उपक्रम हे महिला पारंपारिक पद्धतीने करीत आलेल्या जसे की स्वयंपाक, शिवणकाम, इत्यादी कामाशी निगडीत असतात. एमएमएफएसएल ने एक असा उपक्रम हाती घ्यायचे ठरविले जो महिलांना अपारंपारिक मार्गाने उपजीविकेच्या साधनांचे ज्ञान देतो, जो त्यांना उपलब्ध असलेल्या संधींची व्याप्ती वाढवतो आणि त्यांना रोजगारक्षम बनवतो. एमएमएफएसएल “महिला सबलीकरण” हा त्याच्या धोरणाचा एक महत्त्वपूर्ण मुद्दा मानतो आणि म्हणून या कारणास प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी असोसिएशन फॉर नोन- ट्रॅडिशनल एम्प्लॉयमेंट फॉर विमेन (ANEW) आणि आझाद फाऊंडेशन या दोन एनजीओ च्या माध्यमातून करण्यात आली.

 • उपक्रमाचा कालावधी: जानेवारी ते डिसेंबर

 • लाभार्थी :

  - प्रत्यक्ष लाभार्थी : कमकुवत उत्पन्न – स्त्रोताची पार्श्वभूमी असलेल्या आणि ज्यांची साक्षरता पातळी अल्प आहे अशा महिलांना चालक ट्रेनिंग दिले जाते.

  - अप्रत्यक्ष लाभार्थी : अशा महिलांची कुटुंबे तसेच त्या राहत असलेला समाज.

 • लाभार्थ्यांची एकत्रित संख्या: ४५० पेक्षा जास्त महिलांनी प्रशिक्षणासाठी नांवनोंदणी केली. त्यांपैकी, २१० महिलांनी वाहन चालविण्याचा स्थायी परवाना मिळवला आणि ११० महिला व्यावसायिक चालक म्हणून कार्यरत आहेत.

 • ठिकाण: मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू

हुन्नर: दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींचे कौशल्य प्रशिक्षण(पीडब्ल्यूडी)

एमएमएफएसएल ने सार्थक एज्युकेशन ट्रस्ट बरोबरच्या संयुक्त विद्यमाने भोपाल, मध्य प्रदेश येथे दिव्यांगत्व असलेल्या युवकांसाठी कौशल्य आधारावर प्रशिक्षण केंद्र सुरू केले ज्यात विविध तर्‍हेची, नेतृत्व, सामाजिक, संवाद, संगणक आणि मूलभूत जीवन कौशल्ये यांसहित, वैशिष्ट्यपूर्ण कौशल्ये बांधणीचा समावेश होता.

३ महिन्यांचा हा प्रशिक्षण कार्यक्रम १८ ते ३० या वयोगटातील युवकांना तीन ठळक भागात दिला जातो – माहिती तंत्रज्ञान, पर्यटन आणि आदरातिथ्य, संघटीत रिटेल आणि बँकिंग आणि आर्थिक साक्षरता.

प्रशिक्षण कार्यक्रम संपूर्ण झाल्यानंतर, समर्पित रोजगार टीम रोजगार मेळावे, रोजगार मोहिमा, मुलाखतीची मोहीम इत्यादींचे आयोजन करुन सहभागी युवकांना वेगवेगळ्या क्षेत्रात जसे की पर्यटन आणि आदरातिथ्य, संघटीत रिटेल आणि माहिती तंत्रज्ञान नोकरी मिळेल हे सुनिश्चित करते.

 • उद्दीष्ट: रोजगार अधोरेखीत करण्याच्या मोहिमांचे आयोजन करुन आणि उमेदवारांना कामासाठी सक्षम आणि कुशल बनवून विविध उद्योगधंद्यात दिव्यांग असलेल्या लोकांची फळी तयार करुन त्यांच्यासाठी मागणी निर्माण करणे.

 • उपक्रमाचा कालावधी: सप्टेंबर ते ऑक्टोबर

 • लाभार्थी :

  - प्रत्यक्ष लाभार्थी : ग्रामीण भागातील रोजगार मिळवू इच्छिणारे दिव्यांग.

  - अप्रत्यक्ष लाभार्थी : दिव्यांगांची कुटुंबे आणि समाज.

 • लाभार्थी ची एकंदर संख्या: सुमारे २०० दिव्यांगांना प्रशिक्षण दिले आणि ९२ उमेदवारांना रोजगार मिळाला.

 • ठिकाण: भोपाळ, मध्य प्रदेश

आर्थिक साक्षतेचा प्रसार करणे : कॅशलेस व्हा.

एमएमएफएसएल ने स्थानिक भाषेत पत्रके, पोस्टर्स यांसारख्या माहिती सामग्रीचे वाटप केले तसेच पत्रक वाटप करण्यापूर्वी पोस्टर्स प्रदर्शित करण्यापूर्वी त्यांतील आशय समजून सांगितला.

 • उद्दीष्ट: ग्रामीण भागातील जनतेची अर्थव्यवस्थेपर्यन्त योग्य पोहोच ही रोजगाराची, आर्थिक वाढीची आणि गरीबी कमी करण्याची मुख्य आवश्यकता आहे. नोटबंदीने लोकांच्या बँक / रोख व्यवहार करण्याची पद्धत कॅशलेस / स्मार्ट मनी रोख व्यवहारावर स्वीकार करण्याकडे बदलली आहे. म्हणूनच, व्यवहाराच्या विविध कॅशलेस पद्धतींवर व्यक्तींना संवेदनशील करण्यासाठी आर्थिक व्यवहार करण्यासाठी कॅशलेस पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे.

 • लाभार्थी :

  - प्रत्यक्ष लाभार्थी : निम शहरातील लोक आणि ग्रामीण समाज.

  - अप्रयक्ष लाभार्थी : ग्राहक, पुरवठादार, व्हेंडर्स, भागीदार आणि कर्मचारी यांसारखे भागधारक.

 • लाभार्थीची एकंदर संख्या: एमएमएफएसएल ने ७ राज्यांमध्ये कॅशलेस व्हा हा उपक्रम राबविला.

 • ठिकाणे: महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू, आंध्र प्रदेश

शैक्षणिक पायाभूत सुविधा मजबूत करणे : ज्ञानदीप – नगरपालिका शाळांना भेट

नगरपालिका शाळांच्या मूलभूत आवश्यकतांवर लक्ष केंद्रीत करून त्यांत सुधार करण्यासाठी एमएमएफएसएल ने पुढाकार घेतला आहे. नगरपालिका शाळा शिक्षण देणाऱ्या प्राथमिक संस्था असल्याने, उच्च शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांना मजबूत करणे गरजेचे आहे. एमएमएफएसएल च्या कर्मचार्‍यांनी नगर पालिका शाळांना भेटी देऊन तेथे स्कूल बॅग्स, पाण्याच्या टाक्या, बेड शीट्स, ब्लॅंकेट, ऊबदार कपडे, शैक्षणिक साहित्य, वॉटर प्युरिफायर, मिठाईचे बॉक्स, आणि इतर आवश्यक वस्तूंचे वाटप केले. तसेच तेथे त्यांनी मुलांसाठी खेळ, चित्रकला स्पर्धा इत्यादींचे आयोजन केले.

 • उद्दीष्ट: वंचित मुलांना शिक्षण पुरविणार्‍या शाळांच्या मूलभूत गरजांचे बळकटीकरण करण्यास मदत करणे हा एमएमएफएसएल चा उद्देश आहे. समाजातील दुर्बल आणि वंचित घटकाला गुणवत्तापूर्ण शिक्षणापर्यंत येण्यापासून रोखणार्‍या समस्यांबद्दल आपल्या कर्मचार्‍यांना सचेत करणे या एमएमएफएसएल चा या उपक्रमामागील हेतू आहे.

 • उपक्रमाचा कालावधी: प्रत्येक वर्षी जून ते जानेवारी

 • लाभार्थी : नगरपालिका किंवा जिल्हा परिषदांच्या शाळा यांसारख्या सरकारी अनुदान असणार्‍या किंवा एनजीओ द्वारे चालविल्या जाणार्‍या शाळांना भेटींचे आयोजन करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता.

 • लाभार्थी ची एकंदर संख्या: एमएमएफएसएल १९,५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली.

 • ठिकाण: संपूर्ण भारत

आरोग्य तपासणी शिबिरे

एमएमएफएसएलने समाजातील वंचित घटकांसाठी भारतभर मधुमेह, अस्थिसुषीरता आणि डोळ्यांची तपासणी यांसाठी निदान आणि उपचार करून घेण्यासाठी विनामूल्य आरोग्य शिबिरे आयोजित केली आणि अशा ठिकाणी तपासणीनंतर गरज असेल तसा औषधांचा पुरवठा केला. अत्यंत उच्च पात्रतेच्या व अनुभवी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या गटाने हे शिबीर आयोजित केले.

 • उद्दीष्ट: एमएमएफएसएलने हाती घेतलेल्या आरोग्यसेवा शिबिरांचा उद्देश ग्रामीण भागातील जनतेला गुणवत्तापूर्ण, आरोग्यसेवा विनामूल्य उपलब्ध करून देणे हा होता.

 • उपक्रमाचा कालावधी: दरवर्षी जून ते जानेवारी

 • लाभार्थी:

  - प्रत्यक्ष लाभार्थी: मधुमेह, अस्थिसुषीरता (ओस्टिओपोरोसिस), डोळ्यांचे विकार इत्यादी यांनी त्रस्त असलेली ग्रामीण भागांतील जनता.

  - अप्रत्यक्ष लाभार्थी: या रोगांनी ग्रस्त असलेला समाज आणि त्यांची कुटुंबे.

 • लाभार्थींची एकंदर संख्या: एमएमएफएसएल 15,000 लाभार्थी पर्यंत पोचलेली आहे.

 • ठिकाण: संपूर्ण भारत

मागील चार वर्षांपासून एमएमएफएसएल लाईफलाईन एक्सप्रेस ह्या अनोख्या प्रोजेक्टला  पाठबळ देत आहे, ज्यात देशातील दुर्गम जिल्ह्यात रेल्वेद्वारे वैद्यकीय सेवा पुरवली जाते. लाईफलाईन एक्सप्रेस ग्रामीण भागात शारीरिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींना उत्तम दर्जाची सुविधा पुरवते. जिथे अशा सुविधा अत्यंत मर्यादित होत्या आणि दर्जा खालावला होता. अपंगांना ह्या सुविधेनुसार क्लेफ्ट लीप, कान, डोळे, अपस्मार, दाताचे व्यंग इत्यादी शस्त्रक्रिया करून दिल्या जातात.

 • उद्दिष्ट : ग्रामीण भागात मूलभूत सुविधा कमी असल्यामुळे जुनाट अपंगत्वापासून सुटका देणारी सोपी शस्त्रक्रिया होत नव्हती. लाइफटाइम एक्सप्रेसने ह्या समस्येवर लक्ष दिले. शारीरिक अपंग असणाऱ्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक आणि वैद्यकीय सेवा पुरवल्या.

 • प्रोजेक्टचा कालावधी: आर्थिक वर्षात १ महिना

 • लाभार्थी :

  - थेट लाभार्थी : ग्रामीण लोकांना शास्त्रक्रियेसारखे वैद्यकीय उपचार मिळवणे अत्यंत कठीण आहे.

  -अप्रत्यक्ष लाभार्थी : ज्या कुटुंबाना अपंगत्वामुळे शस्त्रक्रिया आवश्यक आहे 

 • लाभार्थींची एकंदर संख्या : मागील तीन लाइफटाइम एक्सप्रेस प्रोजेक्टद्वारे एमएमएफएसएल २०,३०० पेक्षा जास्त लाभार्थींपर्यंत पोहोचली. त्यापैकी अनेकजणांना दृष्टिदोष, ऐकू न येणे, क्लेफ्ट लीप, दाताच्या समस्या, अपस्मार ह्या आजारांवर उपचार मिळाले तर सर्वायकल कॅन्सरवरही उपचार मिळाले.

 • ठिकाण: महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेशh

जीवनदान : रक्तदान शिबीरजीवनदान,

रक्तदान हा महिन्द्रा फायनान्सच्या सर्वात मोठ्या कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम आहे. दर वर्षी, फायनान्स सर्विसेस सेक्टर (एफएसएस ) साठी संस्थापन दिन हा एफएसएस सीएसआर दिवस म्हणूनही साजरा केला जातो. महिन्द्रा फायनान्स आपल्या कार्यालयात राष्ट्रीय स्तरावर रक्तदान शिबिरे चालवते.

 • उद्दिष्टय: गरजुंना, खासकरून ग्रामीण भारतातील लोकांना रक्त उपलब्ध व्हावं म्हणून रक्तदान शिबीर आयोजित केलं जातं. तसेच, एमएमएफएसएल कर्मचाऱ्यांना ग्रामीण भारतातील समस्यांची जाण करून दिली जाते आणि ग्रामीण लोकांना परिस्थितीला तोंड देण्यासाठी मदत केली जाते.

 • उपक्रमाचा कालावधी: ऑक्टोबरचा पहिला आठवडा

 • लाभार्थी:

  - प्रत्यक्ष लाभार्थी : ग्रामीण भागातील ब्लड बॅंक्स, ज्यांना सहजपणे रक्त उपलब्ध होत नाही.

  - अप्रत्यक्ष लाभार्थी : ग्रामीण समाज, ज्यांना रक्तदानाचा लाभ सहजपणे होत नाही.

 • एकंदर लाभार्थींची संख्या: ह्या उपक्रमातून 15,528 युनिट रक्त दान केले जाते. ह्या कार्यक्रमात  26,782 कार्यकर्ते भाग घेतात.

 • ठिकाण: संपूर्ण भारत

रुग्णवाहिका दान करण्याचा उपक्रम

ग्रामीण भागातील हॉस्पिटलांमध्ये वैद्यकीय सेवा अधिक सुलभतेने मिळावी यासाठी एमएमएफएसए ने आ. व. 2014-15 पासून या भागांत रुग्णवाहिका दान करण्याचा उपक्रम हाती घेतला.

 • उद्देश: हॉस्पिटलांना रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि आणीबाणीच्या परिस्थितीत वैद्यकीय सेवा सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णवाहिका दान करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला.

 • उपक्रमाचा कालावधी: जुलै ते डिसेंबर

 • लाभार्थी:

  - प्रत्यक्ष लाभार्थी: ग्रामीण भागांतील हॉस्पिटल्स / स्वयंसेवी संस्था ज्या गरीब आणि दुर्बल घटकांतील जनतेची सेवा करतात आणि त्यांना कमी खर्चात वैद्यकीय उपचार पुरवितात.

  - अप्रत्यक्ष लाभार्थी: परवडणार्‍या दरात वैद्यकीय सेवांची गरज असलेले समुदाय.

 • लाभार्थींची एकंदर संख्या: आतापर्यंत संपूर्ण भारतात विविध स्वयंसेवी संस्थांना 47 रुग्णवाहिकांचे वाटप करण्यात आलेले आहे आणि या उपक्रमाचा लाभ 1,11,500 हून अधिक लाभार्थीना झालेला आहे.

 • ठिकाण: महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, राजस्थान, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश.

वैद्यकीय उपकरणे दान देण्याचा उपक्रम

देशातील गरीब आणि वंचित घटकांची वैद्यकीय सेवा करणार्‍या बहुतांश हॉस्पिटल्समध्ये अत्यल्प वैद्यकीय पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. महिन्द्रा  फायनान्सने आ. व. 2015-16 मध्ये वैद्यकीय उपकरणे दान देण्याचा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमाच्या माध्यमातून एमएमएफएसएल भारतीय कुटुंब नियोजन संस्थेच्या प्रादेशिक शाखांना मोठी भांडवली उपकरणे जसे की यूएसजी मशीन्स, स्त्रीरोग चिकित्सेसाठी घडी घालता येणारा टेबल, कोल्पोस्कोप इत्यादी भेट देत असते. अशी दान केलेली उपकरणे एकाच ठिकाणी रुग्णांना उपलब्ध असलेल्या अनुदानित सुविधांची संख्या वाढवून इस्पितळांमध्ये बदल घडवून आणतात.

आम्ही थिंक फाउंडेशनला ग्रामीण भागातील सुस्थापित रक्तपेढ्यांमध्ये आवश्यक त्या पायाभूत सुविधा खरेदी करून थॅलेसेमिया डे केअर केंद्र उभारण्यासाठी आर्थिक मदत देखील करतो. या व्यतिरिक्त आम्ही विद्यमान केंद्रांतील थॅलेसेमियाने ग्रस्त मुलांची हिमोग्लोबीनची योग्य पातळी राखण्यास मदत करण्यासाठी त्यांना औषधे जसे की लोहयुक्त गोळ्यांचा पुरवठा करतो. ग्रामीण भागांत स्थापन झालेली डे केअर सेंटर्स लाभार्थींना नियमितपणे योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देऊन त्यांचे मनोबल वाढवतात ज्यासाठी कधी कधी लाभार्थींना येथे असलेल्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागत असे. या प्रकल्पामुळे अशा मुलांची जगण्याची शक्यता बालवयातील 6 वर्षांपेक्षा अधिक होत आहे.

 • उद्देश: ग्रामीण भागातील वैद्यकीय पायाभूत सुविधा सशक्त करणे आणि ग्रामीण जनसमुदायासाठी गुणवत्तापूर्ण वैद्यकीयसेवा उपलब्ध करून देणे.

 • उपक्रमाचा कालावधी: जानेवारी ते डिसेंबर

 • लाभार्थी:

  - प्रत्यक्ष लाभार्थी: ग्रामीण भागातील लोक ज्यांना मूलभूत वैद्यकीय सेवा मिळत नाही.

  - अप्रत्यक्ष लाभार्थी: या उपकरणांद्वारे मूलभूत वैद्यकीय सेवा मिळणार्‍यांची कुटुंबे.

 • लाभार्थींची एकंदर संख्या: आतापर्यंत, वैद्यकीय उपकरणे दान देण्याचा दोन्ही उपक्रमांतून 3,00,000 व्यक्तींना लाभ मिळालेला आहे.

 • ठिकाण: हरियाणा, झारखंड, ओरिसा, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, तामिळ नाडू, कर्नाटक, केरळ, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, गुजरात.

आई आणि मुलाच्या आरोग्याचा प्रकल्प (एमसीएच)

एमएमएफएसएल आणि एफपीए इंडिया एकत्र येऊन पोषण पुरवठा करून माता आणि मुलाचे आरोग्य सुधारण्याचं काम करतात. हे काम सिंघभूममधील अत्यंत गरज असलेल्या ३० गावांमध्ये, पालघर/भिवंडी आणि झारखंडमधील भुबनेश्वर, महाराष्ट्र आणि ओरिसा मध्ये चालते.

 • उद्दिष्ट्य : गरीब आणि वंचित समाजातील पौगंड अवस्थेतील मुली, गरोदर माता, दूध पाजणारी आई आणि पाच वर्षाखालील मुले ह्यांना आरोग्य आणि पोषणद्वारे चांगलं आरोग्य दिल जातं. ज्यामुळे माता आणि मुलांचा मृत्युदर कमी होतो आणि कुपोषण थांबून त्यांची जीवनशैली सुधारते.

 • प्रकल्पाचा कालावधी ऑगस्ट ते सप्टेंबर 

 • लाभार्थी:

  - प्रत्यक्ष लाभार्थी : ह्या प्रकल्पात 15000 गरोदर आणि दूध पाजणाऱ्या माता, ६ वर्षाखालील 18000 मुले, पौगंड अवस्थेतील 15000 मुली आणि मुलांची तपासणी केली जाते. दोन वर्षात तीन लाख लोकांना माता आणि मुलाच्या आरोग्याबद्दल जागरूक केले जाते.

  - अप्रत्यक्ष लाभार्थी: प्रत्यक्ष लाभार्थींच्या कुटुंबातील सदस्य

 • लाभार्थींची एकंदर संख्या:11,263 पेक्षा जास्त माणसे; ज्यापैकी प्रकल्पात 9,569 (78.17%)  लोकांची तपासणी झाली आणि त्यांना एमसीएच सेवा प्राप्त झाली. 

 • ठिकाण: झारखंड, महाराष्ट्र आणि ओरिसा

स्वच्छ भारत अभियान: स्वच्छता मोहीम

पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी भारत स्वच्छ करण्याच्या उद्देशाने 2 ऑक्टोबर, 2014 रोजी राजघाट, नवी दिल्ली येथे स्वच्छ भारत मोहिम सुरू केली. 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत सर्वांना प्रसाधनगृह, घन आणि द्रव कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची प्रणाली यांसारख्या स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच प्रत्येक घराला स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पुरविणे आणि गावाची एकंदरीत स्वच्छता करणे हे या अभियानाचे लक्ष्य आहे, आणि तीच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना त्यांच्या 150 व्या जन्मदिनी एक योग्य श्रद्धांजली असेल. मा. पंतप्रधान स्वतः हे अभियान यशस्वी होण्यासाठी सक्रीय पुढाकार घेत आहेत हे अतिशय उल्लेखनीय आहे; त्यांनी स्वतः राजघाट येथे रस्ता स्वच्छ करून या अभियानास सुरुवात केली. तथापि, हे ही स्पष्ट करण्यात आलेले आहे की, हे अभियान यशस्वी करणे फक्त सरकारचेच कर्तव्य नाही, तर स्वच्छ भारत या अभिनव मोहिमेचे लक्ष्य साध्य करण्यासाठी देशाचा प्रत्येक नागरीक आपले घर, आपला गाव, आपले शहर आणि परिणामे संपूर्ण देश स्वच्छ ठेवण्यासाठी तितकाच जबाबदार आहे.

 • उद्देश:

  - आपल्या वर्तणूकीत बदल करून लोकांना आरोग्यदायी स्वच्छताविषयक सवयींबद्दल जागरूक करणे.

  - लोकसमूहाच्या स्तरावरच कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था पुरविणे.

 • उपक्रमाचा कालावधी: जून ते जानेवारी

 • ठिकाण: संपूर्ण भारत

हरियाली प्रकल्प: वृक्षारोपण क्रिया

पर्यावरणाचे रक्षण व्हावे या उद्देशाने एमएमएफएसएल वृक्षारोपण हा उपक्रम हाती घेत आलेली आहे. महाविद्यालये / शाळा / अनाथालय यांच्या परिसरांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले जेथे समाजाला जबाबदारीचे भान येऊन ते रोपण केलेल्या रोपट्यांची काळजी घेऊन त्यांना वाढवतील.

 • उद्देश: ग्रामीण आणि शहरी भागांतील क्षेत्रावर वृक्षारोपण करून आणि हिरवीगार वनराई बनविण्यास मदत करून मोठ्या प्रमाणात होत असलेली जंगलतोड थांबविण्याची एमएमएफएसएलची योजना आहे. देशाला भेडसावणार्‍या पर्यावरणविषयक समस्यांबद्दल जागरूकता आपल्या कर्मचार्‍यांमध्ये निर्माण होण्यास चालना मिळावी म्हणून त्यांना एमएमएफएसएलच्या या मोहिमेत सक्रियपणे सामावून घेणे हा एमएमएफएसएलचा मानस आहे.

 • लाभार्थी: शाळा, शासन आणि जनसमुदाय.

 • उपक्रमाचा कालावधी: दरवर्षी जून ते डिसेंबर

 • लाभार्थींची एकंदर संख्या: एमएमएफएसएलच्या कर्मचार्‍यांनी 6,58,000 रोपांचे रोपण केलेले आहे.

 • उपक्रमाचे ठिकाण: संपूर्ण भारत

समांतर: वृद्ध, दिव्यांग आणि अनाथ यांना मदत करणे

एमएमएफएसएल, समाजातील दुर्लक्षित आणि वंचित घटकांना आधार देण्यासाठी पुढाकार घेणे हे महत्वाचे मानते.

अ) अनाथाश्रम / वृद्धाश्रम / दिव्यांगांच्या केंद्रांना भेट
एमएमएफएसएल ने त्यांच्या कर्मचार्‍यांसाठी अनाथालय, वृद्धाश्रम आणि दिव्यांगांसाठीची केंद्रे यांना भेटी आयोजित केल्या होत्या. अशा वेगवेगळ्या गटांना अशा भेटी देण्यामागील उद्देश त्यांच्याबरोबर पुरेसा वेळ घालवून त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्यांचे मनोबल वाढवणे तसेच त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करून त्यांना आधार देणे हा आहे. एखाद्या संस्थेला भेट देण्याचे ठरविण्यापूर्वी एमएमएफएसएलच्या क्षेत्रीय सीएसआर (CSR) संघाने त्या संस्थेचे आवश्यक ते मूल्यांकन केले.

 • उद्देश: अनाथालय, वृद्धाश्रम आणि दिव्यांगांसाठींची केंद्रे येथील मूलभूत सुविधा अधिक बळकट करण्यास मदत करावी या उद्देशाने एमएमएफएसएल ने हा उपक्रम हाती घेतलेला आहे. तसेच, समाजाने नेहमीच दुर्लक्षित केलेले अनाथ, वृद्ध आणि दिव्यांगांना ज्या समस्यांना सामोरे जावे लागते त्यांप्रती आपल्या कर्मचार्‍यांनी संवेदनशील राहावे हा देखील या उपक्रमाचा उद्देश आहे.

 • उपक्रमाचा कालावधी: जून ते जानेवारी

 • लाभार्थी: समाजातील दुर्लक्षित वर्गाला आधार देऊन वृद्ध, अनाथ आणि दिव्यांग यांच्या बरोबर काम करण्याचा एमएमएफएसएलचा मानस आहे.

 • लाभार्थींची एकंदर संख्या: एमएमएफएसएल 4466 मुले आणि 1290 वृद्धांपर्यंत पोहोचली आहे.

 • ठिकाण: संपूर्ण भारत

संपर्कात रहाण्यासाठी

महिन्द्रा अँड महिन्द्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड
चौथा मजला, महिन्द्रा टॉवर्स,
डॉ.जी.एम. भोसले मार्ग,
पी.के. कुर्णे चौक, वरळी,
मुंबई 400 018.

इथे क्लिक करा सर्वात जवळील महिन्द्रा फायनान्स शाखा शोधण्यासाठी

Calculate Your EMI

 • Diverse loan offerings
 • Less documenation
 • Quick processing
Loan Amount
Tenure In Months
Rate of Interest %
Principal: 75 %
Interest Payable: 25 %

For illustration purpose only

Total Amount Payable

50000