Facebook

निधीचे वाटप

आमच्या म्युच्युअल फंड वाटप चमूने आपले काम सप्टेंबर २००५ मध्ये सुरू केले व तेव्हापासून हे काम देशाच्या कानाकोपऱ्यात पसरले आहे. आपल्या सर्वांना एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सर्व पर्याय व योजना प्राप्त करून देण्यासाठी हा सर्व प्रयत्न आहे.

जेव्हा गुंतवणुकीचा प्रश्न येतो, तेव्हा प्रत्येकाची आर्थिक उद्दिष्टे व जोखीम क्षमतेनुसार प्रत्येकाच्या विशिष्ट गरजा असतात. गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असले तरीही दीर्घ पल्ल्यामध्ये समभागातील गुंतवणूक इतरांपेक्षा नेहमीच जास्त लाभ मिळवून देते. त्यामुळेच समभागांमध्ये पद्धतशीर गुंतवणूक केल्यास आपल्या गुंतविलेल्या पैशांना कमाल परतावा मिळेल व कमी वेळात आपल्यासाठी जास्त संपत्ती निर्माण होऊ शकेल .

मात्र समभागामध्ये गुंतवणूक करताना बाजाराची उत्तम समज व असंख्य गुंतागुंतींची व्यवस्थित समज असावी लागते. इथे आमचे कौशल्य आम्ही पणाला लावतो. आमच्या सल्लागारांना आपल्या गुंतवणुकीची उद्दिष्टे व जोखीम घेण्याच्या क्षमतेची जाणीव आहे. आपल्या विशिष्ट गरजांच्या नुसार आपण गुंतवलेले पैसे योग्य त्या योजनांमध्ये वाटप करतात. अशा पद्धतीने आपण निश्चिन्त राहून आपल्या गुंतवणुकीची वाढ होताना पाहाल.

जोखीम कागदपत्रे

 • वैशिष्ट्ये आणि फायदे
 • पात्रता आणि दस्तऐवज
 • शंकासमाधान

वैशिष्ट्ये आणि फायदे

 • समभाग म्युच्युअल फंड : मुख्यतः समभाग व समभागाशी संबंधित रोख्यांमध्ये गुंतवणूक
 • क्षेत्रीय निधी : हे विशिष्ट क्षेत्रामध्येच गुंतवणूक करतात म्हणून तांत्रिकदृष्ट्या ह्यांना विषयनिष्ठ निधी म्हणून ओळखले जाते.
 • निर्देशांक निधी : विनिमय बाजारांमध्ये व्यापार केल्या जाणाऱ्या समभागांमध्ये गुंतवणूक.
 • निधींचा निधी : उत्तम कामगिरी करणाऱ्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक
 • करबचत केन्द्री म्युच्युअल फंड : कलम ८० क चे लाभ घेण्यासाठी. इथे गुंतवलेली रक्कम तीन वर्ष गुंतवून ठेवावी लागते, काढता येत नाही
 • कर्ज म्युच्युअल फंड : ठराविक उत्पन्न देणाऱ्या / सरकारशी संबंधित संलेखांमध्ये गुंतवणूक
 • मासिक उत्पन्न निधी : ह्यामध्ये मासिक लाभांश गुंतवणूकदाराला प्रदान करण्यात येतो
 • रोखता निधी : उच्च रोख तरलता असलेल्या रोख बाजारातील निधीमध्ये गुंतवणूक
 • तरल दर असलेले अल्पमुदती निधी : दोन महिने ते तीन वर्ष मुदत असणाऱ्या कर्ज रोख्यांमध्ये, रोख बाजारातील व तरल दर संलेखांमध्ये गुंतवणूक
 • सुवर्ण शीर्ष निधी : सरकारशी संबंधित रोख्यांमध्ये गुंतवणूक
 • ठराविक मुदतपूर्ती योजना : मुदतपूर्ती कालावधीपर्यंत ठराविक परतावा
 • सुवर्ण विनिमय व्यापार निधी : मुख्यतः सुवर्ण वायदे समभागांमध्ये गुंतवणूक
 • नवीन निधींचे देकार : रु १० दर्शनी मूल्याने विविध निधींनी सुरू केलेले निधी

जोखीम कागदपत्रे

पात्रता आणि दस्तऐवज

 • ज्यांना म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यात स्वारस्य आहे अशांनी गुंतवणूक करावी किंवा करण्यास सुरुवात करावी.
 • केवायसी दस्तऐवज : स्वतः साक्षांकित केलेला पॅन (PAN) कार्ड, स्वतःचे छायाचित्र व पत्त्याच्या पुराव्यासह रीतसर स्वाक्षरीत केवायसी अर्ज

शुल्क व भार

महिन्द्रा फायनान्सकडून कोणतेही प्रशासकीय व गुंतवणूक सल्ला शुल्क व भार आकारले जात नाहीत. मात्र भारतीय रोखे विनिमय मंडळाच्या (सेबी) विनियमानुसार म्युच्युअल फंड योजनेनुसार गुंतवणूकदारांना प्रत्येक गुंतवणुकीसाठी प्रवेश / गमन भार अदा करावा लागेल

जोखीम कागदपत्रे

शंकासमाधान

मी म्युच्युअल फंडात गुंतवणूक कशी करू शकतो व त्याची प्रक्रिया काय आहे ? +
योजनेची पूर्वीची कामगिरी कशी आहे, हे मला कसे समजेल? +
माझ्या गुंतवणुकीची अद्ययावत एनएव्ही मी कशी पाहू शकेन ? +
उत्तम कामगिरी करणाऱ्या निधींची मला कुठे माहिती मिळू शकेल ? +
माझ्या गुंतवणुकीचे रोखीकरण मी कसे करू शकतो ? +
निधी व्यवस्थापक कोण आहे, हे मला कसे कळेल? तसेच त्याची पूर्वीची कामगिरी कशी आहे, हे मला कसे कळेल?+
माझ्या म्युचुअल फंडामधील गुंतवणुकीच्या कामगिरीची मला कशी माहिती मिळेल ? +
मला माझ्या गुंतवणूकीचे रोखीकरण कसे करता येईल? +
मला माझी पद्धतशीर गुंतवणूक योजनेची रक्कम (SIP) व एकरकमी गुंतवणूक रक्कम कमी/जास्त करता येते का किंवा दुसरीकडे स्थलांतरित करता येते का? +
बँक खात्याचा तपशील व नामनिर्देशन तपशिलात मी कसा बदल करू शकेन? +
माझ्या गुंतवणुकीच्या लाभांश प्रदानाच्या नोंदी मला कशा मिळतील? +
माझा पत्ता व संपर्क तपशील मी कसा बदलू शकतो ? +

BIRLA COMMON APPLICATION FORM

BIRLA MULITPAL SIP AUTO DEBIT FORM

BIRLA Application Form STP SWP

BIRLA COMMON TRANSLISP

आमच्याशी संपर्क साधा

प्रमुख कार्यालय

महिन्द्रा अँड महिन्द्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड
दुसरा मजला, साधना हाउस,
महिन्द्रा टॉवरच्या पाठीमागे
५७० पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी
मुंबई,
महाराष्ट्र ४०० ०१८ भारत

ईमेल आयडी: [email protected]

टोल फ्री नंबर .:1800 233 5678

संपर्कात रहाण्यासाठी

महिन्द्रा अँड महिन्द्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड
चौथा मजला, महिन्द्रा टॉवर्स,
डॉ.जी.एम. भोसले मार्ग,
पी.के. कुर्णे चौक, वरळी,
मुंबई 400 018.

इमेल पत्ता: [email protected]

टोल फ्री क्रमांक:
1800 233 1234 (सोम – शनि, सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत)

व्हॉट्सअ‍ॅप नंबर: +91 7066331234

इथे क्लिक करा सर्वात जवळील महिन्द्रा फायनान्स

Calculate Your EMI

 • Diverse loan offerings
 • Less documenation
 • Quick processing
Loan Amount
Tenure In Months
Rate of Interest %
Principal: 75 %
Interest Payable: 25 %

For illustration purpose only

Total Amount Payable

50000

वर
fraud DetectionFraud Advisory MF - Whatsapp ServiceWhatsApp