सहयोगी कंपन्या

महिन्द्रा फायनान्समध्ये आमचा दृष्टीकोन हा ग्राहकाच्या गरजा आमच्या प्रत्येक कृतीच्या गाभ्याशी ठेवण्याचा असतो. ह्यामुळेच आम्हाला आमचा परिवार विस्तारित करण्याची आणि उत्तम सेवेद्वारे ग्राहकांना मूल्यवर्धित सेवा देण्याची प्रेरणा मिळते. इथे महिन्द्रा इन्शुरन्स ब्रोकर्स लिमिटेड व महिन्द्रा रुरल हौसिंग फायनान्स लिमिटेड ह्या आमच्या दोन यशस्वी उपक्रमांविषयी माहिती दिली आहे. आमच्या सतत वाढणाऱ्या परिवाराचे ते एक अविभाज्य भाग आहेत आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे.

Brokers

आपण अशा काळात राहत आहोत, जिथे उद्याच्या अनिश्चिततेपासून सुरक्षित राहणे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. हीच गरज लक्षात घेऊन, महिंद्रा इन्शुरन्स ब्रोकर्स लि. (MIBL) ही आमची उपकंपनी आमच्या विविध प्रकारच्या ग्राहकांच्या वैविध्यपूर्ण गरजा आणि रिस्क प्रोफाईल्सनुसार खास तयार केलेल्या इन्शुरन्ससंबंधी परिपूर्ण सेवा पुरविते. सुमारे १३ लाख रिटेल ग्राहकांना इन्शुरन्स ब्रोकींगसंदर्भात थेट सेवा पुरविणे, तसेच खूप मोठ्या संख्येने कॉर्पोरेट ग्राहकांसोबत काम करणे, यासोबतच लाईफ आणि नॉन-लाईफ इन्शुरन्स प्रकारांमध्ये अनेक प्रकारचे प्लॅनदेखील या कंपनीकडून पुरविले जातात.

अत्यंत तपशीलवार आणि पद्धतशीर मार्गाने आपल्या ग्राहकांच्या इन्शुरन्ससंबंधी गरजा व त्यांचे रिस्क प्रोफाईल समजून घेऊन त्यांना मूल्यवर्धित सेवा पुरविण्यासाठी MIBL बांधील आहे. यामुळे अधिक नावीन्यपूर्ण, खर्चाचा पूरेपूर मोबदला देणारे व प्रत्येकाच्या गरजेनुसार इन्शुरन्स सोल्युशन्स आखण्यास मदत होते. तसेच ही कंपनी गुणवत्तेची सर्वोच्च पातळी राखण्यात कोणतीही तडजोड करीत नसल्याचा पुरावा म्हणजे, क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम्ससाठीचे प्रतिष्ठित आयएसओ 9001:2008 मानांकन मिळवणाऱ्या भारतातील काही थोड्याच इन्शुरन्स ब्रोकींग कंपन्यांपैकी ही एक आहे.

MIBL ला इन्शुरन्स रेग्युलेटरी ऐन्ड डेव्हलपमेंट ऑथोरिटी (IRDA) यांच्याकडून मे २००४ मध्ये डायरेक्ट ब्रोकरचे लायसन्स प्राप्त झाले, ज्यामुळे लाईफ व नॉन-लाईफ क्षेत्रांमध्ये थेट इन्शुरन्स ब्रोकींग सेवा पुरविणे शक्य झाले. यासोबतच, ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार सेवांची आखणी करून देण्याचे आपले वचन पाळण्याच्या दृष्टीने MIBL ने विविध सार्वजनिक व खाजगी इन्शुरन्स कंपन्यांच्या पॅनेलमध्ये स्वतःचा समावेश करून घेतला आहे. सप्टेंबर २०११ मध्ये, MIBL ला IRDA कडून कम्पोझिट ब्रोकर लायसन्स मंजूर झाले, आणि त्यामुळे कंपनीने डायरेक्ट ब्रोकींगसोबतच रिइन्शुरन्स ब्रोकींग व्यवसायातही प्रवेश केला. संपूर्ण इन्शुरन्स रिस्क सोल्युशन्स पुरविणारी कंपनी या नात्याने MIBL ग्राहकांच्या रिस्क मॅनेजमेंट पोर्टफोलिओमध्येही महत्त्वाची भूमिका बजावते.

आमचे ध्येय (व्हिजन):

“२०१५ पर्यंत भारतातील पहिल्या क्रमांकाचे उत्पन्न कमावणारी इन्शुरन्स ब्रोकर कंपनी बनणे.”"

धोरणात्मक भागीदारी (पार्टनरशिप)

सप्टेंबर २०१२ मध्ये महिंद्रा इन्शुरन्स ब्रोकर्स लिमिटेड (MIBL) यांनी इन्क्लुजन रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेड (IRPL) या सिंगापूरमध्ये स्थापन करण्यात आलेल्या लीपफ्रॉग फायनान्शियल इन्क्लुजन फंडच्या उपकंपनीसोबत, तसेच महिंद्रा ऐन्ड महिन्द्रा फायनान्शियल सर्व्हीसेस लिमिटेड (MMFSL) या आपल्या पालक कंपनीसोबत डेफिनिटीव्ह ऐग्रीमेंट केले असून, यामुळे भारतातील ग्रामीण व निम-शहरी भागांमधील ग्राहकांपर्यंत कंपनीच्या सेवा घेऊन जाण्यास मदत झाली, तसेच IRPL च्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्ञानाचा व अनुभवाचा, विशेषतः मोठ्या प्रमाणावर इन्शुरन्स सेवा पुरविताना कमी खर्चाच्या टेक्नॉलॉजी सोल्युशन्सचा वापर करण्यासाठी उपयोग करून घेता आला. त्यासोबतच IRPL च्या जागतिक स्तरावरील रिइन्शुरन्स क्षेत्रातील तज्ञ असण्याचा व इतर कंपन्यांशी असलेल्या संबंधांचा विचार करता, कंपनीला रिइन्शुरन्स ब्रोकींग व्यवसायात सहाय्यभूत ठरेल अशा प्रकारे IRPL कडून कंपनीला जागतिक स्तरावरील विविध रिइन्शुरन्स कंपन्यांशी संबंध जोडण्यास मदत होऊ शकेल.

आशिया आणि आफ्रिका येथील इन्शुरन्सपासून वंचित राहिलेल्या लोकांना इन्शुरन्स सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारी लीपफ्रॉग फायनान्शियल इन्क्लुजन फंड ही पहिली आणि सर्वात मोठी कंपनी असून इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन (IFC), युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक (EIB), KfW डेव्हलपमेंट बँक, जर्मनी, एफएमओ डेव्हलपमेंट बँक ऑफ दी नेदरलँड्स, असे या कंपनीतील गुंतवणूकदार आहेत. लीपफ्रॉग फायनान्शियल इन्क्लुजन फंड यांचा मोठ्या प्रमाणावरील (मास मार्केट) इन्शुरन्सवर विशेष भर असून, “नेक्स्ट बिलियन” उगवत्या बाजारपेठेतील ग्राहकांना इन्शुरन्स सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांमध्ये ते गुंतवणूक करतात. लीपफ्रॉग फायनान्शियल इन्क्लुजन फंड हे दोन प्रकारे प्रवाहापासून वेगळे ठरतात, पहिले म्हणजे सामाजिक परिवर्तन आणि दुसरे म्हणजे इन्शुरन्स या दोन्हीवर त्यांचे असलेले लक्ष.

Yउपरोक्त व्यवहारासाठी तुमच्या कंपनीला इन्शुरन्स रेग्युलेटरी ऐन्ड डेव्हलपमेंट ऑथोरिटी आणि फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड, तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया यांच्याकडून आवश्यक मंजुरी प्राप्त झालेली आहे.

वरील बाबींसोबत, MIBL ही आता MMFSL ची ८५% उपकंपनी (सब्सिडिअरी) झाली आहे. IRPL ने MIBL मध्ये १५% इतके समभाग घेतले आहेत.

housing

तुम्ही ज्याला घर म्हणू शकता अशी जागा निर्माण करण्यासाठी संपूर्ण आयुष्य लागू शकते. तुमच्या स्वप्नातील घरापर्यंतच्या प्रवासाचे अंतर थोडेसे कमी करणे हा महिंद्रा रूरल हाऊसिंग फायनान्स लि. (MRHFL) यांचा हेतु आहे.

MRHFL या भारतातील सर्वांत मोठ्या ग्रामीण गृहनिर्माण वित्तपुरवठा कंपनीच्या स्थापनेमागील उद्देश म्हणजे किफायतशीर व लवचिक पद्धतीने गृहकर्ज उपलब्ध करून ग्रामीण आणि निम-शहरी भागातील चित्र बदलून टाकणे. मग घराचे बांधकाम करायचे असेल, खरेदी करायची असेल, त्यामध्ये वाढ (विस्तार) किंवा सुधारणा करायची असेल, अशा घरासंबंधी असलेल्या बहुतांश वित्तीय गरजांसाठी MRHFL कर्ज पुरवठा करते. आज कंपनी १ लाखापेक्षा जास्त ग्राहकांना यशस्वीरित्या सेवा पुरवीत असून, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, बिहार, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळ अशा राज्यांमधून १७,५०० पेक्षा जास्त गावांमध्ये त्यांचे कामकाज चालते.

खरं तर, ग्रामीण भारतातील काही महत्त्वपूर्ण बदलांसाठी MRHFL जबाबदार ठरले आहेत. कागदपत्रांच्या अभावी दुर्गम भागातील लोकांना प्रस्थापित वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळण्याची शक्यता फारच कमी असते. आणि स्थानिक पातळीवरील सावकारांकडून कर्ज घेणे फारच महागात पडते. अशा परिस्थितीत, MRHFL महत्त्वाची भूमिका बजावत कमीत कमी कागदपत्रांच्या आधारे परवडणाऱ्या गृहकर्जांचा पुरवठा करते.

कंपनीने मातीच्या अनेक कच्च्या व अस्थिर बांधकामांचे रुपांतर वीट बांधकामाच्या पक्क्या घरांमध्ये करण्यास, तसेच घरांमधील सिमेंटच्या जमिनी बदलून फरशी बसविण्यास मदत केली आहे. थोडक्यात, झोपड्यांचे रूपांतर घरांमध्ये आणि स्वप्नांचे रुपांतर सत्यामध्ये झाले आहे. (झोपड्यांची झाली घरे आणि स्वप्नात पाहिलेले झाले खरे!)

महिंद्रा रूरल हाऊसिंग फायनान्स ही MMFSL ची उपकंपनी ९ एप्रिल २००७ रोजी स्थापन करण्यात आली व हाऊसिंग फायनान्स इन्स्टीट्युशन म्हणून व्यवसाय करण्यासाठी नॅशनल हाऊसिंग बँकेकडून त्यांना १३ ऑगस्ट २००७ रोजी नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले. महिंद्रा ऐन्ड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हीसेस लिमिटेड (MMFSL) यांचा MRHFL च्या समभागांमध्ये ८७.५% इतका वाटा असून, उर्वरित १२.५% वाटा नॅशनल हाऊसिंग बँक (NHB) यांच्याकडे आहे. तसेच, NHB ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया (RBI) यांच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे.

आमचे ध्येय (मिशन):

“एकत्रितपणे काम करून ग्रामीण भागातील लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणणे.”

महिंद्रा होम फायनान्सकडून पुरविल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या सेवांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी कृपया त्यांच्या वेबसाईटला भेट द्या.

कंपनीज ऐक्ट, १९५६ अंतर्गत स्थापन करण्यात आलेली महिंद्रा ट्रस्टी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड ही महिंद्रा म्युच्युअल फंडसाठी विश्वस्त कंपनी आहे. आमच्या विश्वस्त मंडळावर आहेत - बँक ऑफ इंडीयाचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. मनोहर जी. भिडे, इंडीयन ओव्हरसीज बँकेचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. नरेंद्र मैरपदी, इन्स्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्सचे फेलो मेम्बर श्री. गौतम जी. पारेख आणि टचशेअर कन्सल्टींगचे संस्थापक व सीईओ श्री. देवव्रत बंद्योपाध्याय. (त्यांचा संपूर्ण परिचय पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

असेट मॅनेजमेंट कंपनीच्या प्रक्रिया व यंत्रणा यांच्यावर देखरेख ठेवण्याची महत्त्वाची भूमिका ही ट्रस्टी कंपनी पार पाडत असून, गुंतवणूकदारांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी काम करते.

कंपनीज ऐक्ट, १९५६ अंतर्गत स्थापन करण्यात आलेली महिंद्रा असेट मॅनेजमेंट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड ही महिंद्रा म्युच्युअल फंडसाठी गुंतवणूक व्यवस्थापक म्हणून काम करते. ही महिंद्रा ऐन्ड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हीसेस लिमिटेड (MMFSL) यांच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे. MAMCPL च्या संचालक मंडळामध्ये यांचा समावेश आहे - MMFSL चे कार्यकारी संचालक व सीएफओ श्री. व्ही. रवी, इन्स्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडीया (ICAI) चे फेलो मेम्बर श्री. गौतम दिवाण, आयआयएम त्रिची येथील डीन प्रा. जी. सेतू आणि MAMCPL चे एमडी व सीईओ श्री. आशुतोष बिष्णोई.

महिंद्रा फायनान्स सीएसआर फाउंडेशनची स्थापना महिंद्रा ऐन्ड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हीसेस लिमिटेड यांच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी म्हणून २ एप्रिल २०१९ रोजी करण्यात आली, जी कंपनीज ऐक्ट, २०१३ च्या कलम ८ अंतर्गत समभागांनी मर्यादीत नॉट फॉर प्रॉफीट कंपनी असून, पुढील गोष्टींना मदत, प्रोत्साहन देण्याचे, तसेच त्यांच्यामध्ये सुधारणा करण्याचे काम करते - शिक्षण, रोजगार, व्यावसायिक कौशल्ये, व शाश्वत उपजीविका, उपचारात्मक व प्रतिबंधात्मक आरोग्यसेवांसंबंधी उपाययोजना; स्वच्छता व सुरक्षित पिण्याच्या पाण्याची उपलब्धता; भूक, गरिबी व कुपोषण यांचे उच्चाटन करण्यासाठी उपाययोजना; शाश्वत पर्यावरणीय व इकोलॉजिकल संतुलन, वगैरे.

संपर्कात रहाण्यासाठी

महिन्द्रा अँड महिन्द्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड
चौथा मजला, महिन्द्रा टॉवर्स,
डॉ.जी.एम. भोसले मार्ग,
पी.के. कुर्णे चौक, वरळी,
मुंबई 400 018.

इथे क्लिक करा सर्वात जवळील महिन्द्रा फायनान्स शाखा शोधण्यासाठी

Calculate Your EMI

  • Diverse loan offerings
  • Less documenation
  • Quick processing
Loan Amount
Tenure In Months
Rate of Interest %
Principal: 75 %
Interest Payable: 25 %

For illustration purpose only

Total Amount Payable

50000