आपल्या संचालक मंडळाची एकत्रित तज्ञता आणि भविष्याबद्दलची दृष्टी हे लोकांना अधिक यश मिळवण्यासाठी सक्षम करून आपल्याला अज्ञात क्षेत्रांमध्ये पाऊल टाकण्यासाठी मार्गदर्शन करतात व प्रेरणा देतात
आमच्या कंपनीच्या कामकाजाचे सर्वसाधारणपणे पर्यवेक्षण, दिग्दर्शन व व्यवस्थापन अशा जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या नऊ महत्त्वपूर्ण संचालकांनी मिळून संचालक मंडळ बनले आहे. संचालक मंडळाच्या प्राथमिक जबाबदाऱ्यांमध्ये यांचा समावेश होतो:
कॉर्पोरेट प्रशासनाचा उच्च दर्जा व विविध कायद्यांचे पालन यावर देखरेख ठेवणे
आमच्या वित्तीय व्यवस्थापनावर देखरेख ठेवणे व विविध व्यावसायिक प्रवाहांना मंजुरी देणे
आमची धोरणे आणि प्रक्रिया तयार करणे
आमच्या कामगिरीचे परीक्षण करणे आणि वाढीचे धोरण विकसित करणे
काउंटर-पार्टी आणि इतर संभाव्य जोखीम व्यवस्थापन मर्यादा यांची आखणी करणे
डॉ. अनिश शहा हे महिंद्रा अँड महिंद्रा लि. चे मॅनेजिंग डायरेक्टर (व्यवस्थापकीय संचालक) आणि सी. ई. ओ. (मुख्य कार्यकारी अधिकारी) आहेत. त्यांनी २०१४ मध्ये ग्रुप प्रेसिडेन्ट (स्ट्रॅटेजी) म्हणून महिंद्रा ग्रुपमध्ये प्रवेश केला, आणि मुख्य धोरणात्मक उपक्रमांसाठी सर्व व्यवसायांमध्ये जवळून काम केले आहे, डिजिटायजेशन आणि डेटा सायन्सेस यासारख्या क्षमताबांधणीचे काम केले आहे, आणि ग्रुप कंपन्यांमधील सिनर्जीला कार्यन्वित केले आहे. २०१९ मध्ये, सीईओच्या भूमिकेत जाण्याच्या दिशेने नियोजित प्लॅन अंतर्गत त्यांची उप-व्यवस्थापकीय संचालक पदी आणि ग्रुप सीएफओ म्हणून नेमणूक झाली, ज्या अंतर्गत त्यांच्याकडे ग्रुप कॉर्पोरेट ऑफीसची आणि ऑटो व फार्म सेक्टर वगळता सर्व व्यवसाय क्षेत्रांवर देखरेख करण्याची जबाबदारी देण्यात आली.
२००९ ते २०१४ या दरम्यान अनिश यांनी जी.ई. (जनरल इलेक्ट्रिक) कॅपिटल इंडीयाचे अध्यक्ष व सीईओ म्हणून काम केले, जिथे त्यांनी व्यावसायिक परिवर्तन घडवून आणण्यात पुढाकार घेतला, ज्यामध्ये त्यांच्या एसबीआय कार्ड जॉइंट व्हेंचर प्रकल्पाचा समावेश होता. जी.ई. सोबत आपल्या १४ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी जी.ई. कॅपिटलच्या युएस आणि जागतिक युनिट्समध्ये अनेक उच्चपदे भूषवली. ग्लोबल मॉर्गेज डायरेक्टरच्या पदावर असताना त्यांनी वाढ व जोखीम व्यवस्थापनाच्या दृष्टीने ३३ देशांमधून काम केले. जीई मॉर्गेज इन्शुरन्सचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट (मार्केटींग व प्रॉडक्ट डेव्हलपमेंट) असताना त्यांनी वाढीच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले व जी.ई.चा पुढचा टप्पा असलेल्या व्यवसायाची आयपीओसाठी तयारी करून घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. जीईसोबतच्या सुरुवातीच्या काळात अनिश यांनी स्ट्रॅटेजी, ई-कॉमर्स आणि सेल्स फोर्स इफेक्टीव्हनेस या विभागांचेही नेतृत्व केले आणि जीईच्या अंतर्गत डॉट-कॉम व्यवसाय चालवण्याचा अद्वितीय अनुभवही घेतला. अनिश यांना “डिजिटल कॉकपिट” विकसित करण्यामध्ये सिक्स सिग्मा तंत्राचा असामान्य वापर केल्याबद्दल जी.ई. चा प्रतिष्ठित लेविस लॅटीमर पुरस्कारदेखील प्राप्त झाला.
जी.ई. व्यतिरिक्त जागतिक पातळीवरील इतर व्यवसायांमध्येही त्यांनी वैविध्यपूर्ण अनुभव मिळवलेला आहे. त्यांनी बँक ऑफ अमेरिकाच्या युएस डेबिट प्रॉडक्ट्स व्यवसायाचे प्रमुख म्हणून काम केले आहे, जिथे त्यांनी रिवॉर्डसंबंधी अभिनव उपक्रम सुरु केला, पेमेंट टेक्नॉलॉजीमध्ये असंख्य उपक्रम राबवले आणि ग्राहकांना मूल्यवर्धित सेवा पुरविण्यासाठी बँकेच्या विविध विभागांसोबत जवळून काम केले आहे.
त्यांनी बोस्टन येथील बेन ऐन्ड कंपनीमध्ये स्ट्रॅटेजी कन्सल्टंट म्हणून बँकींग, ऑईल रिग्ज, पेपर, पेण्ट, स्टीम बॉयलर्स आणि वैद्यकीय उपकरणे अशा विविध उद्योगक्षेत्रांमध्ये काम केले आहे. त्यांचे पहिले पद मुंबई येथील सिटीबँकेसोबत होते, जिथे त्यांनी ट्रेड सर्व्हीसेस विभागात असिस्टंट मॅनेजर म्हणून बँक गॅरंटीज आणि लेटर्स ऑफ क्रेडीट प्रदान करण्याचे काम केले आहे.
अनिश यांनी कार्नेज मेलनच्या टेपर स्कूल ऑफ बिझनेसमधून पीएचडी प्राप्त केलेली असून, त्यासाठी त्यांनी कॉर्पोरेट गव्हर्नन्स क्षेत्रात डॉक्टरेट प्रबंध (डॉक्टरल थेसिस) सादर केला. त्यांनी कार्नेज मेलनमधून मास्टर्स डिग्रीदेखील प्राप्त केलेली असून, इंडीयन इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद येथून मॅनेजमेंट विषयात पोस्ट-ग्रॅज्युएट डिप्लोमा मिळवला आहे. त्यांना निरनिराळ्या शिष्यवृत्ती मिळाल्या आहेत, ज्यामध्ये विल्यम लॅटीमर मेलन स्कॉलरशिप, आयआयएमए येथे इंडस्ट्री स्कॉलरशिप, नॅशनल टॅलेंट सर्च आणि सर दोराबजी टाटा ट्रस्ट यांचा समावेश आहे.
श्री. रमेश अय्यर हे ३० एप्रिल २००१ पासून कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी सुरुवातीपासून आमच्यासोबत काम केलं आहे. व्यवसायाचा विकास, फायनान्स आणि मार्केटिंग संबंधी फार मोठा अनुभव त्यांना आहे. श्री. रमेश अय्यर हे होल्डिंग कंपनी, एम अँड एमच्या ग्रुप एक्झेक्युटीव बोर्डाचे सदस्यही आहेत. शिवाय महिन्द्रा गु्रप कंपनीच्या विविध मंडळावर कार्यरत आहेत. त्यांनी कॉमर्समध्ये पदवी मिळवली आणि बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्स डिग्री प्राप्त केली आहे.
श्री. अय्यर हे बॉंबे चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीच्या बँकिंग आणि फायनान्स कमिटी, कोर कमिटी ऑफ फायनान्स इंडस्ट्री डेवलपमेंट काउंसिल (एफआयडीसी) आणि टास्क फोर्स ऑफ एनबीएफसीज् ऑफ फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (एफआयसीसी) ह्यांचे सदस्य आहेत. तसेच, इंडियन ऑटोमोबाइल मॅन्यूङ्गॅक्चरर्स (एसआयएएम) ह्यांनी स्थापन केलेल्या फायनान्स अँड लीजिंग अँड इंशूरंस ऑफ दि काउंसिल ऑफ इकोनॉमिक अफेअर्सवरील ग्रुपचे सह-अध्यक्ष आहेत.
श्री. अय्यर ह्यांनी विविध पुरस्कार आणि सन्मान मिळवून आपल्या कारकिर्दीला उजाळा दिला. त्यांनी इंडियन आचिवर्स फोरमकडून इंडियन आचिवर्स अवार्ड फॉर कॉर्पारेट लीडरशिप हा मानाचा पुरस्कार प्राप्त केला. नवी दिल्लीतील इंस्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक स्टडीजकडून बिझनेस लीडरशिप पुरस्कार जिंकला. एंप्लॉयर ब्रँडिंग इंस्टिट्यूट, सीएमओ अशिया आणि त्यांचे धोरणात्मक भागीदार सीएमओ काउंसिलकडून ‘सीईओ विथ एचआर ओरिएंटेशन’ पुरस्काराने त्यांच्यामधील नेतृत्व गुणांना सन्मानित करण्यात आले. तसेच, नवी दिल्लीच्या इंस्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक स्टडीजकडून उद्योग रत्न पुरस्कार मिळाला आणि पुण्याच्या काउंसिल फॉर इकॉनॉमिक ग्रोथ अँड रिसर्चकडून प्रतिभा पुरस्कार प्राप्त झाला. मुंबईच्या नॅशनल एज्यूकेशन अँड ह्यूमन रिसोर्स डेवलपमेंट संस्थेने त्यांना भारतीय उद्योग रत्न पुरस्कार देऊन त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. इतकंच नाही तर श्री. रमेश अय्यर भारतातील सर्वात प्रतिभाशाली सीईओज्च्या बिझनेस वल्डर्स स्पेशल रिपोर्टमध्येही झळकले. मध्यम व्यवसाय करणार्या कंपन्यांच्या यादीत ते ६५ पैकी ५ व्या स्थानावर (उत्पन्न: रु.१००० – ३००० कोटी) आणि त्याच वर्गवारीत ६५ पैकी ६ व्या स्थानावर आहेत. हे यश त्यांच्या एका वर्षाच्या कामगिरीच्या आधारावर आहे. शिवाय, कंपनीच्या पाच वर्षांच्या कामगिरीच्या आधारावर ते १०० पैकी २० वे मानकरी ठरले आहेत आणि आर्थिक क्षेत्रात १२ पैकी ३ रे स्थान पटकावले आहे.
श्री. धनंजय मुंगळे हे भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेचे सदस्य असून त्यांनी मुंबई विद्यापीठातून कॉमर्स आणि कायद्याची पदवी मिळवली आहे. त्यांनी आपल्या करियरमधील फार मोठा काळ भारत आणि युरोपातील कॉर्पोरेट आणि इनवेस्टमेंट बँकिंग क्षेत्रात घालवला. ते प्रायव्हेट बँकिंग, बँक ऑफ अमेरिकामध्ये उपाध्यक्ष होते. तसेच, कार्यकारी समिती, डीएसपी मेरिल लिंच लिमिटेडचे सदस्य होते. सध्या भारत आणि युरोप दोन्ही देशात ते विविध मंडळांवर सल्लागार म्हणून काम करतात. विविध सार्वजनिक आणि खासगी मर्यादित कंपन्यांच्या मंडळावर त्यांची निवड झाली आहे. ऑक्सफर्ड सेंटर फॉर हिंदू स्टडीज, ऑक्सफर्ड, यूके च्या डेवलपमेंट काउंसिलचे ते सदस्य आहेत आणि महिन्द्रा युनाइटेड वर्ल्ड कॉलेजच्या नॅशनल कमिटीचे सदस्य आहेत.
श्री. चंद्रशेखर भावे ह्यांनी भारतीय प्रशासन सेवा (आयएएस) मधून १९७५ साली कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध पदांवर काम करून त्यांनी मोठा अनुभव मिळाला. त्यांना महाराष्ट्र राज्य सरकारकडून कुटुंब कल्याण आणि प्रबंधनातील सर्वोत्तम कामगिरीसाठी पुरस्कार मिळाला. त्यावेळी ते सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (एसईबीआय) मध्ये वरिष्ठ संचालक म्हणून काम करत होते. १९९२ ते १९९६ दरम्यान त्यांनी ही जबाबदारी यशस्वीपणे पेलली. भारतीय भांडवली बाजारपेठेला नियामक संरचना देण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
श्री. भावे ह्यांनी आयएएसमधून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आणि १९९६ साली नॅशनल सिक्युरिटीज डिपॉजिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची स्थापना केली आणि १९९६ ते २००८ पर्यंत ते अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक होते. श्री. भावे २००८ ते २०११ दरम्यान भारताच्या भांडवली बाजाराचे नियामक असलेल्या सेबीचे अध्यक्ष होते. तसेच, अशिया-पॅसिङ्गिक रिजनल कमिटीचही अध्यक्षपद त्यांनी भूषवीले. ह्याच कालावधीत इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ सिक्युरीटीज कमिशन्स (आयओएससीओ) च्या टेक्निकल अँड एक्झेक्युटीव कमिटीचे ते सदस्य होते
श्री. भावे ह्यांनी खालील मोलाचे यश मिळवले:
पब्लिक इंटरेस्ट ओवरसाइट बोर्ड (पीआयओबी), माद्रिद मंडळाचे सदस्य, जिथे लोकांच्या हितासाठी इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ अकाउंट्ंटसच्या स्टँडर्ड सेटींग बॉडीजच्या कामाचे परिनिरिक्षण केले जाते. सिटी ऑफ लंडन ऍडवायझरी काउंसिल फॉर इंडियाचे सदस्य. लंडनच्या आयएफआरएस फाउंडेशनचे विश्वस्त जे इंटरनॅशनल अकाउंटींग स्टँडडर्स बोर्डाचे काम पहातात.
श्री. भावे हे इंडियन इंस्टिट्यूट फॉर ह्यूमन सेटलमेंट्सचे (आयआयएचएस) नॉन एक्झेक्युटीव चेअरमन आहेत. ही ना नफा तत्वावरील संस्था असून ग्रामीण भागात मानवी पुनर्वसनासंबंधी काम करते आणि ज्ञानाचा वापर करते.
श्रीमती रमा बिजापूरकर ह्यांनी विज्ञानाची पदती (हॉन.) मिळवली आणि महिन्द्रा हाउस, दिल्ली विद्यापीठातून भौतिकशास्थाची पदवीही प्राप्त केली. अहमदाबादच्या इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये पदव्यूत्तर पदविका मिळवण्यासाठी त्या गेल्या होत्या. आता त्या तिथे गवर्नर्स आणि विजिटींग ङ्गॅकल्टीच्या सदस्या बनल्या आहेत. तसेच, स्वतंत्र मार्केट स्ट्रॅटेजी सल्लागार म्हणूनही त्या कार्यरत होत्या आणि जाहिरात, मार्केटिंग आणि कन्सल्टीन्सीसारख्या व्यवसायात त्यंानी ३० वर्षांचा अनुभव मिळवला आहे. मॅककिनसे अँड कंपनी, एसी निल्सेन इंडिया सोबत त्यांनी काम केलं आणि हिंदूस्तान युनिलिवर लिमिटेडमध्ये पूर्णवेळ सल्लागार म्हणून काम केले. विकास करणारी बाजारपेठ आणि ग्राहकांसंबंधी समस्यांवर त्यांनी खूप लिखाण केलं. ‘विनिंग इन दि इंडियन मार्केट-अंटरस्टँडिंग दि ट्रान्सफॉर्मेशन ऑफ कंन्झुमर इंडिया’ नावाचे पुस्तक लिहिले.
सध्या, श्रीमती रमा बिजापूरकर विविध प्रख्यात कंपन्यांच्या मंडळांवर स्वतंत्र संचालक म्हणून कार्यरत आहेत.
श्री. मिलिंद सरवटे हे चार्टर्ड अकौंटंट, कॉस्ट अकौंटंट, कंपनी सेक्रेटरी, कॉमर्स ग्रॅज्युएट आणि सीआयआय-फुलब्राईट फेलो (कार्नेज मेलन युनिव्हर्सिटी, पिट्सबर्ग, युएसए) आहेत. त्यांच्याकडे मारीको आणि गोदरेज अशा ग्रुप्समध्ये फायनान्स, एचआर, स्ट्रॅटेजी व कॉर्पोरेट कम्युनिकेशन विभागांत काम करण्याचा ३५ वर्षांचा अनुभव आहे.
श्री. मिलिंद सरवटे हे इनक्रिएट व्हॅल्यू ऐडव्हायजर्स एलएलपी या कंपनीचे संस्थापक व सीईओ आहेत. संस्था आणि व्यक्तींना व्यावसायिक व सामाजिक मूल्यनिर्मिती करण्यास मदत करणे हे त्यांचे उद्दीष्ट आहे. सल्लागार, संचालक मंडळ सदस्य आणि गुंतवणूकदार अशा विविध भूमिकांमधून ते आपले उद्दीष्ट साध्य करण्याच्या दिशेने कार्यरत आहेत.
सल्लागाराच्या भूमिकेतून ते कंझ्युमर सेक्टर आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सेक्टरमध्ये कार्यरत आहेत.
संचालकाच्या भूमिकेतून ते ग्लेनमार्क, माइंडट्री, मेट्रोपॉलिस हेल्थकेअर, मॅट्रीमोनी-डॉट-कॉम व हाऊस ऑफ अनिता डोंगरे अशा कंपन्यांसोबत कार्यरत आहेत.
कंझ्युमर सेक्टर आणि फायनान्स व ह्युमन रिसोर्सेस या क्षेत्रांमधील तज्ञ अनुभवाच्या आधारे उभारण्यात आलेल्या फंड्स/कंपन्या यांच्यामध्ये गुंतवणूक करण्यावर त्यांचा भर आहे.
श्री. मिलिंद सरवटे यांना २०११ मध्ये आयसीएआय अवॉर्ड-सीएफओ-एफएमसीजी, तसेच २०१२ मध्ये सीएनबीसी टीव्ही-एटीन सीएफओ अवॉर्ड-एफएमसीजी ऐन्ड रिटेल असे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. २०१३ साली सीएफओ इंडीयाज हॉल ऑफ फेममध्ये त्यांचा समावेश करण्यात आला होता.
अमित राजे हे महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हीसेस लिमिटेड चे सध्याचे पूर्णवेळ संचालक असून “चीफ ऑपरेटींग ऑफिसर डिजिटल फायनान्स-डिजिटल बिझिनेस युनिट” या पदी त्यांची नियुक्ती केलेली आहे. अमित यांनी जुलै २०२० मध्ये कार्यकारी उपाध्यक्ष - पार्टनरशिप्स अँड अलायन्सेस म्हणून महिंद्रा ग्रुपमध्ये प्रवेश केला, आणि त्यांच्यावर एम अँड ए आणि इन्व्हेस्टर रिलेशन्स विभागाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी होती. महिंद्रा ग्रुपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी, अमित हे गोल्डमन सॅश या कंपनीच्या प्रिन्सिपल इन्व्हेस्टींग एरियाचे मॅनेजिंग डायरेक्टर होते. ते गोल्डमन सॅशतर्फे नॉव्हेलटेक फीड्स प्रायव्हेट लिमिटेड, गुड होस्ट स्पेसेस प्रायव्हेट लिमिटेड, आणि ग्लोबल कन्झ्युमर प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लि. या कंपन्यांच्या संचालक मंडळांवर नामांकित संचालक होते. अमित यांचा कॉर्पोरेट फायनान्स, विलीनीकरणे आणि अधिग्रहण, आणि खाजगी इक्विटी या विभागांमध्ये २० वर्षांहून अधिक वर्षांचा एकत्रित अनुभव आहे. गोल्डमन सॅश या कंपनीत काम करण्यापूर्वी ते कोटक महिंद्रा बँकेची पर्यायी मालमत्ता शाखा असलेल्या कोटक इन्व्हेस्टमेंट ऐडव्हायजर्स लि. मध्ये, तसेच डेलॉईट अँड कं. मधील ट्रान्झॅक्शन ऐडव्हायजरी सर्व्हीसेसमध्ये काम करत होते. अमित यांनी त्यांचे पदव्युत्तर शिक्षण मुंबई विद्यापीठातून पूर्ण केले असून, लंडन बिझिनेस स्कूलमधून फायनान्स आणि प्रायव्हेट इक्विटी या क्षेत्रात स्पेशलायजेशनसहीत एमबीए केले आहे.
डॉ. रेबेका न्यूजेंट हे, कार्नेगी मेलॉन सांख्यिकी आणि डेटा विज्ञान विभागासाठी सांख्यिकी आणि डेटा विज्ञान आणि विभाग प्रमुखचे स्टीफन ई. आणि जॉयस फीनबर्ग प्रोफेसर आणि तंत्रज्ञान आणि सोसायटीसाठी ब्लॉक सेंटरचे संलग्न प्राध्यापक सदस्य आहेत. त्यांना स्टॅटिस्टीक्स आणि डेटा सायन्स कन्सल्टींग, रिसर्च, ऐप्लिकेशन्स, एज्युकेशन, आणि ऐडमिनिस्ट्रेशन यामधील विद्यापीठ-स्तरीय शैक्षणिक अभ्यासक्रमाचा १५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. डॉ. न्यूजेंट नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस, इंजिनियरिंग, आणि मेडिसीन स्टडी ऑन इम्प्रूव्हींग डिफेन्स अक्विजिशन वर्कफोर्स कपॅबिलिटी इन डेटा यूज याच्या सह-अध्यक्ष असून, अलीकडेच त्यांनी एनएएसईएम स्टडी एनव्हिजनिंग दी डेटा सायन्स डिसिप्लीन: दी अंडर-ग्रॅज्युएट पर्स्पेक्टीव्ह यासाठी काम केले आहे.
त्या स्टॅटिस्टिक्स & डेटा सायन्स कॉर्पोरेट कॅपस्टोन प्रोग्रॅम या प्रायोगिक अध्ययन उपक्रमाच्या संस्थापक संचालक आहेत, ज्यामध्ये उद्योगक्षेत्र आणि शासकीय संस्था यांच्यासोबत भागीदारीतून सध्याच्या व्यावसायिक आव्हानांवर डेटा सायन्सच्या माध्यमातून उपाययोजना विकसित करून त्या अंमलात आणल्या जातात आणि वित्त, विपणन, आरोग्य सेवा, आणि शैक्षणिक तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक उद्योगांसोबत नियमितपणे सल्लामसलत केली जाते. डॉ. न्यूजेंट यांनी हाय-डायमेन्शनल, बिग डेटा प्रॉब्लेम्स आणि रेकॉर्ड लिंकेज ऐप्लीकेशन्सवर विशेष भर देणाऱ्या क्लस्टरिंग आणि क्लासिफिकेशन मेथडॉलॉजीमध्ये मोठ्या प्रमाणावर काम केले आहे, तसेच यासंबंधी लीडरशीप पदांवर काम केले आहे, ज्यामध्ये प्रेसिडेन्ट ऑफ दी इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ क्लासिफिकेशन सोसायटीज (२०२२ साठी नियोजित) याचा समावेश आहे. त्यांचे सध्याचे संशोधन, डेटा-इन्फॉर्म डिसिजन मेकिंगला प्रोत्साहन देणाऱ्या, तसेच अडॅप्टीव्ह इन्स्ट्रक्शनला परवानगी देणाऱ्या इंटरॅक्टीव्ह डेटा ऍनालिटिक्स प्लॅटफॉर्म्सच्या विकास आणि अंमलबजावणीवर, तसेच डेटा सायन्सचा एक शास्त्र म्हणून अभ्यास या विषयांवर केंद्रीत आहे.
त्यांना अनेक राष्ट्रीय आणि विद्यापीठ अध्यापन पुरस्कार मिळाले आहेत, ज्यामध्ये दी अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशन वॉलर अवॉर्ड फॉर इनोव्हेशन इन स्टॅटिस्टिक्स एज्युकेशन याचा समावेश आहे, तसेच त्या स्प्रिंगर टेक्स्ट्स इन स्टॅटिस्टिक्सच्या सहसंचालकांपैकी एक म्हणून काम करतात.
त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन येथून पीएच.डी. प्राप्त केली असून, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी येथून एम.एस. इन स्टॅटिस्टिक्स, तर राईस युनिव्हर्सिटी येथून मॅथेमॅटीक्स, स्टॅटिस्टिक्स, आणि स्पॅनिशमधील बी.ए. पदवी प्राप्त केली आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड (“एम अँड एम”) या मूळ कंपनीने १ नोव्हेंबर २०२० रोजी, श्री. अमित सिन्हा यांची प्रेसिडेन्ट, ग्रुप स्ट्रॅटेजी, या पदावर नेमणूक केली. श्री. अमित सिन्हा ग्रुप स्ट्रॅटेजी ऑफीसचे नेतृत्व करीत असून, अल्प, मध्यम, आणि दीर्घ कालावधीच्या विकासासाठी ग्रुपच्या एकंदर पोर्टफोलिओचे काम बघतात. ते आंतरराष्ट्रीय परिषदेचे देखील चॅम्पियन असून, अमेरिका, एशिया पॅसिफिक, आणि आफ्रिका खंडांमधील आंतरराष्ट्रीय सिनर्जी समन्वयामध्ये मदत करतात. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये रिस्क आणि इकॉनॉमिस्ट कामांचा देखील समावेश आहे. ते ग्रुप कॉर्पोरेट ऑफीस लीडरशिप टीमचा देखील भाग आहेत.
श्री. अमित सिन्हा यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या 'व्हार्टन स्कूल' मधून फायनान्स आणि स्ट्रॅटेजी यामधील स्पेशलायजेशनसह ड्युअल एमबीए पदवी घेतली आहे, जिथे ते पामर स्कॉलर होते आणि त्यांनी सिबेल स्कॉलरशिप प्राप्त केली होती. त्यांनी बिर्ला इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, रांची येथून बॅचलर ऑफ इंजिनियरिंग (इलेक्ट्रीकल आणि इलेक्ट्रॉनिक्स) पदवी प्राप्त केली आहे. श्री. अमित सिन्हा इंडीया लीडरशिप फेलोशिप कार्यक्रमाच्या अंतर्गत अनंता अस्पेन फेलो देखील आहेत.
श्री. रमेश अय्यर हे ३० एप्रिल २००१ पासून कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी सुरुवातीपासून आमच्यासोबत काम केलं आहे. व्यवसायाचा विकास, फायनान्स आणि मार्केटिंग संबंधी फार मोठा अनुभव त्यांना आहे. श्री. रमेश अय्यर हे होल्डिंग कंपनी, एम अँड एमच्या ग्रुप एक्झेक्युटीव बोर्डाचे सदस्यही आहेत. शिवाय महिन्द्रा गु्रप कंपनीच्या विविध मंडळावर कार्यरत आहेत. त्यांनी कॉमर्समध्ये पदवी मिळवली आणि बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्स डिग्री प्राप्त केली आहे.
श्री. अय्यर हे बॉंबे चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीच्या बँकिंग आणि फायनान्स कमिटी, कोर कमिटी ऑफ फायनान्स इंडस्ट्री डेवलपमेंट काउंसिल (एफआयडीसी) आणि टास्क फोर्स ऑफ एनबीएफसीज् ऑफ फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (एफआयसीसी) ह्यांचे सदस्य आहेत. तसेच, इंडियन ऑटोमोबाइल मॅन्यूङ्गॅक्चरर्स (एसआयएएम) ह्यांनी स्थापन केलेल्या फायनान्स अँड लीजिंग अँड इंशूरंस ऑफ दि काउंसिल ऑफ इकोनॉमिक अफेअर्सवरील ग्रुपचे सह-अध्यक्ष आहेत.
श्री. अय्यर ह्यांनी विविध पुरस्कार आणि सन्मान मिळवून आपल्या कारकिर्दीला उजाळा दिला. त्यांनी इंडियन आचिवर्स फोरमकडून इंडियन आचिवर्स अवार्ड फॉर कॉर्पारेट लीडरशिप हा मानाचा पुरस्कार प्राप्त केला. नवी दिल्लीतील इंस्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक स्टडीजकडून बिझनेस लीडरशिप पुरस्कार जिंकला. एंप्लॉयर ब्रँडिंग इंस्टिट्यूट, सीएमओ अशिया आणि त्यांचे धोरणात्मक भागीदार सीएमओ काउंसिलकडून ‘सीईओ विथ एचआर ओरिएंटेशन’ पुरस्काराने त्यांच्यामधील नेतृत्व गुणांना सन्मानित करण्यात आले. तसेच, नवी दिल्लीच्या इंस्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक स्टडीजकडून उद्योग रत्न पुरस्कार मिळाला आणि पुण्याच्या काउंसिल फॉर इकॉनॉमिक ग्रोथ अँड रिसर्चकडून प्रतिभा पुरस्कार प्राप्त झाला. मुंबईच्या नॅशनल एज्यूकेशन अँड ह्यूमन रिसोर्स डेवलपमेंट संस्थेने त्यांना भारतीय उद्योग रत्न पुरस्कार देऊन त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. इतकंच नाही तर श्री. रमेश अय्यर भारतातील सर्वात प्रतिभाशाली सीईओज्च्या बिझनेस वल्डर्स स्पेशल रिपोर्टमध्येही झळकले. मध्यम व्यवसाय करणार्या कंपन्यांच्या यादीत ते ६५ पैकी ५ व्या स्थानावर (उत्पन्न: रु.१००० – ३००० कोटी) आणि त्याच वर्गवारीत ६५ पैकी ६ व्या स्थानावर आहेत. हे यश त्यांच्या एका वर्षाच्या कामगिरीच्या आधारावर आहे. शिवाय, कंपनीच्या पाच वर्षांच्या कामगिरीच्या आधारावर ते १०० पैकी २० वे मानकरी ठरले आहेत आणि आर्थिक क्षेत्रात १२ पैकी ३ रे स्थान पटकावले आहे.
अमित राजे हे महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हीसेस लिमिटेड चे सध्याचे पूर्णवेळ संचालक असून “चीफ ऑपरेटींग ऑफिसर डिजिटल फायनान्स-डिजिटल बिझिनेस युनिट” या पदी त्यांची नियुक्ती केलेली आहे. अमित यांनी जुलै २०२० मध्ये कार्यकारी उपाध्यक्ष - पार्टनरशिप्स अँड अलायन्सेस म्हणून महिंद्रा ग्रुपमध्ये प्रवेश केला, आणि त्यांच्यावर एम अँड ए आणि इन्व्हेस्टर रिलेशन्स विभागाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी होती. महिंद्रा ग्रुपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी, अमित हे गोल्डमन सॅश या कंपनीच्या प्रिन्सिपल इन्व्हेस्टींग एरियाचे मॅनेजिंग डायरेक्टर होते. ते गोल्डमन सॅशतर्फे नॉव्हेलटेक फीड्स प्रायव्हेट लिमिटेड, गुड होस्ट स्पेसेस प्रायव्हेट लिमिटेड, आणि ग्लोबल कन्झ्युमर प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लि. या कंपन्यांच्या संचालक मंडळांवर नामांकित संचालक होते. अमित यांचा कॉर्पोरेट फायनान्स, विलीनीकरणे आणि अधिग्रहण, आणि खाजगी इक्विटी या विभागांमध्ये २० वर्षांहून अधिक वर्षांचा एकत्रित अनुभव आहे. गोल्डमन सॅश या कंपनीत काम करण्यापूर्वी ते कोटक महिंद्रा बँकेची पर्यायी मालमत्ता शाखा असलेल्या कोटक इन्व्हेस्टमेंट ऐडव्हायजर्स लि. मध्ये, तसेच डेलॉईट अँड कं. मधील ट्रान्झॅक्शन ऐडव्हायजरी सर्व्हीसेसमध्ये काम करत होते. अमित यांनी त्यांचे पदव्युत्तर शिक्षण मुंबई विद्यापीठातून पूर्ण केले असून, लंडन बिझिनेस स्कूलमधून फायनान्स आणि प्रायव्हेट इक्विटी या क्षेत्रात स्पेशलायजेशनसहीत एमबीए केले आहे.
विवेक हे बॉम्बे युनिव्हर्सिटी येथून चार्टर्ड अकौंटंट (1994), कॉस्ट अकौंटंट (1993) आणि बी.कॉम. झालेले (1991) आहेत. त्यांना पी अँड जी, सीमेन्स इन्फॉर्मेशन सिस्टीम्स आणि आयसीआयसीआय या ठिकाणी काम करत असताना कंझ्युमर गुड्स, आयटी कन्सल्टींग आणि प्रोजेक्ट फायनान्स अशा विविध क्षेत्रांमधील 25 पेक्षा जास्त वर्षांचा संपन्न अनुभव आहे.
महिंद्रा फायनान्समध्ये रुजू होण्यापूर्वी जवळपास 20 वर्षे ते मारिको लिमिटेड या लिस्टेड एफएमसीजी कंपनीमध्ये काम करत होते. मारिकोचे ग्रुप सीएफओ या त्यांच्या शेवटच्या भूमिकेतून त्यांनी बिझनेस फायनान्स आणि कमर्शियल, ट्रेझरी आणि इन्श्युरन्स, इन्व्हेस्टर रिलेशन्स, इंटर्नल ऑडीट आणि गव्हर्नन्स, रिस्क आणि कम्प्लायन्स (GRC), अकौंटींग आणि पेरोल, टॅक्सेशन आणि एम&ए अशा विविध जवाबदाऱ्यांचे यशस्वी नेतृत्व केले आहे.
विवेक यांनी FICCI च्या कॉर्पोरेट फायनान्स कमिटीचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे. ते सध्या FICCI च्या सीएफओ कॉन्क्लेव्हचे सदस्य आहेत.
श्री. अनुज मेहरा हे महिन्द्रा रुरल हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (एमआरएचएफएल) व्यवस्थापकीय संचालक आहेत. ही कंपनी घरासाठी कर्ज देण्याचा व्यवसाय करते. श्री. मेहरांनी फंक्शनल एरियाजमध्ये मोठा अनुभव घेतला असून फायनान्शिअल सर्विस सेक्टरमध्ये १६ पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव घेतला आहे. त्यांनी महिन्द्रा रुरल हाउसिंग फायनान्स लिमिटेडमधून २००७ साली प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणून सुरुवात केली.
श्री. मेहरा ह्यांनी दिल्ली विद्यापीठातून बी.ए.ऑनर्स (इकॉनॉमी) पदवी प्राप्त केली. १९८२ साली त्यांनी अहमदाबादच्या इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून पोस्ट ग्रेज्यूएशन पूर्ण केले. करियरच्या सुरुवातीला ते लॅक्मे लिमिटेडमध्ये (सेल्स आणि मार्केटिंग) ७ वर्षे कार्यरत होते. नंतर लॅक्मे लिमिटेडच्या फार्मास्युटीकल विभागात ऑल इंडिया सेल्स मॅनेजर बनले. हे काम अल्पकाळाचे होते. नंतर आयटीसी क्लासिक फायनान्स लिमिटेडमध्ये त्यांनी फायनान्शिअल सर्विसेस क्षेत्रात प्रवेश केला. कंपनीसोबत काम करताना रिजनल मॅनेजर, जनरल मॅनेजर (वेस्ट) आणि असिस्टंट वाइस-प्रेसिडंट ही पदे भुषविली. शिवाय, ट्वेंटीथ सेंचुरी फायनान्स कॉर्पोरेशनमध्ये वाइस-प्रेसिडंट म्हणूनही मोलाचे योगदान दिले. सेंचुरियन बँक लिमिटेड त्यांनी विविध आवाहनात्मक जबाबदार्या पेलल्या. त्यानंतर ते महिन्द्रा जेस्को डेवलपर्स लिमिटेडमध्ये आले, जिथे त्यांनी मार्केटिंग पोर्टफोलिओ हाताळला.
श्री. आशुतोष बिष्णोई यांना भारतातील कन्झ्युमर मार्केटींग व फायनान्शियल सर्व्हीस व्यवसायाचा ३६ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. म्युच्युअल फंड व्यवसायामध्ये त्यांनी वरिष्ठ पातळीवर पार पाडलेल्या भूमिकांमध्ये यांचा समावेश होतो - डीएसपी मेरिल लिंच असेट मॅनेजमेंट लि. येथे चीफ मार्केटींग ऑफीसर, जेएम म्युच्युअल फंड येथे प्रेसिडेंट व सीईओ, युटीआय म्युच्युअल फंड येथे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर आणि एक ऐन्ड टी म्युच्युअल फंड येथे ऐक्टींग-सीईओ. कन्झ्युमर मार्केटींग क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमध्ये त्यांच्या जे. वॉल्टर थॉम्पसन इंडीया येथील ब्रॅन्ड प्लॅनिंग डायरेक्टर व हेड ऑफ बिझनेस डेव्हलपमेंट, तसेच रीडर्स डायजेस्ट मॅगेझिन ऐन्ड बुक्स इंडीया येथील प्रकाशक या कार्यकाळांचा समावेश आहे.
श्री. आशुतोष बिष्णोई हे दी एनआयएसएम कमिटी फॉर एम्पॅनलमेंट ऑफ रिसोर्स पर्सन्स आणि दी एनआयएसएम कमिटी फॉर कन्टीन्युईंग एज्युकेशन यांचे सदस्य आहेत. त्यांनी सिम्बॉयसिस इन्स्टीट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, पुणे येथे एमबीएचे शिक्षण घेतले आणि हार्वर्ड बिझनेस स्कूल, बोस्टन येथे महिंद्रा युनिव्हर्स प्रोग्रॅममध्ये भाग घेतला. श्री. बिष्णोई हे पूर्वीच्या इंडीयन इन्स्टीट्यूट ऑफ कॅपिटल मार्केट्स या संस्थेमध्ये वेळोवेळी व्हिजिटींग फॅकल्टी म्हणून मार्गदर्शन करीत, तसेच दी नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केटच्या उभारणीमध्ये त्यांनी विशेष सहभाग घेतलेला आहे. एएमएफआय, अर्थात दी असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्सच्या बोर्डाचे, तसेच त्यांच्या गुंतवणूकदार जागृती समितीचे देखील ते सदस्य आहेत.
श्री. रजनिश अगरवाल ह्यांनी लखनौ विद्यापीठातून विज्ञानाची पदवी मिळवली आणि मुंबई विद्यापीठातून मॅनेजमेंट स्टडीजमध्ये मास्टर्स डीग्री प्राप्त केली. तसेच, ते महिन्द्रा बिझनेस अँड कन्सल्टींग सर्विेसेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये स्टीअरिंग कमिटीचे सदस्य आणि संचालक आहेत.
त्यांच्याकडे रिटेल क्रेडिट ऑटो लोन्स, असेट रिस्क मॅनेजमेंट, रुरल मॅनेजमेंट, बिझनेस आणि प्रॉडक्ट डेवलपमेंट, चॅनल आणि रिलेशनशिप मॅनेजमेंट व पिपल मॅनेजमेंट ह्या क्षेत्रात २१ पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे. तसेच, त्यांनी इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट-बेंगलोर आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट-कलकत्ता अशा प्रख्यात संस्थांमधून जनरल मॅनेजर आणि बिझनेस लीडरशिपचे कमी कालावधीचे कोर्सेस पूर्ण केले आहेत.
श्र. बालाजी हे मॅनेजमेंट प्रोफेशनल असून त्यांना स्ट्रॅटेजी, मार्केटिंग आणि सेल्समध्ये 20 वर्षांचा अनुभव आहे. श्री. बालाजी कंपनीसोबत २००८ पासून कार्यरत आहेत आणि त्यांनी विवधि आवाहनात्मक प्रकल्पांमध्ये मोलाचं योगदान दिलं आहे. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास येथून त्यांनी बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बी.टेक) पदवी मिळवली आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कलकत्ता येथून पोस्ट ग्रॅज्यूएशन पूर्ण करून मार्केटिंग आणि फायनान्समध्ये प्रावीण्य मिळवले.
ह्याआधी, ते महिन्द्रा अँड महिन्द्रा लि. मध्ये जनरल मॅनेजर-कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी विभाग सांभाळत होते. तसेच, नेस्टलेमध्ये ब्रँड फ्रेंचाइसी मॅनेजर आणि ऍग्रो टेक फूड्समध्ये ज्येष्ठ ब्रँड मॅनेजर होते.
समूहातील व्यवसायांसोबत जवळून काम करीत तांत्रिक परिवर्तन घडवून आणण्याच्या समूहाच्या महत्त्वाकांक्षी उद्दीष्टाकडे घेऊन जाण्याची जबाबदारी मोहित यांच्यावर आहे. ह्याकरिता ते समूहातील नानाविध कंपन्यांमध्ये नवनव्या तंत्रज्ञानाचे उपयोजन करून व्यवसायाची नवीन मॉडेल्स बनवितात आणि तेथील ग्राहकांना वेगळाच अनुभव मिळवून देतात.
मोहित ऑक्टोबर २०२०मध्ये महिंद्रा समूहाशी जोडले गेले. यापूर्वी ते डीबीएस बँकेत टेक्नॉलॉजी ऑप्टिमायझेशन विभागाचे प्रमुख होते आणि हैद्राबादमधील एशिया हब, जे बँकेचे सिंगापूरबाहेरील प्रथम तंत्रज्ञान विकास केंद्र होते, त्याचेही प्रमुख होते. त्यांनी डिजिटल बँकिंग क्षमतांच्या विकास प्रक्रियेचे नेतृत्व केले; याअंतर्गत त्यांनी मोबाइल, डेटा, कृत्रिम बुद्धिमत्ता व क्लाउड यासारख्या सखोल अभियांत्रिकी व तांत्रिक क्षेत्रामधील तंत्रज्ञानातील नवीन संशोधनावर भर दिला.
मोहित यांजकडे तंत्रज्ञान व ऑपरेशन्स क्षेत्रातील ३० वर्षांचा अनुभव आहे. यापैकी गेली १७ वर्षे ही बँकिंग व वित्तसेवा क्षेत्रातील आहेत.
डीबीएसशी जोडण्यापूर्वी ते बँक ऑफ अमेरिकाच्या जागतिक व्यवसाय सेवा केंद्रांकरिता प्रमुख तंत्रज्ञान अधिकारी म्हणून काम पाहत होते, व त्याआधी एम्फासिस येथे सीआयओ होते.
मोहित हे इलेक्ट्रॉनिक्स अभियंता असून त्यांनी कॉर्नेल व जॉर्जिया टेक येथून आधुनिक व्यवस्थापन व व्यावसायिक अभ्यासाच्या पदव्या प्राप्त केल्या आहेत.
श्री. वेदनारायणन शेषाद्री हे महिंद्रा फायनान्सच्या इन्शुरन्स ब्रोकिंग उपकंपनी असलेल्या महिंद्रा इन्शुरन्स ब्रोकर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख अधिकारी आहेत. फेब्रुवारी २०२१ मध्ये महिंद्रा इन्शुरन्स ब्रोकर्स लिमिटेडमध्ये रुजू होण्यापूर्वी श्री. वेदनारायणन हे चोलामंडलम एमएस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते.
वेद हे एकूण २८ वर्षांचा अनुभव असलेले मॅनेजमेंट प्रोफेशनल असून, त्यापैकी १८ वर्षे रिटेल बँकिंग, जीवन आणि जीवनरहित विमाच्या विविध जबाबदाऱ्या हाताळत त्यांनी बीएफएसआय क्षेत्रामध्ये काम केले. .
वाहन विक्री क्षेत्रात आयशर मोटर्स लिमिटेडमधून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि पुढे बिल्ट (बल्लारपूर इंडस्ट्रीज लिमिटेड) मध्ये व्यवसाय विकास (बिझनेस डेव्हलपमेंट) व अंतर्गत सल्ला (इंटर्नल कन्सल्टींग) या जबाबदाऱ्या पार पाडत २००३ मध्ये आयसीआयसीआय बँकेत ते रुजू झाले. रिटेल बँक क्षेत्रात त्यांनी रिटेल लायॅबिलिटीज आणि असेट्स अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका बजावत, मॉरगेज व्यवसायासाठी उत्पादन विकास (प्रॉडक्ट डेव्हलपमेंट) आणि क्रॉस सेल विभागाचे नेतृत्व केले.
२००७ मध्ये त्यांनी टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स सोबत धोरणात्मक नियोजन (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग), भागीदारी संपादन (पार्टनरशिप अक्विझिशन) यामधील अनेक वरिष्ठ पदांवर काम केले आहे, तसेच टाटा एआयए लाईफच्या पूर्व विभागाचे (ईस्टर्न झोनचे) नेतृत्व केले आहे. २०१२ मध्ये वेद हे मुख्य विपणन अधिकारी म्हणून चोला एमएस जनरल इन्शुरन्स ही मुरुगप्पा समूहाची नॉनलाईफ कंपनी जॉईन केली. चोला एमएस मधील आपल्या ८ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी मजबूत रिटेल फ्रॅंचाईजीची बांधणी केली आणि २०२० मध्ये अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी आरोग्य विमा (हेल्थ इन्शुरन्स) एसबीयु उभारणीसहित अनेक जबाबदाऱ्या हाताळल्या.
व्यवसायाने इंजिनीयर असलेल्या वेद यांनी एमडीआय गुरगाव येथून आपले पीजीडीएम चे शिक्षण पूर्ण केले असून, इन्सीड फ्रान्स येथून ऍडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्राम (एएमपी) चे शिक्षण घेतले आहे.
मूळचे इंजिनिअर असलेले अतुल २८ वर्षांच्या बिझनेस (व्यवसाय) आणि एचआर (मानव संसाधन) मधील संमिश्र अनुभवासहीत लोकांचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेले एचआर प्रोफेशनलआहेत. हा प्रदीर्घ अनुभव म्हणजे धोरणात्मक विचारक्षमता आणि सर्वोत्तम कामगिरीतून अपेक्षित परिणाम साध्य करण्याच्या क्षमतेचे चांगले मिश्रण आहे.
त्यांच्या एचआर मधील मागील १९ वर्षांमध्ये त्यांनी महिंद्रा अँड महिंद्रा (एम अँड एम) मध्ये विविध व्यवसायांच्या एचआर विभागाचे नेतृत्व केले आहे. यामध्ये ऑटोमोबाईल्स, ट्रक्स आणि बसेस, ट्रॅक्टर्स, डीजी सेट्स, बांधकाम यंत्रसामग्री आणि कृषी व्यवसाय यांच्यासाठी एचआर विभागांचा समावेश आहे. या प्रवासादरम्यान त्यांनी स्ट्रॅटेजिक व ट्रान्सफॉर्मेशनल एचआर मॅनेजमेंट, ऑर्गनायझेशन डिझाईन, चेंज मॅनेजमेंट, टॅलेंट मॅनेजमेंट, ओडी, कॅपॅबिलिटी बिल्डिंग, एम्प्लॉई एंगेजमेंट, एचआर शेअर्ड सर्व्हिसेस, आणि पीएमएस या गोष्टी हाताळल्या आहेत.
सध्या ते देशभरात २०,००० पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये मानव संसाधन आणि प्रशासन (एचआर अँड एडमिन) विभागाचे उपाध्यक्ष (व्हाईस प्रेसिडेंट) आहेत.
ते इंटरनॅशनल कोच फेडरेशनतर्फे प्रमाणित प्रोफेशनल कोच (पीसीसी) असून, एमबीटीआय मध्ये देखील त्यांनी प्रमाणपत्र प्राप्त केले आहे.
लोकांना प्रशिक्षण देणे व त्यांच्या प्रगतीसाठी त्यांना सक्षम बनवणे त्यांना आवडते.
Ruzbeh is the President – Group Human Resources & Communications since April 2020. He is also responsible for Corporate Social Responsibility and Corporate Services. He is a member of Mahindra’s Group Executive Board.
Ruzbeh joined the Mahindra Group in 2007, as Executive Vice President – Corporate Strategy, heading the Group's Strategy function. He became the Chief Brand Officer of the Group. During that time he spearheaded Mahindra's entry into racing and led the development of the Group's brand position and core purpose, 'Rise'. He then moved to head International Operations for the Automotive and Farm Equipment Sectors of M&M. Subsequentially he led Group Corporate Brand, PR and Communications, Ethics as well as Mahindra’s Racing team.
Ruzbeh joined the Mahindra Group in 2007, as Executive Vice President – Corporate Strategy, heading the Group's Strategy function. He became the Chief Brand Officer of the Group. During that time he spearheaded Mahindra's entry into racing and led the development of the Group's brand position and core purpose, 'Rise'. He then moved to head International Operations for the Automotive and Farm Equipment Sectors of M&M. Subsequentially he led Group Corporate Brand, PR and Communications, Ethics as well as Mahindra’s Racing team.
Post his Master's degree, Ruzbeh worked with Hindustan Lever and Unilever for close to 22 years, across geographies, in marketing, customer management and general management. This included stints as Marketing Manager – Home and Personal Care (with Unilever Central Asia), Regional Manager – Western India (with Hindustan Lever), Vice President – Customer Development (with Unilever’s Africa Regional Group), and Customer Development Director on the Board of Unilever Maghreb.
Email: [email protected]
Toll free number: 1800 233 1234 (सोमवार-रविवार, सकाळी 8 ते रात्री 10)
(Except National Holidays)
WhatsApp number: 7066331234
इथे क्लिक करा सर्वात जवळील महिन्द्रा फायनान्स शाखा शोधण्यासाठी
© महिन्द्रा फायनान्स
द्वारा डिझाइन आणि विकसित इव्होल्यूशनको
For illustration purpose only
Total Amount Payable
50000
This document has been prepared on the basis of publicly available information, internally developed data and other sources believed to be reliable. Mahindra & Mahindra Financial Services Ltd, ('MMFSL') does not warrant its completeness and accuracy. Whilst we are not soliciting any action based upon this information, all care has been taken to ensure that the facts are accurate and opinions given are fair and reasonable. This information is not intended as an offer or solicitation for the purchase or sale of any financial instrument receipt of this information should rely on their own investigations and take their own professional advice. Neither MMFSL nor any of its employees shall be liable for any direct, indirect, special, incidental, consequential, punitive or exemplary damages, including lost profits arising in any way from the information contained in this material.
MMFSL and its affiliates, officers, directors, and employees, including people involved in the preparation or issuance of this material, may vary from time to time, have long or short positions in, and buy or sell the securities thereof, of the company mentioned herein. MMFSL may at any time solicit or provide, credit, advisory or other services to the issuer of any security referred to herein. Accordingly, information may be available to MMFSL, which is not reflected in this material, and MMFSL may have acted upon or used the information prim to, or immediately following its publication.
Your form has been submitted successfully.
Our representative will get in touch with you shortly.