ट्रॅक्टर कर्ज
मोजा
आत्ता अर्ज करा
उपयोगिता वाहन कर्जे
Calculators
कार कर्ज
व्यावसायिक वाहन कर्ज
पूर्व-मालकीची कार कर्जे
तीनचाकी वाहन कर्जे
दुचाकी कर्जे
गृह कर्ज
वैयक्तिक कर्ज
आढावा
Stay ahead of the curve in this competitive world by choosing the MF SME loan that suits your need.
अधिक जाणून घ्या
Make informed decisions and ensure sound financial planning with our wide range of financial solutions.
ईएमआयचा हिशोब करा
उत्कृष्ट ग्राहक सेवा पुरविण्याचा आमचा प्रयत्न असतो.
किमान ५, कमाल १००० शब्द
Submit
We acknowledge the receipt of your Query, Your Ticket no: We shall get back to you within 2 working days.
Q1 ट्रॅक्टर कर्ज घेण्यासाठी मला जमीन गहाण ठेवावी लागेल काय ?
नाही, जमीन गहाण न ठेवता ट्रॅक्टर कर्ज उपलब्ध आहे .
Q2 ट्रॅक्टरच्या कर्जासाठी महिंद्र फायनान्सची निवड करण्याचे काय लाभ आहेत?
सोयीस्कर : कमीतकमी दस्तऐवज
उपलब्दता : ग्रामीण व अर्धनागरी भारतात शाखांचे मजबूत जाळे
वेग : दोन कार्य दिवसात कर्जाला मंजुरी
Q3 ट्रॅक्टर कारच्या कर्जासाठी मी महिन्द्रा फायनान्सला कसे निवडावे ?
आपल्या जवळच्या महिंद्र फायनान्स शाखेत संपर्क साधा किंवा भेट द्या. आपण ऑनलाईन अर्ज सुद्धा सादर करू शकता, आम्ही आपल्याशी लवकरच संपर्क साधू.
Q4 कमीतकमी व जास्तीतजास्त किती ट्रॅक्टर कर्ज दिले जाईल?
कोणतीही किमान व कमाल रक्कम नाही. आपल्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी ट्रॅक्टर कर्जाच्या रकमा सानुकूल करण्यात येतील.
Q5 ट्रॅक्टर कर्जासाठी मुदतीचे किती पर्याय उपलब्ध आहेत?
किमान कालावधी ३ महिने व कमाल कालावधी ५ वर्षे आहे.
Q6 आगाऊ रक्कम (down payment)म्हणजे काय ?
आगाऊ रक्कम (down payment) ही वाहनाची किंमत आणि ट्रॅक्टरची कर्जाची रक्कम या मधील समतोल आहे. तथापि, आपण वित्त पर्यायावर आणि आपल्या वैयक्तिक गरजांवर अवलंबून आपण अधिक आगाऊ रक्कम (down payment) देण्याचा पर्याय निवडु शकता.
Q1: बहुउपयोगी वाहनांसाठी जास्तीत जास्त किती अर्थसहाय्य उपलब्ध होऊ शकते ?
वाहनाची किंमत व पार्श्वभूमीनुसार कर्ज पात्रतेवर अर्थसहाय्याची रक्कम अवलंबून आहे.
Q2: आपण फक्त बहुउपयोगी वाहनासाठीच कर्ज देता की सुट्या उपकरणांसाठी सुद्धा देता ?
उपकरणाच्या मूळ उत्पादका (OEM) द्वारे प्रमाणित जोडणी असल्याशिवाय आम्ही कोणत्याही सुट्या उपकरणासाठी कर्ज देत नाही.
Q3: बहुउपयोगी वाहन कर्जाचा व्याज दर किती आहे ?
देऊ केलेल्या व्याजाचा दर हा वाजवी असतो व तसेच तो ग्राहकाचे ठिकाण, कर्जाची मुदत व ग्राहकाची पार्श्वभूमी ह्यावर अवलंबून असतो.
Q4: कर्जाचा परतफेडीचा कमाल कालावधी किती आहे ?
महिन्द्रा फायनान्स कडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीचा कमाल कालावधी पाच वर्षे असतो.
Q5: कर्ज मंजूर व्हायला किती कालावधी लागतो ?
आवश्यक असलेले सर्व दस्तऐवज सादर केल्यावर मंजुरी एका कामकाजीय दिवसात देण्यात येते. आवश्यक दस्तऐवजांच्या माहितीसाठी इथे क्लिक करा. (‘आवश्यक विभाग दस्तऐवज’ मध्ये स्क्रोल करा )
Q6: माझ्या माहितीसाठी रीतसर भरलेल्या कराराची प्रत आपण मला देणार का ?
होय, कर्ज दिल्यानंतर, केलेल्या कराराची प्रती आपणास देण्यात येईल.
Q7: बहुउपयोगी वाहनासाठी कर्ज घेण्यास आपणास संपर्श्विक(दुसऱ्या) तारणाची गरज आहे काय ?
नाही आम्हाला कोणत्याही संपर्श्विक (दुसऱ्या) तारणाची गरज नाही.
Q8: आपणास जामिनाची नेहमीच गरज असते काय ?
नेहमीच नाही.
Q9: माझे पुढील तारखेचे धनादेश मला बदलायचे असतील तर काय करावे लागेल ?
ह्यासाठी, प्रथम आमच्या सर्वात जवळच्या शाखांना आपण विनंती करू शकता. आमच्या शाखांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा. येथे क्लिक करा.
Q10 मासिक हप्ते मी कुठल्याही शाखेत भरू शकतो काय ?
होय, आपण समिकृत मासिक हप्ते(ईएमआय) आमच्या कुठल्याही शाखेत भरू शकता. आमच्या शाखांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Q11 मला खाते आधी बंद करायचे असल्यास , त्यासाठी प्रक्रिया काय आहे ?
अर्थसहाय्य करारानुसार, खाते मुदतीआधी बंद होणे अपेक्षित नाही. मात्र आपल्या विनिर्दिष्ट विनंतीला अनुसरुन, आपणास आवश्यक भरणा रक्कम कळवू आणि ती प्रेषित केल्यावर आवश्यक ते समाप्ती दस्तऐवज आपणास दिले जातील.
Q12 माझ्या कराराचा कालावधी संपल्यानंतर मी काय करायला हवे ?
करारानुसार शेवटचा हप्ता व अन्य देय रकमांचा भरणा केल्यावर, प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या(RTO) दस्तऐवजांच्या सहित सर्व दस्तऐवज जारी करून आपल्या पत्त्यावर वितरित करण्यात येतील.
Q13 समाप्तीच्या वेळेस मला कोणते दस्तऐवज लागतील?
समाप्ती पत्र
प्रादेशिक परिवहन कार्यालयाला संबोधित ना हरकत प्रमाणपत्र
विम्याची मान्यता रद्द करण्याचे पत्र
Q14 पत्ता बदलायचा असल्यास मी काय करावे ? मी कोणाला कळवावे ?
आपण ज्या शाखेत नेहमी व्यवहार करता, त्या शाखेस आपण पत्त्यात झालेला बदल सूचित करू शकता. तसेच आपण आम्हाला ह्या ईमेल वर कळवू शकता.
Q15 तृतीय पक्ष विमा पुरेसा आहे काय ?
नाही, सर्वसमावेशक विमा कवच आवश्यक आहे.
Q16 आपल्या विमा एजंटकडुनच विमा घ्या, असा आपला आग्रह असतो काय ? मी माझ्या विम्याची जबाबदारी स्वत: घेऊ शकतो काय ?
आम्ही असा कोणताही आग्रह धरत नाही, पण कृपया सर्वसमावेशक विमा वेळेवर विकत घेण्याची व्यवस्था करावी व पॉलीसीची(विम्याची) पृष्ठांकन प्रत आम्हाला आणून देण्याची काळजी घ्यावी. मात्र, मासिक हप्त्यांच्या सोबतच आपण विम्याचा हप्ता भरल्यास आम्ही आपल्या विम्याच्या गरजांची काळजी घेऊ.
Q17 छोट्या व मध्यम वाहनांच्या कर्जाची मुदत किती असते ?
प्रत्येक कर्जदाराला त्याच्या गरजेनुसार सोयीची व सुखादायक परतफेडीची नाविन्यपूर्ण व परिवर्तनशील मुदत आम्ही आखून देत असतो. उत्पादनाच्या प्रकारानुसार आम्ही मासिक, त्रैमासिक व अर्धवार्षिक परतफेडीची वेळापत्रके आखून देतो.
Q1 आपण सर्व प्रकारच्या चारचाकी कार्सना कर्ज देता काय ?
आम्ही बाजारपेठेतील उपलब्ध जवळपास सर्व प्रवासी व बहुउपयोगी वाहनांना वित्तपुरवठा करतो.
Q2 चारचाकी कारसाठी कमाल कर्ज मर्यादा किती आहे ?
वाहन कर्जाची रक्कम ही खरेदी केली जाणारे वाहन व ग्राहकाच्या पार्श्वभूमीवर अवलंबून आहे. एक्स - शोरूम किमतीच्या १००% पर्यंत कर्ज उपलब्ध आहे.
Q3 आपण फक्त चारचाकी वाहनासाठीच कर्ज देता की सुट्या उपकरणांसाठी सुद्धा देता ?
प्रमाणित जोडणी असल्याशिवाय आम्ही कोणत्याही सुट्या उपकरणासाठी कर्ज देत नाही.
Q4 चारचाकी कार कर्जाचा व्याज दर किती आहे ?
देऊ केलेले व्याजदर हे वाजवी दर व ग्राहकाचे ठिकाण, कर्जाची मुदत व ग्राहकाची पार्श्वभूमी ह्यावर अवलंबून आहेत.
Q5 आपला देकार हा सरसकट की घटत्या शिल्लक रकमेच्या आधारावर आहे ?
आमचा देकार सरसकट शिल्लक आधारावर आहे.
Q6 चारचाकी कार कर्जाचा परतफेडीचा कमाल कालावधी किती आहे ?
महिन्द्रा फायनान्स कडून घेतलेल्या वाहन कर्जाच्या परतफेडीचा कमाल कालावधी 5 वर्षे असतो.
Q7 कर्ज मंजूर व्हायला किती कालावधी लागतो ?
आवश्यक असे, सर्व दस्तऐवज सादर केल्यावर मंजुरी एका कामकाजीय दिवसात देण्यात येते. आवश्यक दस्तऐवजांच्या माहितीसाठी इथे क्लिक करा.
Q8 माझ्या माहितीसाठी रीतसर केलेल्या कराराची प्रत मला आपण द्याल काय ?
होय, केलेल्या करारांच्या प्रती आपणास देण्यात येतील.
Q9 आपणास संपर्श्विक तारणाची गरज आहे काय ?
नाही, आम्हाला कोणत्याही संपर्श्विक तारणाची गरज नाही.
Q10 आपणास जामिनाची नेहमीच गरज असते काय ?
नेहमी लागेलच असे नाही; आमच्या निकषानुसार व ग्राहकाच्या आर्थिक स्थितीवर ते अवलंबून असते.
Q11 माझे पुढील तारखेचे धनादेश मला बदलायचे करावयाचे असतील तर काय करावे लागेल ?
ह्यासाठी , प्रथम आमच्या सर्वात जवळच्या शाखांना आपण विनंती करू शकता. आमच्या शाखांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Q12 मासिक हप्ते मी कुठल्याही शाखेत भरू शकतो काय ?
होय, आपण समिकृत मासिक हप्ते(EMIs) कुठल्याही शाखेत भरणा करू शकता. आमच्या शाखांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा. तसेच आपण ऑनलाईन सुद्धा हप्ते भरू शकता. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Q13 मला खाते आधी बंद करायचे असल्यास ती प्रक्रिया कशी आहे ?
आपले खाते आधी बंद करण्यासाठी आपण आपल्यासाठी सर्वात जवळ असणाऱ्या शाखेत विनंती करू शकता. आपल्या विनिर्दिष्ट विनंतीनुसार आम्ही आपणास कर्जफेड रक्कम सादर करू (त्यामध्ये मुदतपूर्व बंद शुल्क समाविष्ट असेल ). सदर रक्कम भरणा केल्यावर आवश्यक ते समाप्ती दस्तऐवज जारी करण्यात येतील.
Q14 माझ्या कराराचा कालावधी संपल्यानंतर मी काय करायला हवे ?
करारानुसार शेवटचा हप्ता व अन्य देय रकमांचा भरणा केल्यावर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या दस्तऐवजांच्या सहित सर्व दस्तऐवज जारी करून आपल्या पत्त्यावर सोपविण्यात येतील.
Q15 समाप्त होताना मला कोणते दस्तऐवज लागतील.
Q16 पत्ता बदलायचा असल्यास मी काय करावे ? मी कोणाला कळवावे ?
आपण ज्या शाखेत नेहमी व्यवहार करता, त्या शाखेस आपण पत्त्यात झालेला बदल सूचित करू शकता. तसेच आपण आम्हाला [email protected] ह्या ईमेल वर कळवू शकता.
Q17 तृतीय पक्ष विमा पुरेसा आहे काय ?
Q18 आपल्या विमा एजंटकडुनच विमा घ्या, असा आपला आग्रह असतो काय ? मी माझ्या विम्याची जबाबदारी स्वत: घेऊ शकतो काय ?
आम्ही असा कोणताही आग्रह धरत नाही, पण कृपया सर्वसमावेशक विमा वेळेवर विकत घेण्याची व्यवस्था करावी व पॉलीसीच्या पृष्ठांकन प्रत आम्हाला आणून देण्याची काळजी घ्यावी. मात्र मासिक हप्त्यांच्या सोबतच आपण विम्याचे अधिमुल्य अदा केल्यास आम्ही आपल्या विम्याच्या गरजांची काळजी घेऊ.
Q1 आपण व्यावसायिक वाहनांना व बांधकाम उपकरणांना आर्थिक साहाय्य करता काय ?
होय, आम्ही सर्व महत्वाच्या व्यावसायिक वाहनांना व बांधकाम उपकरणांना आर्थिक साहाय्य करतो.
Q2 आपण मुख्य भागाच्या बांधणीसाठी सुद्धा आर्थिक सहाय्य करता काय ?
उत्पादनाच्या नीतीमध्ये परिभाषित केल्यानुसार काही विशिष्ट पार्श्वभूमीच्या ग्राहकांना मुख्य भागाच्या बांधणीसाठी आर्थिक साहाय्य पुरवतो.
Q3 आर्थिक सहाय्याची कमाल मर्यादा किती आहे ?
वित्तीय सहाय्याची कमाल मर्यादा ग्राहकाची पार्श्वभूमी व उत्पादनावर अवलंबून आहे.
Q4 आपला देकार हा सरसकट की घटत्या शिल्लक रकमेच्या आधारावर आहे ?
आमचा व्याजदर मासिक घटत्या शिल्लक रकमेवर आधारीत आहे.
Q5 अतिरिक्त सेवा शुल्क किंवा दस्तऐवज शुल्क आहे काय ?
वैधानिक प्राधिकरणाकडून आकारल्या जाणाऱ्या उत्पादन विशिष्ट दस्तऐवज व मुद्रांक शुल्काची वसुली आम्ही करतो व ते करार करण्याच्या ठिकाणावर अवलंबून आहे.
Q6 कर्ज मंजूर व्हायला किती कालावधी लागतो ?
आवशयक असे सर्व दस्तऐवज सादर केल्यावर मंजुरी एका कामकाजीय दिवसात देण्यात येते.
Q7 माझ्या माहितीसाठी रीतसर केलेल्या कराराची प्रत मला आपण द्याल काय ?
Q8 आपणास जामिनाची नेहमीच गरज असते काय ?
ग्राहकाच्या पार्श्वभूमीनुसार व योजनेच्या तरतुदीनुसार जामीन किंवा सहकार्जदाराची गरज पडते.
नाही, आम्हाला कोणत्याही संपर्श्विक तारणाची गरज नाही
Q10 आपले वाहन उत्पादक / वितरकांशी मिलाफ आहे काय ?
होय, विविध ठिकाणी विविध कालावधीसाठी अनेक उत्पादक / वितरकांशी विशेष प्रवर्तन व मिलाफ करण्यात आला आहे.
Q11 मी कोणत्याही वेळी वितरक बदलू शकतो काय ?
होय, आपण तसे करू शकता. विक्री पश्चात उत्तम सेवेसाठी आपल्या व्यवसायाच्या किंवा निवासस्थानाच्या जवळ असलेले प्रतिनिधी निवडणे कधीही उत्तम.
Q12 अर्थसहाय्याची रक्कम घटविण्यासाठी मी मोठ्या प्रमाणात प्रदाने करू शकतो काय व त्यामुळे परतफेडीची सुधारित पुनर्रचना करून मला मिळेल काय ?
आम्ही मोठ्या प्रमाणात प्रदाने स्वीकारतो. मात्र अतिरिक्त रक्कम एका निलंबन खात्यात जमा करण्यात येते व कर्जाच्या शिल्लक रकमेत किंवा अंतर्गत परताव्याच्या दरात कोणतीही घट होणार नाही.
Q13 मी मासिक हप्ते कुठल्याही शाखेत भरू शकतो काय ?
होय, आपण मासिक हप्ते कुठल्याही शाखेत भरू शकता.
Q14 जिथे आपल्या शाखा नसतील तेथील बॅंकेवरील काढलेला धनादेश मी आपणास देऊ शकतो काय ?
होय. मात्र अशा धनादेशाच्या वसुलीसाठी वटणावळ आकारली जाईल.
Q15 आपण मला खात्याचे विवरण कधी पाठवणार ?
आपल्याकडून विनंती प्राप्त झाल्यावर आपणास खात्याचे विवरण पाठविण्यात येईल.
Q16 पत्ता बदलायचा असल्यास मी काय करावे ? मी कोणाला कळवावे ? कोणाला सूचना द्यावी ?
ज्या शाखेत आपण सामान्यतः व्यवहार करता, त्या शाखेत आपण पत्त्यातील बदल कळवावा.
संबंधित प्राधिकरणाने विहित केलेल्या नियमानुसार सर्वसमावेशक विमा अनिवार्य आहे.
आमच्याकडे आमची अंतर्गत महिंद्र विमा दलाल लिमिटेड ही कंपनी कार्यरत असून ती आपल्या विम्याच्या गरजांचा विचार करून आपणास सर्वोत्तम विमा योजना देऊ करेल.
Q19 व्यावसायिक वाहनासाठी मी अर्थसहाय्य कसे मिळवू शकतो?
आमचे कार्यकारी कर्मचारी आपणास दस्तऐवजांची व वाहनाची बोली याबाबत माहिती देतील व आपणाकडून ती घेऊन आमच्या कर्ज पथकाला अग्रेषित करतील. कर्ज मंजुरी नंतर आमचे कार्यकारी, कर्मचारी कर्ज करार करण्यासाठी व पुढील दिनांकाचे स्वाक्षरीत धनादेश घेण्यासाठी आपल्या निवासस्थानी / व्यवसायाच्या ठिकाणी येऊन संबंधित प्रतिनिधीला वाहन विमोचन आदेश देतील.
Q20 बांधकाम उपकरणांसाठी मी अर्थसहाय्य कसे मिळवू शकतो?
आमचे कार्यकारी कर्मचारी आपणास दस्तऐवजांची व वाहनाची बोली याबाबत माहिती देतील व आपणाकडून ती घेऊन आमच्या कर्ज पथकाला अग्रेषित करतील. कर्ज मंजुरी नंतर आमचे कार्यकारी कर्मचारी कर्ज करार करण्यासाठी व पुढील दिनांकाचे स्वाक्षरीत धनादेश घेण्यासाठी आपल्या निवासस्थानी / व्यवसायाच्या ठिकाणी येऊन संबंधित प्रतिनिधीला वाहन विमोचन आदेश देतील.
Q1 वापरलेल्या चारचाकी कारच्या कर्जासाठी मी महिन्द्रा फायनान्स कसे निवडावे ?
आपल्या जवळच्या महिन्द्रा फायनान्स शाखेत संपर्क साधा किंवा भेट द्या. आपण ऑनलाईन अर्ज सुद्धा सादर करू शकता, आम्ही आपल्याशी लवकरच संपर्क साधू.
Q2 वापरलेल्या चारचाकी कारच्या कर्जासाठी पात्रतेचे काय निकष आहेत ?
महिन्द्रा फायनान्स कडून वापरलेल्या चारचाकी कारच्या कर्जासाठी पात्रता ही व्यक्तिगत पार्श्वभूमी व उत्पादनावर अवलंबून असेल. सर्व कर्जे देण्याबाबत कंपनी आपला संपूर्ण स्वेच्छाधिकार वापरेल.
Q3 कमीतकमी व जास्तीतजास्त किती कर्ज देता येईल ?
वाहनाचे वय व स्थिती व व्यक्तीच्या परतफेड क्षमतेवर अवलंबून आहे.
Q4 वापरलेल्या चारचाकी कारच्या कर्जासाठी मुदतीचे किती पर्याय उपलब्ध आहेत ?
वाहनाचे वय व स्थिती नुसार किमान १ वर्ष व कमाल ५ वर्षे.
Q5 वापरलेल्या चारचाकी कारच्या कर्ज मंजूर होण्यासाठी किती कालावधी लागेल ?
आमचे १२०० पेक्षा अधिक ठिकाणी शाखांचे जाळे असून आमच्या कर्मचाऱ्यांच्या त्वरित व सुज्ञ निर्णयक्षमतेमुळे वापरलेल्या चारचाकी कारच्या कर्जाचे दस्तऐवज तयार करण्याची प्रक्रिया सोपी व जलद आहे.
Q1 आपण सर्व प्रकारच्या तीन चाकी वाहनांना कर्ज देता काय ?
आम्ही भारतीय बाजारपेठेतील उपलब्ध जवळपास सर्व तीन चाकी वाहनांना वित्तपुरवठा करतो.
Q2 तीन चाकी साठी कमाल कर्ज मर्यादा किती आहे ?
वाहन कर्जाची रक्कम ही खरेदी केली जाणारे वाहन व ग्राहकाच्या पार्श्वभूमीवर अवलंबून आहे.
Q3 आपण फक्त वाहनासाठी कर्ज देता की सुट्या उपकरणांसाठी सुद्धा देता ?
Q4 ऑटो रिक्षा कर्जाचा व्याज दर किती आहे ?
देऊ केलेले व्याजदर हे वाजवी व ग्राहकाचे ठिकाण, कर्जाची मुदत व ग्राहकाची पार्श्वभूमी ह्यावर अवलंबून आहेत.
Q5 तीन चाकी कार कर्जाचा परतफेडीचा कमाल कालावधी किती आहे ?
महिन्द्रा फायनान्स कडून घेतलेल्या तीन चाकी वाहन कर्जाचा कमाल कालावधी चार वर्षे असतो.
आवश्यक असे सर्व दस्तऐवज सादर केल्यावर मंजुरी एका कामकाजीय दिवसात देण्यात येते. आवश्यक दस्तऐवजांच्या माहितीसाठी इथे क्लिक करा.
Q7 आपणास संपर्श्विक(दुय्यम) तारणाची गरज आहे काय ?
नाही, आम्हाला कोणत्याही संपर्श्विक (दुय्यम) तारणाची गरज नाही.
नेहमीच नसते; आमच्या क्रेडिट निकषानुसार व ग्राहकाच्या आर्थिक स्थितीवर ते अवलंबून असते.
Q9 माझे पुढील तारखेचे धनादेश मला बदलायचे असतील तर काय करावे लागेल ?
ह्यासाठी प्रथम आमच्या सर्वात जवळच्या शाखांना आपण विनंती करू शकता. आमच्या शाखांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
होय, आपण मासिक हप्ते (EMI) कुठल्याही शाखेत भरू शकता. आमच्या शाखांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा तसेच आपण ऑनलाईन सुद्धा हप्ते भरू शकता.
Q11 मला खाते आधी बंद करायचे असल्यास ती प्रक्रिया कशी आहे ?
करारानुसार शेवटचा हप्ता व अन्य देय रकमांचा भरणा केल्यावर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या दस्तऐवजांच्या सहित सर्व दस्तऐवज जारी करून आपल्या पत्त्यावर पोचविण्यात येतील.
Q13 समाप्त होताना मला कोणते दस्तऐवज लागतील.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र
नाही, सर्वसमावेशक विमा कवच(comprehensive coverage) आवश्यक आहे.
Q17 माझ्या माहितीसाठी रीतसर भरलेल्या कराराची प्रत आपण मला देणार का ?
होय, केलेल्या कराराची प्रती आपणास देण्यात येईल.
Q1 मी किती कर्ज घेऊ शकतो ?
आपल्याला दुचाकी वाहनाच्या चलन किंमतीच्या, 85% सर्व कर समावेशक किंमती (ऑन रोड किंमत) इतके वित्त कर्ज मिळू शकते.
Q2 मुदतीचे किती पर्याय आहेत ?
मुदत पर्याय ३६ महिन्यापर्यंत उपलब्ध आहे.
Q3 दुचाकी वाहनाचे संपूर्ण कर्ज मुदतीपूर्वी परतफेड कारण्यासाठी मला काही पर्याय आहे काय ?
होय, किरकोळ मुदतपूर्व शुल्क दर भरून आपण तसे करू शकता.
Q4 दुचाकी वाहनाच्या कर्ज प्रक्रीयेसाठी किती कालावधी लागेल ?
दुचाकी वाहनाच्या कर्ज प्रक्रीयेसाठी दोन दिवस लागतील.
Q5 उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय मला दुचाकी कर्ज मिळू शकेल काय ?
अन्य सर्व दस्तऐवज असतील, तर आपल्याला दुचाकी कर्ज मिळू शकेल.
Q1: गृह कर्ज योजनेत कुठल्या प्रकारच्या घरांसाठी अर्थसहाय्य देण्यात येते ?
स्थायी स्वरूपाच्या व वैध मालकी असलेल्या स्वतंत्र घरे व सदनिका यांच्या खरेदीसाठी लागू आहे. अशा घरांना नागरी प्राधिकरणाकडून बांधकाम परवानगी मिळालेली असणे आवश्यक आहे व ज्या घरांचे बांधकाम सुरु आहे किंवा पूर्ण होऊन ती निवासयोग्य झाली आहेत अशा घरांसाठी कर्ज देण्यात येते.
Q2 गृह कर्जासाठी कोणत्या प्रकारचे तारण आवश्यक आहे.
कर्ज घेत असलेल्या घराचे समन्याय किंवा साधे नोंदणीकृत गहाणखत हे तारण आवश्यक आहे. घराच्या मालकी विषयीच्या सादर केलेल्या / उपलब्ध करून दिलेल्या दस्तऐवजांच्या स्वरूपावर गहाणखताचे स्वरूप ठरते. अर्जदाराने सादर केलेल्या दस्तऐवजांची प्राथमिक परीक्षा केल्यावर आमचे विधी अधिकारी आवश्यक असलेल्या गहाण खताच्या स्वरूपाविषयी आपल्याला माहिती देतील.
Q3 गृह कर्जासाठी व्याज दराचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत ?
मुद्रा बाजाराची स्थिती व दर तीन वर्षानी सुधारणेच्या अधीन राहून प्रथम वितरणाचा वेळेस लागू असलेला व्याजदर लागू राहिल व कर्जाच्या कालावधीत दर बदलणार नाही.
वेतनदार अर्ध नागरी व नागरी ग्राहकांच्या साठी बदलता ::
मुद्रा बाजाराच्या स्थितीनुसार दर वेळोवेळी बदलतील व त्याची वेळोवेळी सूचना देण्यात येईल.
Q4 गृहकर्जाची परतफेड मी कशी करू शकतो ?
आपल्या परतफेड क्षमतेनुसार मुद्दल व व्याज समाविष्ट असलेल्या मासिक / त्रैमासिक / अर्धवार्षिक सामिकृत हप्त्यांमध्ये कर्ज परतफेड करता येईल.
रोख / धनादेश / धनाकर्ष यांच्या स्वरुपात महिन्द्रा हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या कोणत्याही शाखेत कर्जाची परतफेड करणे शक्य आहे. तसेच महिन्द्रा हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या प्राधिकृत संग्रहण केंद्रात सुद्धा परतफेड करता येईल.
Q5 मुदतीआधी मी कर्जाची परतफेड करू शकतो काय ?
मुदतीआधी कर्जाची परतफेड करता येते व महिन्द्रा हाऊसिंग फायनान्स त्यासाठी पूर्व विमोचन शुल्क आकारणार नाही.
Q1: व्यक्तिगत कर्ज प्राप्त होण्यास मला किती कालावधी लागेल ?
फक्त 2 कामकाजीय दिवस लागतील.
Q2 व्यक्तिगत कर्ज प्राप्त करण्यासाठी माझे बँकेत खाते असणे गरजेचे आहे काय ?
होय.
Q3 मला व्यक्तिगत कर्ज कुठे प्राप्त होऊ शकेल?
आपल्याला महिन्द्रा फायनान्सच्या कोणत्याही शाखेतून व्यक्तिगत कर्ज घेता येईल. आपल्या जवळील शाखा शोधण्यासाठी इथे क्लिक करा.
Q4 व्यक्तिगत कर्जाची किमान व कमाल रक्कम किती मिळू शकेल ?
अर्जदाराच्या पात्रतेनुसार कर्जाची रक्कम आधारित असेल.
Q5 जास्तीत जास्त किती कालावधीपर्यंत कर्ज परतफेड करता येऊ शकते?
कमाल परतफेडीचा कालावधी २ वर्षे आहे.
Q6 व्यक्तिगत कर्जाची मी कशी परतफेड करू शकतो ?
स्थानिक पुढील दिनांकाचे धनादेश, इलेक्ट्रोनिक जमा सेवा, किंवा वेतनातून कपात करून व्यक्तिगत कर्जाची परतफेड करता येईल.
Q7 मला व्यक्तिगत कर्जाची रक्कम कशी अदा केली जाईल ?
धनादेशाद्वारे किंवा आपल्या खात्यात थेट जमा करण्यात येईल.
Q8 मी व्यक्तिगत कर्ज मुदतपूर्व बंद करू शकतो का ?
होय, किरकोळ मुदतपूर्व बंद दराने आपण व्यक्तिगत कर्ज मुदतपूर्व बंद करू शकता.
Q1 प्रकल्पाला आर्थिक साहाय्य घेण्यासाठी मी महिन्द्रा फायनान्सशी कसा संपर्क साधावा ?
०२२- ६६३२-७९४० ह्या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता. आपल्या शंका आपण [email protected] ह्या इमेल वर सुद्धा पाठवू शकता.
Q2 मी प्रकल्पासाठी किती अर्थ सहाय्य घेऊ शकतो ? प्रमाण कसे ठरविले जाते ?
आपली गरज, पत मूल्यमापन व परतफेडीची क्षमता ह्यावर प्रकल्प कर्जाचे प्रमाण अवलंबून आहे. मात्र रु ४० कोटी ही त्याची कमाल मर्यादा आहे.
Q3 माझ्या प्रोजेक्टला अर्थपुरवठा करताना तारण म्हणून काय स्वीकारले जाईल ?
आम्ही अनेक स्वरुपाची तारणे स्वीकारतो. ह्यामध्ये जमीन व स्थावर संपत्ती, कारखाना आणि यंत्रे, उपकरणे, मुदतठेवी, ठेव प्रमाणपत्रे, किसान विकास पत्रे, राष्ट्रीय बचत पत्रे, केंद्र व राज्य सरकारांनी जारी केलेल्या प्रतिभूती, सोने व अन्य रोख समतुल्य तारण, विमा पॉलिसी व अन्य तारणांचा समावेश आहे.
Q4 प्रोजेक्टसाठी कर्ज मंजूर होण्यासाठी किती कालावधी लागतो?
योग्य ते सर्व दस्तऐवज व माहिती सादर केल्यास १० कामकाजीय दिवसांमध्ये आपली कर्ज प्रक्रिया पूर्ण केली जाते.
Q5 मी प्रोजेक्टच्या कर्जाची परतफेड कशी करू शकतो?
तुम्ही सामान मासिक हप्ते, बुलेट रिपेमेंट किंवा बलूनिंग रिपेमेंट (तुमच्या व्यवसायाच्या आवश्यकतेवर आधारित) हे पर्याय निवडण्याची तुम्हाला लवचिकता दिली जाते. तसेच, पीडीसीज, इसीएस मॅनडेट किंवा इलेकट्रोनिक ट्रान्सफर्स हे पर्यायही स्वीकारले जातात.
Q6 मी प्रोजेक्टचे कर्ज मुदतीआधी परत फेडू शकेन का?
होय, तुम्ही बिझनेस कर्ज आधी देऊ शकता. मुदतीआधी आधी दिल्यावर भांडवली शिल्लक रकमेच्या २% शुल्क भरावे लागेल.
Q1 उपकरण आर्थिक साहाय्य घेण्यासाठी मी महिन्द्रा फायनान्सशी कसा संपर्क साधावा?
०२२- ६६३२-७९४० ह्या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता. आपल्या शंका आपण [email protected] ह्या इमेलवर सुद्धा पाठवू शकता.
Q2 मला उपकरण खरेदीसाठी किती अर्थ साहाय्य घेता येते? प्रमाण कसे ठरविले जाते?
आपली गरज, पत मूल्यमापन व परतफेडीची क्षमता ह्यावर उपकरण कर्जाचे प्रमाण अवलंबून आहे. मात्र रु २५ कोटी ही त्याची कमाल मर्यादा आहे.
Q3 माझ्या उपकरण खरेदी कर्जामध्ये तारण म्हणून कोणत्या गोष्टी स्वीकारल्या जाऊ शकतात?
आम्ही अनेक स्वरुपाची तारणे स्वीकारतो. ह्यामध्ये जमीन व स्थावर संपत्ती, कारखाने आणि यंत्रे, उपकरणे, मुदतठेवी, ठेव प्रमाणपत्रे, किसान विकास पत्रे, राष्ट्रीय बचत पत्रे, केंद्र व राज्य सरकारांनी जारी केलेले रोखे, सोने व अन्य रोख समतुल्य तारण, विमा पॉलिसी व अन्य तारणांचा समावेश आहे.
Q4 उपकरण खरेदी करण्यासाठी कर्ज मिळण्यास किती कालावधी लागेल?
सर्व बाबी योग्य असल्यास उपकरण खरेदी करण्यासाठी कर्जाची प्रक्रिया कामकाजाच्या १० दिवसांमध्ये पूर्ण करण्यात येईल.
Q5 माझ्या उपकरण खरेदी कर्जाची मी परतफेड कशी करावी?
(आपल्या व्यवसायाच्या गरजेनुसार) आपल्याला सामिकृत हप्ता, एकरकमी परतफेड किंवा बलुनिंग परतफेडीचे पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत. पुढील दिनांकाचे धनादेश, इलेक्ट्रॉनिक जमा प्रणाली सूचना किंवा इलेक्ट्रॉनिक हस्तांतरण हे परतफेडीचे मान्य स्वीकारार्ह मार्ग आहेत.
Q6 उपकरण कर्ज मी मुदतपूर्व परतफेड करू शकतो काय ?
होय, आपण प्रकल्प कर्जाची मुदतपूर्व परतफेड करू शकता. मात्र मुद्दल रकमेवर २% मुदतपूर्व बंद शुल्क लागू राहील.
Q1 निगमीय कर्जे घेण्यासाठी मी महिन्द्रा फायनान्सशी कसा संपर्क साधावा?
०२२- ६६३२-७९४० ह्या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता. आपल्या शंका आपण [email protected] ह्या इमेल वर सुद्धा पाठवू शकता .
Q2 मी निगमीय कर्जे करण्यासाठी किती अर्थ साहाय्य घेऊ शकतो? प्रमाण कसे ठरविले जाते?
आपली गरज, पत मूल्यमापन व परतफेडीची क्षमता ह्यावर निगमीय कर्जाचे प्रमाण अवलंबून आहे. मात्र रु २५ कोटी ही त्याची कमाल मर्यादा आहे.
Q3 माझ्या निगमीय कर्जामध्ये तारण म्हणून कोणत्या गोष्टी स्वीकारल्या जाऊ शकतात ?
आम्ही अनेक स्वरुपाची तारणे स्वीकारतो. ह्यामध्ये जमीन व स्थावर संपत्ती, कारखाने आणि यंत्रे, उपकरणे, मुदतठेवी, ठेव प्रमाणपत्रे, किसान विकास पत्रे, राष्ट्रीय बचत पत्रे, केंद्र व राज्य सरकारांनी जारी केलेल्या प्रतिभूती, सोने व अन्य रोख समतुल्य तारण, विमा पोलिसी व अन्य तारणांचा समावेश आहे.
Q4 निगमीय कर्ज मिळण्यास किती कालावधी लागेल?
सर्व बाबी योग्य असल्यास निगमीय कर्जाची प्रक्रिया १० कार्य दिवसांमध्ये पूर्ण करण्यात येईल.
Q5 माझ्या निगमीय कर्जाची मी परतफेड कशी करावी?
(आपल्या व्यवसायाच्या गरजेनुसार) आपल्याला सामिकृत हप्ता, एकरकमी परतफेड किंवा बलुनिंग परतफेडीचे पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत. पुढील तारखांचे धनादेश, इलेक्ट्रॉनिक जमा प्रणाली सूचना किंवा इलेक्ट्रॉनिक हस्तांतरण हे परतफेडीचे स्वीकारार्ह मार्ग आहेत.
Q6 निगमीय कर्जाची मला मुदतपूर्व परतफेड करता येते का?
होय, आपण निगमीय कर्जाची मुदतपूर्व परतफेड करू शकता. मात्र मुद्दल रकमेवर २% पुरोबंध शुल्क लागू राहील.
Q1 तारणासहित / तारणाविना व्यवसाय कर्ज घेण्यासाठी मी महिंद्र महिन्द्रा फायनान्सशी कसा संपर्क साधावा?
आमच्या सोप्या सुरक्षित जलद भ्रमणध्वनी अनुप्रयोग (mobile app ) किंवा महाजाल पृष्ठाद्वारे (webpage) अर्ज करता येईल. You may also email your queries at [email protected] या पत्त्यावर ईमेलही पाठवू शकता.
Q2 मला किती व्यावसायिक कर्ज घेता येते? प्रमाण कसे ठरविण्यात येते?
आपली गरज, आपल्या व्यवसायातील रोकड प्रवाह व मालमत्तेचे मूल्यमापन यानुसार आम्ही आपणास जास्तीत जास्त कर्ज रक्कम देण्याचा प्रयत्न करतो.
Q3 तारण म्हणून काय स्वीकारले जाऊ शकते?
कोणताही बोजा नसलेली निवासी, व्यापारी औद्योगिक व जमीन संपत्ती संपार्श्विक तारण म्हणून स्वीकारली जाऊ शकते.
Q4 कर्ज मिळण्यास किती वेळ लागेल?
आपल्याला मंजूर झालेली कर्ज पात्रता रक्कम आपणास ऑनलाईन कळविण्यात येईल. आपले तारण व्यवसाय कर्ज हे संपर्श्विक तारणाच्या आधारावर प्रक्रिया करण्यात येईल, हे आपणास माहीत आहेच. त्यामुळे आपल्या संपर्श्विक तारणाचे मूल्यमापन व मालमत्तेचे दस्तऐवज प्राप्त होऊन मालकीची खातरजमा करण्यास कामकाजाचे ३-४ दिवस लागतील. संपर्श्विक तारणाची खातरजमा केल्यावर कर्ज वितरीत करण्यास ४८ तास लागतील. मात्र तारणाशिवाय असलेले व्यावसायिक कर्ज दस्तऐवजांची छाननी झाल्यावर ४८ तासात करण्यात येईल.
Q5 कर्जासाठी कोण अर्ज करू शकते?
ज्यांना व्यवसायाचा विस्तार करावयाचा आहे अशा व्यक्तिगत, एकल मालकी संस्था, भागीदारी संस्था, खासगी (प्रायव्हेट) व सार्वजनिक (पब्लिक) लिमिटेड कंपन्या कर्जासाठी अर्ज करू शकतात.
Q6 मला अन्य उद्दिष्टासाठी कर्जाच्या रकमेचा वापर करता येतो का?
अर्जामध्ये कर्जासाठी जो उद्देश नमूद केला आहे, त्याच उद्देशार्थ कर्ज रक्कम वापरणे आवश्यक आहे. सर्वसामान्यपणे खेळते भांडवल, व्यवसाय विस्तार, कर्ज प्रतीयोजन व उपकरण खरेदी ह्यासाठी आम्ही कर्जे देतो.
Q7 माझ्या व्यवसाय कर्जाची परतफेड मला कशी करता येईल?
परतफेडीसाठी आम्ही NACH ला प्राधान्य देतो, मात्र त्याबाबत आम्ही लवचिकता राखतो व पुढील तारखांचे धनादेश स्वीकारतो.
Q8 तारणावरील व्यवसाय कर्जाच्या सुरुवातीच्या काळात मला कमी रकमेचे हप्ते भरता येतील का?
(आपल्या व्यवसायाच्या गरजेनुसार) आपल्याला सामिकृत हप्ता, एकरकमी परतफेड किंवा बलुनिंग परतफेडीचे पर्याय उपलब्ध आहेत.
Q9 माझ्याकडे अतिरिक्त रक्कम असल्यास मला मुदतपूर्व परतफेड करता येते का?
माझ्याकडे अतिरिक्त रक्कम असल्यास मला मुदतपूर्व परतफेड करता येते का?
Q10 ऑनलाईन अर्ज सादर केल्यावरची प्रक्रिया काय आहे?
ऑनलाईन सादर केलेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी व त्याबाबतचे दस्तऐवज घेण्यासाठी आमचा प्रतिनिधी आपणाशी संपर्क साधेल. माहितीची खातरजमा झाल्यावर कर्जाच्या वितरणाची प्रक्रिया आम्ही करू. दस्तऐवजाची खातरजमा केल्यावर कर्जाची रक्कम कमी करण्याचा किंवा कर्ज नाकारण्याचा अधिकार महिन्द्रा फायनान्स राखून ठेवत आहे.
Q11 दस्तऐवजाची खातरजमा झाल्यावर माझी पात्रता बदलू शकेल काय?
आपण ऑनलाईन सादर केलेल्या माहितीची दस्तऐवजांवरून खातरजमा होत असल्यास, आपल्या कर्ज पात्रता रकमेत सहसा बदल होणार नाही. मात्र दस्तऐवजाची खातरजमा केल्यावर कर्जाची रक्कम कमी करण्याचा किंवा कर्ज नाकारण्याचा अधिकार महिन्द्रा फायनान्स राखून ठेवत आहे.
Q12 मी आपल्याला दिलेली माहिती इतर कोणाशी शेयर करण्यात येईल काय?
आपल्या सादर माहितीची गोपनीयता आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे व कर्ज मंजुरीसाठी व नियामक / वैधानिक दिशानिर्देशानुसार आवश्यक माहिती वैधानिक प्राधिकरणाला देण्यात येईल.
Q13 बँक खात्याच्या लॉग इनची माहिती सामायिक करणे सुरक्षित आहे काय?
महिन्द्रा फायनान्स व त्यांचे प्रतिनिधी माहितीसाठ्याच्या सुरक्षिततेबाबत निर्देशांचे कसोशीने पालन करतात. कर्ज मूल्यमापनाच्या व मंजुरीच्या संपूर्ण प्रक्रियेत खात्याची ओळख व सांकेतिक शब्द महिंद्र फायनान्सच्या किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या माहिती प्रणालीत साठविण्यात येत नाहीत. सदर प्रक्रियेत कोणताही मानवी हस्तक्षेप नाही. खात्याची ओळख व सांकेतिक शब्द फक्त बँक प्रणालीतून माहिती स्वयंचलित पद्धतीने काढण्यासाठी करण्यात येतो. मात्र कोणत्याही कारणाने आपण खात्याची ओळख व सांकेतिक शब्द प्रविष्ट करू इच्छित नसल्यास आपण बँक खात्याचे विवरण बँकेच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून ते आमच्या भ्रमणध्वनी अनुप्रणाली किंवा संकेतस्थळावर अपलोड करू शकता.
Q14 मला माझ्या कर्जाच्या अर्जात बदल करता येतो का आणि कसा?
अर्ज सादर करताना आपण आपल्या अर्जात बदल करू शकता. मात्र ह्याबाबत आपणास काही अडचणी असल्यास आपण आम्हाला संपर्क साधून आमची मदत घेऊ शकता. आपल्याला मदत करण्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Q15 कर्जाचा अर्ज भरताना मला समस्या येते, मी काय करू ?
शंकासमाधानाने आपली समस्या सुटत नसल्यास १८००८४३९२४० ह्या आमच्या मोफत दूरध्वनी क्रमांकावर आपण सोमवार ते शुक्रवार सकाळी ९:०० ते सायंकाळी ७:०० व शनिवारी सकाळी ९:०० ते दुपारी २:०० पर्यंत संपर्क साधू शकता किंवा आपल्या शंका / समस्या आपण [email protected] ह्या इमेलवर सुद्धा पाठवू शकता.
Q1 भाडे व भाडेपट्टा वटवणी कर्जे घेण्यासाठी मी महिन्द्रा फायनान्सशी कसा संपर्क साधावा?
Q2 भाडे व भाडेपट्टा वटवणी कर्जे करण्यासाठी मला किती अर्थ साहाय्य घेता येते? प्रमाण कसे ठरविले जाते?
आपली गरज, पत मूल्यमापन व भाड्याचे मूल्य ह्यावर भाडे व भाडेपट्टा वटवणी कर्जाचे प्रमाण अवलंबून आहे. मात्र रु २५ कोटी ही त्याची कमाल मर्यादा आहे.
Q3 माझ्या भाडे व भाडेपट्टा वटवणी कर्जामध्ये तारण म्हणून कोणत्या गोष्टी स्वीकारल्या जाऊ शकतात?
भाडे व भाडेपट्टा वटवणी कर्जामध्ये ज्या मिळकतीच्या भाड्याची वटवणी करण्यात येणार आहे, ती तारण राहील.
Q4 भाडे व भाडेपट्टा वटवणी कर्ज मिळण्यास किती कालावधी लागेल ?
सर्व बाबी योग्य असल्यास भाडे व भाडेपट्टा वटवणी कर्जाची प्रक्रिया १० कार्य दिवसांमध्ये पूर्ण करण्यात येईल.
Q5 माझ्या भाडे व भाडेपट्टा वटवणी कर्जाची मी परतफेड कशी करावी?
ज्या भाडे व भाडेपट्टा वटवणी करण्यात येणार आहे, त्याच्या चक्राशी परतफेड जुळवून घेण्यात येईल.
Q6 भाडे व भाडेपट्टा वटवणी कर्जाची मला मुदतपूर्व परतफेड करता येते का?
होय, आपण कर्जाची मुदतपूर्व परतफेड करू शकता. मात्र मुद्दल रकमेवर पुरोबंध शुल्क लागू राहील.
Q1 देयके वटवणी सुविधेसाठी मी महिन्द्रा फायनान्स कडे कसे जावे ?
आपण आम्हास ०२२-६६३२-७९४० क्रमांकावर संपर्क करू शकता . तसेच आपल्या शंका [email protected] ह्या ई मेल वर पाठवाव्यात.
Q2 मी किती कर्ज घेऊ शकतो ? कर्जाचे प्रमाण कसे निर्धारित करण्यात येते ?
आपली कर्जाची गरज, पत मूल्यमापन व उपकरणांचे मूळ उत्पादक / कंपन्यांचे मूल्यमापन ह्यानुसार कर्जाचे प्रमाण निर्धारित करण्यात येते. मात्र रु ४० कोटी ही त्याची मर्यादा आहे.
Q3 वटवणीसाठी कोणती देयके स्वीकारण्यात येतात ?
नामांकित कंपन्यांची व उपकरणांचे मूळ उत्पादकांची विक्री देयके वटवणीसाठी स्वीकारण्यात येतात.
Q4 तारण म्हणून काय ठेवावे लागते ?
Q5 कर्ज मंजूर होण्यासाठी किती कालावधी लागतो ?
Q1 ठेवींच्या कोणत्या योजना उपलब्ध आहेत ?
संचयी व असंचयी स्वरूपाच्या ठेव योजना उपलब्ध आहेत.
Q2 संचयी व असंचयी ठेवींमध्ये काय फरक आहे ?
असंचयी योजनेमध्ये व्याज दर सहा महिन्यांनी अदा करण्यात येते. ज्या निवृत्तीवेतनधारकांना नियमित कालावधीनंतर व्याजाची गरज असते, त्यांच्यासाठी ही योजना लाभदायक आहे. संचयी ठेव योजनेत व्याज हे मुदत समाप्त होताना मुद्दलासहित अदा करण्यात येते. ज्या लोकांना नियमित कालावधीनंतर व्याजाची गरज नसते , त्यांच्यासाठी ही योजना असून एक लक्ष्मीवृद्धी योजना म्हणून तिचा करण्यात यावा.
Q3 असंचयी आणि संचयी ठेव योजनांमध्ये किमान किती रकमेची ठेव ठेवणे आवश्यक आहे ?
संचयी योजनांमध्ये किमान रु ५०००/- व असंचयी योजनांमध्ये अर्धवार्षिक कालावधी व्याजासाठी किमान रु २५०००/- व त्रैमासिक कालावधी व्याजासाठी किमान रु ५००००/- रक्कम ठेव ठेवणे आवश्यक आहे.
Q4 मी ठेव रक्कम कशी ठेवावी ?
एमएमएमएफएसएल – ठेव योजना या नावाने धनादेश / धनाकर्ष जारी करून व एचडीएफसी बँक व कोटक महिंद्र संग्रहण केंद्रांमध्ये तो सादर करावा. दुसरा पर्याय म्हणजे ठेवीदारांनी मुंबई येथे देय धनाकर्ष निगमिय कार्यालयात पाठवून द्यावा.
Q5 ठेव ठेवण्यासाठी काही अर्ज विहित आहे काय ?
होय, ठेव ठेवण्यासाठी अर्ज विहित करण्यात आला आहे.
Q6 एखाद्या अज्ञानाचे पालक हयात नसल्यास, त्याचे पालक कोणाला समजण्यात यावे ?
सक्षम न्यायालयाने पालक म्हणून नियुक्त केलेल्या व्यक्तींनाच पालक समजता येईल. न्यायालयाचा आदेश आमच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.
Q7 फक्त एखाद्या अज्ञानाच्या नावाने ठेव ठेवता येईल काय ?
एखाद्या अज्ञानाचे प्रतिनिधित्व त्याचे नैसर्गिक किंवा कायदेशीर पालन करत असतील व सदर नैसर्गिक किंवा कायदेशीर पालक यांनी अज्ञानाच्या वतीने ठेव मुदतीच्या अर्जावर स्वाक्षरी केली असल्यास तर फक्त एखाद्या अज्ञानाच्या नावाने ठेव ठेवता येईल. सर्व पत्रव्यवहार पालकांना संबोधित करण्यात येईल.
Q8 एखादा मुखत्यारपत्र धारक ठेव (POA) अर्जावर स्वाक्षरी करू शकतो काय ?
होय, मुखत्यारनाम्याची प्रत प्राप्त करून ठेवीदाराला अर्ज भारता येईल.
Q9 ज्येष्ठ नागरिकांना काही अतिरिक्त व्याज दर आहे काय ?
ज्येष्ठ नागरिकांना काही अतिरिक्त व्याज दर आहे काय ?
Q10 संयुक्त खाते ठेवता येईल काय ?
होय, कमाल तीन जणांना कोणीही एक किंवा उत्तरर्जीवी , क्रमांक १ अथवा उत्तरर्जीवी ‘ कोणीही एक किंवा उत्तरजीवी “ तत्वावर देय संयुक्त खाते ठेवता येईल. मुदत समाप्त झाल्यावर ठेव पावती कोण्याही एका ठेवीदाराला स्वाक्षरी करून निर्वाहित करता येतील. मुदतपूर्व प्रदान किंवा कर्ज हवे असल्यास मात्र सर्व ठेवीदारांच्या स्वाक्षऱ्या घेणे आवशयक आहे.
Q11 माझा संपर्काचा पत्ता व अन्य वैयक्तिक माहिती मला कशी बदलता येईल ?
योग्य तो पुरावा जोडून आपण एक लेखी अर्ज चेन्नई येथील मुदतठेव प्रक्रिया केंद्राकडे पाठविणे आवश्यक आहे. प्राप्त झाल्यावर ७ कामकाजाच्या दिवसांमध्ये सदर तपशील अद्यायावत करण्यात येईल.
Q12 विश्वस्त निधी मुदत ठेवीत गुंतवणूक करू शकतो काय ?
होय , विश्वस्त निधी महिन्द्रा फायनान्सच्या मुदत ठेवीत गुंतवणूक करू शकतो. जर विश्वस्त संस्था नोंदणीकृत नसेल किंवा भविष्यात नोंदणी करण्यास इच्छुक नसल्यास तशा आशयाचे प्राधिकृत स्वाक्षरीकर्त्यांनी स्वाक्षरी केलेले पत्र सादर करणे आवश्यक आहे. महिन्द्रा & महिन्द्रा फिनानशियल सर्व्हिसेस ही आयकर अधिनियमाच्या कलम ११(५) अंतर्गत नोंदणी झालेली नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी.
Q13 कंपनी मुदत ठेवीत गुंतवणूक करू शकेल काय ?
होय, कंपनी मुदतठेवीत गुंतवणूक करू शकेल.
Q14 ठेवींवर काही दलाली / प्रोत्साहनात्मक रक्कम देण्यात येते काय ?
नाही, कोणत्याही प्रकारे दलाली / प्रोत्साहनात्मक रक्कम देण्यात येत नाही.
Q15 आपण ठेवींवर दरमहा व्याज देऊ करता काय ?
नाही, व्याज फक्त सहामाही व वार्षिक तत्त्वावरच देण्यात येते.
Q16 व्याज प्रदान करण्याच्या कोणकोणत्या पद्धती आहेत ?
इलेक्ट्रोनिक जमा प्रणाली ( ECS) द्वारे व्याज थेट बँक खात्यात जमा करण्यात येते.
Q17 व्याजाचे धनादेश कोणत्या बँकेवर आहरीत असतात ?
व्याजाचे धनादेश एचडीएफसी बँक, मुंबई ह्या बँकेवर आहरीत असतात, पण एचडीएफसी बँकेच्या सर्व शाखांमध्ये सममुल्याने देय असतात.
Q18 दुसऱ्या क्रमांकाच्या ठेवीदाराच्या नावे आपण व्याजाचे धनादेश जारी करू शकता काय ?
नाही, व्याजाचे धनादेश प्रथम क्रमावरील ठेवीदारांच्या नवे देण्यात येतील.
Q19 असंचयी योजनेत व्याज कधी जमा करण्यात येते ?
असंचयी योजनेत सदर मुदतठेव पावती वैध असणाऱ्या प्रत्येक आर्थिक वर्षाच्या ३० जून, ३० सप्टेंबर, ३१ डिसेंबर व ३१ मार्च रोजी व्याज जमा करण्यात येते.
Q20 सध्याचे व्याज दर घसरल्यास काय होईल ?
काहीही फरक पडणार नाही कारण सद्य नियमानुसार मुदत ठेवीची मुदत संपेपर्यंत करारबद्ध दराने व्याज देण्यास आम्ही बांधील आहोत.
Q21 सध्याचे व्याजदर वाढल्यास काय होईल ?
ह्याबाबतचा निर्णय हा भारतीय रिझव बँकेच्या दिशानिर्देशावर अवलंबून आहे. विनिर्दिष्ट दिनांकापासून संभाव्य व्याज दर देण्याबाबत भारतीय रिझर्व बँकेचे आदेश असल्यास, ते लगेचच करता येणार नाही. सुधारित दर हे नवीन व नूतनीकरण होणाऱ्या ठेवीनाच लागू होतील. मात्र भारतीय रिझव बँकेच्या नियमांच्या अधीन राहून “मुदतपूर्व नुतनीकरण” प्रक्रियेद्वारे सुधारित दरांचा लाभ सद्य ठेवीदारांना देता येईल.
Q22 व्याजावर उद्गम आयकर(Income Tax) कधी कपात करण्यात येतो ?
कोणत्याही आर्थिक वर्षात ठेवींवरील अदा / जमा केलेले किंवा होणारे अंदाजित वार्षिक व्याज हे रु ५०००/- किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर कर कपात करणाऱ्याला उद्गम कर कपात करणे अनिवार्य आहे. मात्र अशी उद्गम आयकर कपात टाळण्यासाठी गुंतवणूकदार दर वित्त वर्षात स्वघोषित १५ जी / एच अर्ज भरू शकतात किंवा संभाव्य प्राप्तीकर प्राधिकरणाकडून कर सूट प्रमाणपत्र सादर करू शकतात.
Q23 नमुना १५ जी / १५ एच म्हणजे काय व तो मला कुठे मिळू शकतो ?
नमुना १५ जी / १५ एच हे ठेवीदाराने सादर करावयाचे स्वयंघोषित प्रमाणपत्र आहे व ते कंपनीकडून प्राप्त करता येऊ शकते किना कंपनीच्या http://www.mahindrafinance.com ह्या संकेतस्थळावरून आपण डाउनलोड करू शकता. ते स्वयंघोषित प्रमाणपत्र असून त्यासाठी साक्षांकनाची गरज नाही. मात्र अंगठ्याची निशाणी असणाऱ्या प्रत्येक नमुन्यावर राजपत्रित अधिकारी / बँक अधिकाऱ्यांनी साक्षांकित करणे आवश्यक आहे.एक प्रत आमच्याकडे ठेऊन एक प्राप्तीकर विभागाला देणे आवश्यक असल्यामुळे, सदर नमुन्याच्या तीन प्रती सादर करणे आवश्यक आहे. सद्य ठेवीदारांना मार्च महिन्यामध्ये आम्ही सदर पुर्वछापीत नमुने १५ जी / १५ एच पाठवू व ठेवीदारांनी रीतसर स्वाक्षरी करून दोन प्रतींमध्ये आम्हास परत करावयाचे आहे. संपूर्ण आर्थिक वर्षामधील देय व्याजाच्या संभाव्य उत्पन्नानुसार ठेवीदारांना नमुना १५ जी /१५ एच पाठविण्यात येईल.
Q24 नमुना १५ जी व १५ एच मध्ये काय फरक आहे ?
(कंपनी किंवा संस्था नसलेल्या ) कोणत्याही व्यक्तीला नमुना १५ जी मध्ये घोषणापत्र सादर करता येते. त्यामुळे एखादी कंपनी किंवा संस्थेला नमुना १५ जी / १५ एच मध्ये घोषणापत्र भरून देता येणार नाही . नमुना १५ जी हा ६० वर्षे वयाखालील निवासी नागरिकांसाठी आहे. १५ एच हा आर्थिक वर्षात ६० वर्षावरील जेष्ठ निवासी नागरिकांसाठी आहे. नमुना १५ जी / एच साठीची पात्रता खालील प्रमाणे - नमुना १५ जी : घोषणापत्र सादर करणारी व्यक्ती ६० वर्षे पेक्षा कमी वयाची असावी. आर्थिक वर्षामध्ये (म्हणजेच वर्ष २०१६-१७ ) त्याचे एकूण उत्पन्न मुलभूत आयकर मर्यादेपेक्षा म्हणजेच रु २५००००/- पेक्षा जास्त नसावे. आर्थिक वर्षामध्ये एकूण उत्पन्न रु २५००००/- पेक्षा जास्त असेल किंवा होण्याची शक्यता असेल तर त्या व्यक्तीला नमुना १५ जी सादर करता येणार नाही. नमुना १५ एच :एखाद्या व्यक्तीचे वय हे साठ वर्षांपेक्षा जास्त पण ८० वर्षांपेक्षा कमी असेल तर आर्थिक वर्षामध्ये (म्हणजेच वर्ष २०१६-१७ ) त्याचे एकूण उत्पन्न मुलभूत आयकर मर्यादेपेक्षा म्हणजेच रु २५००००/- पेक्षा जास्त नसावे. एखाद्या व्यक्तीचे वय हे ८० वर्षांपेक्षा जास्त असेल तर आर्थिक वर्षामध्ये (म्हणजेच वर्ष २०१६-१७ ) त्याचे एकूण उत्पन्न मुलभूत आयकर मर्यादेपेक्षा म्हणजेच रु ५०००००/- पेक्षा जास्त नसावे.व्यक्तींच्या व्यतिरिक्त नमुना १५ जी साठीची पात्रता:आर्थिक वर्षामध्ये (म्हणजेच वर्ष २०१६-१७ ) एकूण उत्पन्न त्यांच्यासाठीच्या मुलभूत आयकर मर्यादेपेक्षा म्हणजेच रु २०००००/- पेक्षा जास्त नसल्यास हिंदू अविभक्त कुटुंब, व्यक्तींची संघटना, व कृत्रिम न्यायिक व्यक्ती हे नमुना १५ जी सादर करु शकतात.
Q25 मुदतठेव ठेवतानाच फक्त एकदाच सदर नमुना सादर करणे पुरेसे आहे काय ?
होय, नमुना १५ जी / एच हा आर्थिक वर्षाच्या सुरवातीला सद्य सर्व ठेवी समाविष्ट करून सादर करता येतो व त्या आर्थिक वर्षात नवीन मुदत ठेव केल्यास, नवीन नमुना १५ जी / एच सादर करावा लागतो. तसेच प्राप्तीकर कायद्यांमध्ये दुरुस्ती झाल्यास नवीन नमुना १५ जी / एच सादर करणे आवश्यक आहे.
Q26 उद्गम कर कपातीचे प्रमाणपत्र झाल्यास कोणत्या प्रकारचे प्रमाणपत्र मिळते व ते कसे व्युत्पन्न करावे ?
ठेव तिमाही योजनेत असल्यास तिमाही व सहामाही योजनेत असल्यास सहामाही व संचयी ठेव असल्यास वर्षाच्या शेवटी कपात केलेल्या व शासनास भरणा केलेल्या व्याजावरील उद्गम कराचा सर्व तपशील विहित नमुना क्रमांक १६ अ नुसार कर कपात प्रमाणपत्रा द्वारे देण्यात येईल कर कपात करणाऱ्याने कर माहिती प्रणालीत ( TIN) भरलेल्या त्रैमासिक उद्गम कर विवरणानुसार नमुना १६ अ मधील उद्गम कर कपात प्रमाणपत्र दर तिमाही मध्ये व्युत्पन्न करता येते. मात्र दिनांक १.४.२०११ नंतर केलेल्या उद्गम कर कपातीचे नमुना १६ अ मधील प्रमाणपत्र हे केंद्रीकृत कर माहिती प्रणाली मधून ( TIN) कंपनीद्वारे एकमात्र क्रमांक असलेली उद्गम कर कपात प्रमाणपत्रा द्वारे डाउनलोड करण्यात येईल व अंकीय स्वाक्षरीचा उपयोग करून अधिप्रमाणन करण्यात येईल
Q27 पगारदार व्यक्तीच्या बाबतीत जर वेतनातून उद्गम कर (Income Tax)कपात होत असेल, तर तो / ती नमुना १५ जी / एच सादर करू शकतील काय ?
नाही, कारण त्यांचे मूल्यमापन झालेले असल्यामुळे,ते नमुना १५ जी / एच सादर करू शकणार नाहीत.
Q28 नावांच्या एकाच क्रमाने आपण एकापेक्षा जास्त खाती उघडू शकतो काय ?
नाही, आयकराचे गणन करण्यासाठी एकाच नावाने किंवा ( संयुक्त खात्यांच्या बाबतीत ) एकाच क्रमाने असलेल्या नावांच्या असलेल्या सर्व ठेवी एकत्र करणे आवश्यक आहे.
Q29 रकमेची तातडीने गरज भासल्यास, ठेविमधून रक्कम काढता येईल काय ?
भारतीय रिझर्व बँकेच्या दिशानिर्देशानुसार ठेव ठेवल्याच्या / नुतनीकरण केल्याच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या कालावधीत ठेविमधून रक्कम काढता येत नाही.
Q30 कर कपात जरी केली नाही, तरीही प्रमाणपत्र व्युत्पन्न करता येते काय ?
होय. जर गुंतवणूकदाराने नमुना १५ जी / एच किंवा कर सूट प्रमाणपत्र सादर केले असल्यास जिथे कोणतीही कर कपात करण्यात आलेली नाही, त्या बाबतीत सुद्धा उद्गम कर प्रमाणपत्र व्युत्पन्न करता येते.
Q31 उद्गम कर प्रमाणपत्रावर कोणता पत्ता छापला जाईल ?
स्थायी खाते क्रमांकासाठी (PAN) अर्ज सादर करताना स्थायी खाते प्रमाणपत्र ( PAN )प्राधिकरणाकडे नोंदविलेला पत्ता उद्गम कर प्रमाणपत्रावर छापण्यात येईल,
Q32 पत्त्यात बदल असल्यास काय करावे ?
आपला सद्य संपर्क पत्ता हा स्थायी खाते क्रमांकाचा अर्ज सादर करताना नोंदणी केलेल्या पत्त्यापेक्षा वेगळा असल्यास कृपया एनएसडीएल(NSDL) किंवा युटीआयटीएसएल(UTITSL) कडून आपला पत्ता बदलून घ्यावा.
Q33 उद्गम कर प्रमाणपत्र कधी प्रेषित करण्यात येते ?
Q34 कंपनी कडून कपात झालेल्या उद्गम कराचा जमा तपशील कसा पाहावा ?
एनएसडीएल संकेतस्थळावर नोंदणी करून त्यावरील नमुना क्रमांक २६ एएस मधून आपणास उद्गम कर कपातीची माहिती प्राप्त करता येईल. अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळाला भेट द्यावी https://incometaxindiaefilling.govt.in/portal/login.do
Q35 स्थायी खाते क्रमांक सादर करण्याचे काय महत्व आहे ?
प्राप्तीकर अधिनियमातील तरतुदीनुसार ज्या व्यक्तीला देय रकमेतून किंवा उत्पन्नातून उद्गम कर कपात होणार आहे, त्या व्यक्तीने कर कपात करणाऱ्या व्यक्तीला आपला स्थायी खाते क्रमांक (PAN) सादर करणे आवश्यक आहे. जर स्थायी खाते क्रमांक (PAN) सादर केला नाही, तर सादर केलेले नमुना १५ जी / एच हे अवैध ठरतील व जास्त लागू दराने कर कपात करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
स्थायी खाते क्रमांक (PAN) सादर न केल्यास एनएसडीएल संकेतस्थळावर(NSDL website) नमुना २६ एएस मध्ये कपात केलेल्या कोणत्याही कराची जमा दिसणार नाही. तसेच स्थायी खाते क्रमांक (PAN) सादर न केल्यास TIN संकेतस्थळावरून कंपनी कोणतेही कर कपात प्रमाणपत्र व्युत्पन्न करू शकणार नाही.
Q36 ठेव ठेवताना एकदाच नमुना सादर करणे पुरेसे नाही काय ?
नाही . कारण प्राप्तीकर कायद्यांमध्ये दुरुस्ती होण्याची शक्यता असल्यामुळे लागू असले तिथे नमुना १५ जी / एच प्रत्येक आर्थिक वर्षात किंवा ठेव ठेवताना सादर करणे आवश्यक आहे रकमेची तातडीने गरज भासल्यास, ठेविमधून रक्कम काढता येईल काय ? भारतीय रिझर्व बँकेच्या दिशानिर्देशानुसार ठेव ठेवल्याच्या / नुतनीकरण केल्याच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या कालावधीत ठेविमधून रक्कम काढता येत नाही.
Q37 रकमेची तातडीने गरज भासल्यास, ठेविमधून रक्कम काढता येईल काय ?
Q38 ठेव ठेवल्यानंतर तीन महिन्यांनी रक्कम काढता येईल काय ?
होय , भारतीय रिझर्व बँकेच्या दिशानिर्देशानुसार ठेव ठेवल्याच्या / नुतनीकरण केल्याच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या कालावधीनंतर मुदतपूर्व रक्कम काढता येईल.
Q39 मुदतपूर्व रक्कम दुसऱ्या / तिसऱ्या ठेवीदाराला अदा करता येईल काय ?
नाही, मुदतपूर्व रकमेचे प्रदान फक्त प्रथम ठेविदारालाच करता येईल, तसेच मृत्यू / कुलमुखत्यार धारक (असलेले / नसलेले ) ह्या बाबतीत अधिक स्पष्टीकरणासाठी आपण आम्हाला ०२२-६६५२६००० ह्या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा [email protected] इमेल पाठवावी
Q40 ठेव रोख स्वरुपात अदा करता येईल काय ?
नाही. ठेवीची रक्कम संबंधित ठेवीदारांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल .
Q41 आपण रक्कम ठेविदारांच्या बँकेत थेट जमा करू शकता काय ?
होय. ठेविदाराला त्याबाबत अगोदर माहिती दिल्यावर रक्कम ठेविदारांच्या बँकेत थेट जमा करता येईल.
Q42 Q42ठेवीची रक्कम मुदतपूर्व काढण्यासाठी काय प्रक्रिया आहे ?
असंचयी योजनेत त्रैमासिक व्याज अदा करण्याच्या कामामुळे जून, सप्टेंबर, डिसेंबर व मार्च महिन्याच्या २० तारखेपासून ते शेवटच्या दिवसापर्यंत ठेवींची मुदतपूर्व रक्कम काढता येणार नाही
Q43 आपण ठेवींवर कर्ज देता काय ?
महिन्द्रा फायनान्स ठेवीच्या रकमेच्या ७५% पर्यंत कर्ज मंजूर करता येते. आमच्या कंपनीच्या तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या मुदतठेवीच्या रकमेवर त्या ठेवीदाराला कर्ज देता येते. कर्ज वितरण करण्यापोटी सदर मुदतठेव पावतीवर कंपनीच्या धारणाधिकाराची नोंद करण्यात येईल. मात्र कर्ज देण्याची बाब ही सर्वस्वी कंपनीच्या स्वेच्छाधिकारात असेल. अज्ञान किंवा अनिवासी भारतीयांनी ठेवलेल्या ठेवींवर कर्ज देण्यात येणार नाही.
Q44 कर्जावर व्याजाचा आकारणी दर काय असेल ?
मुदत ठेव पावतीवर देय व्याजदराच्या पेक्षा २% अधिक दराने ( सहामाही ) संचयी आधारावर व्याज आकारण्यात येईल.
Q45 एकल ठेवीदार मृत्यू पावल्यास कोणते दस्तऐवज आवश्यक आहेत ?
मृत्यू प्रमाणपत्र , मुदत ठेव पावती, ( असल्यास ) मृत्युपत्र किंवा इच्छापत्र, किंवा तहसीलदार / नगर परिषद यांनी जारी केलेले वारसा प्रमाणपत्र यांची साक्षांकित प्रत.
Q46 आपण अनिवासी भारतीयांकडून ठेवी स्वीकारता काय ?
अप्रत्यावर्तन आधारावर आम्ही अनिवासी भारतीयांकडून ठेवी स्वीकारतो. भारतीय रिझर्व बँकेच्या भारिबँ / २००४ / १७९ परिपत्रक क्रमांक ८९ हाय दिनांक २४ एप्रिल २००४ रोजीच्या अधिसूचने नुसार अनिवासी भारतीयांच्या प्राधिकृत वितरक / बँकांच्या व्यतिरिक्त व्यक्तींकडे असलेल्या ठेवी पूर्वीप्रमाणेच सामान्य अनिवासी खात्यातून ठेवी असण्यास हरकत नाही, मात्र सदर व्यक्तींकडे जमा रकमांमध्ये आवक प्रेषण किंवा अनिवासी (बाह्य ) / विदेशी चलन अनिवासी (ब) खात्यामधून अनिवासी (सामान्य ) खात्यात अंतरित झालेल्या रकमा नसाव्यात. अनिवासी भारतीयांच्या ठेवींना शासित करणाऱ्या अटी व शर्ती खालील प्रमाणे अनिवासी भारतीयांच्या (सामान्य) खात्यामधून भारतीय रुपयांमध्ये ठेवी स्वीकारता येतील. ठेवीदाराच्या भारतातील अनिवासी (सामान्य) स्वरूपाच्या खात्यातून केलेल्या प्रदानाद्वारेच ठेवी स्वीकारता येतील. अनिवासी (बाह्य ) / विदेशी चलन अनिवासी (ब) खात्यामधून अनिवासी (सामान्य ) खात्यात अंतरित झालेल्या रकमामधून ठेवी स्वीकारण्यात येऊ नयेत. विदेशातून अंतर्गत प्रेषण पाठविलेल्या अनिवासी रकमांच्या ठेवी स्वीकारण्यात येऊ नयेत.अनिवासी भारतीय ठेवींमध्ये खालील घोषणापत्र घेणे आवश्यक आहे सर्व्हिसेस लिमिटेड यांचेकडे जमा करण्यात आलेली रक्कम ही अनिवासी (सामान्य ) खात्यातून अंतरित करण्यात आली आहे. तसेच सदर रक्कम आवक प्रेषण किंवा अनिवासी (बाह्य ) / विदेशी चलन अनिवासी (ब) खात्यामधून अनिवासी (सामान्य ) खात्यात अंतरित झालेली नाही.
सदर ठेवीचे भांडवल व व्याज हे ठेवीदाराच्या अनिवासी (सामान्य ) बँक खात्यातच जमा होणार असल्यामुळे ठेवीदाराने सदर बँक खाते क्रमांक सादर करणे आवश्यक आहे. वेळोवेळी अस्तित्वात असलेल्या प्राप्तीकर कायद्यातील तरतुदीनुसार लागू दरानुसार व्याजाच्या भागाच्या निरपेक्ष कर कपात करण्यात येईल.मुदत ठेवीसंबंधी प्राप्ती करातील तरतूद: अनिवासी भारतीयांच्या ठेवीसंबंधी टीडीएस करासाठी व्याजावर रु. ५०००/- ची मर्यादा उपलब्ध नाही. कर कपात करू नये ह्यासाठी फॉर्म १५जी/एच मधील कलाम १९७ अंतर्गत घोषणा लागू होणार नाही. मात्र, प्राप्ती कर विभागाकडून मिळालेलं कमी कपातीचं प्रमाणपत्र शून्य किंवा कराच्या कमी दरासाठी सादर करता येईल. प्राप्ती कर कायदा, १९६१ मधील कलम १९५ च्या तरतुदीनुसार कर दर 30.9% राहील. गुंतवणूकदार ज्या देशात राहतो त्या देशासोबत जर डबल टॅक्स अव्हॉइडन्स अग्रीमेंट (डीटीएए) अस्तित्वात असेल तर लागू कर दर डीटीएए किंवा प्राप्ती कर दरापेक्षा कमी असेल. मात्र, डीटीएए दाराच्या लाभाचा दावा करण्यासाठी कर निवासी प्रमाणपत्र सादर करावे लागेल. जर कर निवासी प्रमाणपत्र सादर केले नाही तर प्राप्ती कर कायद्यानुसार उच्च कर दर लागू होईल. तसेच, डीटीएए नुसार कमी दराचा दावा करण्यासाठी भारतीय पॅन आवश्यक आहे, अन्यथा प्राप्ती कर कायद्यानुसार कर दर 30.9% असेल. ठेवीदारांना विनंती आहे की त्यांनी भारतीय आणि परदेशातील पत्त्याचा तपशील द्यावा. अनिवासी भारतीय ठेवीवर कर्ज दिले जाणार नाही.
Q47 मला ऑनलाईन अर्ज करता येईल का?
होय, आपण ऑनलाईन गुंतवणूक करू शकता, त्यासाठी click here.
Q48 मला मुदतठेवीचे नूतनीकरण कसे करता येईल?
मुदत ठेवीची मुदत संपण्यापूर्वी 15 दिवस रेव्हेन्यू स्टँप चिकटवून व रीतसर स्वाक्षऱ्या करून नूतनीकरण अर्जासहित मुदत ठेव पावती मुदत ठेव प्रक्रिंया केंद्राकडे पाठवणे आवश्यक आहे. पूर्वीच्या ठेवीची मुदत संपल्यानंतर 10 दिवसांनी नूतनीकरण केलेले प्रमाणपत्र ठेवीदारांना पाठवण्यात येईल. तसेच इथे क्लिक करून आपण आपल्या मुदत ठेवीचे ऑनलाईन नुतनीकरण करू शकता.
Q49 What are options of renewal?
An existing FD investor can renew their deposit either the principal amount or complete maturity amount. However, investor cannot do additional investment while renewing the FD.
Q1 मी म्युच्युअल फंडात गुंतवणूक कशी करू शकतो व त्याची प्रक्रिया काय आहे ?
खालीलपैकी कोणतीही गुंतवणूक प्रक्रिया अवलंबून आपण गुंतवणूक करू शकता
Q2 योजनेची पूर्वीची कामगिरी कशी आहे, हे मला कसे समजेल. ?
योजनेच्या तथ्य पत्रिकेवरून आपण कोणत्याही योजनेच्या पूर्वीच्या कामगिरीचा मागोवा घेऊ शकता.
Q3 माझ्या गुंतवणुकीचे अद्ययावत नक्त संपत्ती मूल्य मी कसे पाहू शकेन ?
आपल्या गुंतवणुकीचे नक्त संपत्ती मूल्य पाहण्यासाठी आपण महिन्द्रा फायनान्सच्या संकेतस्थळावर लॉग इन करून आपण ते पाहू शकता.
Q4 उत्तम कामगिरी करणाऱ्या निधींची मला कुठे माहिती मिळू शकेल ?
Q5 माझ्या गुंतवणुकीचे रोखीकरण मी कसे करू शकतो ?
प्रमुख माहितीचे निवेदन ( KIM ) क्लोज एंडेड निधीच्या बाबतीत जेव्हा तो खुला बंद स्वरूपाचा होतो, तेव्हा किंवा संपत्ती व्यवस्थापन कंपनी विनिर्दिष्ट करेल त्यावेळेस रोखता उपलब्ध होईल. खुल्या बंद स्वरूपाच्या निधींमध्ये त्या विशिष्ट योजनेच्या गमन भाराच्या (असल्यास ) कपातीच्या अधीन राहून आपण आपली गुंतवणूक कधीही रोखीकरण करू शकता.
Q6 निधी व्यवस्थापक कोण आहे, हे मला कसे कळेल ? तसेच त्याची पूर्वीची कामगिरी कशी आहे, हे मला कसे कळेल ?
आपण योजनेच्या देकार दस्तऐवजाचा संदर्भ घ्यावा.
Q7 माझ्या म्युचुअल फंडामधील गुंतवणुकीच्या कामगिरीची मला कशी माहिती मिळेल ?
आमच्या द्वारे केलेल्या गुंतवणुकीची कामगिरी पाहण्यासाठी आपण महिन्द्रा फायनान्सच्या संकेतस्थळावर लॉग इन करून आपण ते पाहू शकता.
Q8 मला माझ्या गुंतवणूकीचे रोखीकरण कसे करता येईल ?
Q9 मी माझ्या पद्धतशीर गुंतवणूक नियोजनात ( SIP) व एकरकमी गुंतवणूक रकमेत कमी / जास्त करू किंवा दुसरीकडे स्थलांतरित करू शकतो काय ?
होय, आपण तसे करू शकता ( योजनेच्या देकार दस्तऐवजानुसार )
Q10 बँक खात्याचा तपशील व नामनिर्देशन तपशिलात मी कसा बदल करू शकेन ?
सदर तपशिल बदलण्यासाठी आपणास व्यवहार चिठ्ठी ( slip) आपल्या अलीकडील तपशिलासह भरून व संबंधित दस्तऐवज जोडून निबंधक / संपत्ती व्यवस्थापन कंपनी किंवा महिन्द्रा फायनान्सच्या संबंधित व्यवस्थापकांना सादर करावी लागेल.
Q11 माझ्या गुंतवणुकीच्या लाभांश प्रदानाच्या नोंदी मला कशा कळतील?
आपल्या गुंतवणूक तपशिलावरून आपण आपल्या गुंतवणुकीच्या लाभांश प्रदानाच्या नोंदी पाहू शकता .
Q12 माझा पत्ता व संपर्क तपशील मी कसा बदलू शकतो ?
आपल्या पत्त्याचे तपशील बदलण्यासाठी किंवा पत्ता बदलण्यासाठी आपणास स्वत: साक्षांकित नवीन पत्त्याचा पुरावा, पॅनकार्ड कॉपी यासंबंधित कागदपत्रासहित केवायसी(KYC) फॉर्म (सुधारणासाठी) भरला पाहिजे आणि संबंधित AMC / निबंधक किंवा आपल्या रिलेशनशिप मॅनेजरला सादर करा, जेणेकरुन ते स्वयंचलितपणे जेथे आपला पॅन(PAN) नंबर हा पहिला / एकचधारक म्हणून अस्तित्वात असेल तेथे प्रत्येक AMC सह अद्ययावत होईल. आपणास ( बदलासाठीचा ) आपला ग्राहक ओळखा ( KYC) अर्ज भरून त्यासोबत स्वसाक्षांकित दस्तऐवज, स्थायी खाते क्रमांक ( PAN ) कार्डाची प्रत संबंधित निबंधक / संपत्ती व्यवस्थापन कंपनी किंवा महिन्द्रा फायनान्सच्या संबंधित व्यवस्थापकांना सादर करावी लागेल, जेणेकरून आपला स्थायी खाते क्रमांक ( PAN ) जिथे जिथे प्रथम /एकमेव धारक म्हणून अस्तित्वात आहे, त्या सर्व संपत्ती व्यवस्थापन कंपन्यांमध्ये आपल्या बदललेल्या पत्त्याचा तपशील अद्यायावत होईल.
Q1 महिन्द्रा आणि महिन्द्रा फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडचे मुख्य व्यवसाय कोणते आहेत ?
महिन्द्रा आणि महिन्द्रा फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड ही मुख्यत्वे भारतातील ग्रामीण व अर्धनागरी बाजारपेठांमध्ये ग्राहकांना सेवा देणारी बिगर वित्तीय बँकिंग सेवा कंपनी आहे. भारतातील एक मोठा व्यवसाय समूह असलेल्या महिन्द्रा समूहाचा आम्ही एक हिस्सा आहोत. नवीन व वापरलेल्या स्वयंचलित व बहुउपयोगी चारचाकी वाहने, ट्रॅक्टर, कार व व्यावसायिक वाहनाच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्याच्या व्यवसायात प्रामुख्याने आहोत. आम्ही गृहवित्त, व्यक्तिगत कर्जे, छोट्या व मध्यम उपक्रमांना अर्थसहाय्य, विमा दलाली व म्युच्युअल फंड वितरण सेवा पुरवतो.
कंपनी आपल्या उपकंपन्या व संयुक्त उपक्रमाद्वारे विमा दलाली व्यवसाय, गृहनिर्माण वित्त व्यवसाय, प्रतिनिधींना घाऊक साठा करण्यासाठी वित्तसहाय्य, व अमेरिकेतील ग्राहकांना किरकोळ अर्थसहाय्य ह्या व्यवसायात सहभागी आहेत.
Q2 कंपनीच्या सहयोगी कंपन्या व उप’कंपन्यांच्या बाबत मला कुठे माहिती प्राप्त होऊ शकेल ?
ह्या संकेतस्थळावरून व तिथे पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करता येणाऱ्या कंपनीच्या वार्षिक अहवालातून सदर माहिती आपणास प्राप्त होऊ शकते . www.mahindrafinance.com
Q3 आर्थिक वर्ष संपताना कंपनीची आर्थिक कामगिरी कशी होती ?
भारतीय रुपयांमध्ये (करोड )
अमेरिकी डॉलर (दशलक्ष )
महिन्द्रा अँड महिन्द्रा फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड
४००.२३
६१.६९
महिन्द्रा अँड महिन्द्रा फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड व समूह
५११.६४
७८.८६
Q4 कंपनीच्या विशिष्ट कालावधीतील कामगिरीची माहिती मला कुठे प्राप्त होऊ शकेल ? .
कायद्यानुसार आवश्यक अशी माहिती कंपनी भांडवल बाजाराला नियमित कालावधीने सादर करीत असते. त्यामध्ये तिमाही आर्थिक कामगिरी समाविष्ट आहे. तसेच कंपनी आपल्या संकेतस्थळावर तिमाही आर्थिक कामगिरी, वार्षिक अहवाल, गुंतवणूकदारांसाठी सादरीकरण तसेच विविध सभांच्या द्वारे गुंतवणूकदार व सामान्य जनतेला आपल्या आर्थिक कामगिरीबाबत माहिती देता असते. सदर बाबी कंपनीच्या संकेतस्थळावरील गुंतवणूकदार विभागात समाविष्ट केल्या आहेत. त्याशिवाय गुंतवणूकदारांना विशिष्ट माहिती कळविणे आवश्यक असल्यास सदर विभाग अद्ययावत करण्यात येतो.
Q5 कंपनीचे पतमापन काय आहे ?
भारतातील विविध मापन एजन्सीद्वारे कंपनीची सद्य पत मानांकने खालील प्रमाणे आहेत:
Q6 कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता काय आहे ?
कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता खालील प्रमाणे आहे :
गेटवे बिल्डींग,
अपोलो बंदर,
मुंबई ४०० ००१
Q7 कंपनीच्या निगमिय कार्यालयाचा पत्ता काय आहे ?
कंपनीच्या निगमिय कार्यालयाचा पत्ता खालील प्रमाणे आहे.
महिन्द्रा टॉवर्स, डॉ जी एम भोसले मार्ग, पी के कुरणे चौक, वरळी
मुंबई ४०० ०१८
दूरध्वनी : + ९१-२२-६६५२६०००
संकेतस्थळ : www.mahindrafinance.com
Q8 महिन्द्रा अँड महिन्द्रा फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड चा निगमीय ओळख क्रमांक काय आहे ?
महिन्द्रा अँड महिन्द्रा फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड चा निगमीय ओळख क्रमांक L65921MH1991PLC059642 आहे
Q9 कंपनीचे आर्थिक वर्ष कधी सुरु होते व संपते ?
कंपनीचे आर्थिक वर्ष १ एप्रिल रोजी सुरु होऊन ३१ मार्च रोजी संपते.
Q10 कंपनी आपल्या गुंतवणूकदारांशी कसा संवाद साधते ? सदर संवाद प्रक्रिया सामान्य जनतेसाठी खुली असते काय ?
तिमाही कामगिरीची आकडेवारी जाहीर केल्यानंतर कंपनी तिमाही सभा आयोजित करीत असते. सभेच्या कामकाजाचा वृत्तांत सामान्य जनतेसाठी कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतो. तसेच चौथ्या तिमाही व पूर्ण वर्षाची कामगिरी जाहीर केल्यावर कंपनी संस्थागत गुंतवणूकदार व विश्लेषकांची वार्षिक सभा भरवत असते. सदर सभांमध्ये सादरीकारण केलेली माहिती संकेतस्थळावर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असते. दरवर्षी होणाऱ्या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गुंतवणूकदार कंपनीशी संवाद साधू शकतात. देशातील आणि विदेशातील सभा, गुंतवणूकदारांच्या परिषदा व पथप्रदर्शनात कंपनीतर्फे सहभाग घेण्यात येतो. सदर उपक्रमांमधील सादरीकरणे संकेतस्थळावर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असतात व डाउनलोड करता येतात.
Q11 एखाद्याने कंपनीशी कसा संपर्क साधावा ?
कंपनीशी संवाद साधण्यासाठी इच्छुक गुंतवणूकदार खालील ई-मेल पत्त्यावर संपर्क करू शकतात : [email protected]
तसेच खालील पत्त्यावर पत्र पाठवू शकतात:
महिन्द्रा टॉवर्स,डॉ .जी. एम .भोसले मार्ग, पी. के .कुरणे चौक, वरळी, मुंबई ४०० ०१८
गुंतवणूकदार विभाग – इक्विटी समभागबाबत माहिती
Q12 कंपनी समभागाचा सार्वजनिक देकार प्रथम कधी देण्यात आला ? समभाग कोणत्या वर्षी सूचीबद्ध करण्यात आले ?
मक्सी मोटर्स फायनान्शिअल सर्विस लिमिटेड ह्या नावाने दिनांक १ जानेवारी १९९१ रोजी कंपनी अधिनियम १९५६ नुसार एक पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणून महिन्द्रा अँड महिन्द्रा फायनान्शिअल लिमिटेड निगमित करण्यात आली. सन २००६ मध्ये महिन्द्रा अँड महिन्द्रा फायनान्शिअल लिमिटेडचे समभाग मुंबई भांडवली बाजारात सूचीबद्ध करण्यात आले.
Q13 कंपनी कोणत्या भांडवली बाजारांमध्ये सूचीबद्ध आहे ?
कंपनीचे समभाग बॉम्बे स्टॉक एक्सचेंज(BSE) व नॅशनल स्टॉक एक्सचेंज(NSE) येथे सूचीबद्ध आहेत.
Q14 कंपनी सूचीबद्ध झालेल्या भांडवली बाजारात कंपनीचा कोडसंकेतांक काय आहे?
मुंबई भांडवली बाजार – ५३२७२० राष्ट्रीय भांडवली बाजार - M&MFIN राष्ट्रीय ठेवप्रत सेवा मर्यादित ( NDSL) व केंद्रीय ठेवप्रत सेवा मर्यादित (CDSL) मधील (नवीन- प्रति २ रु दर्शनी मूल्य इक्विटी असलेल्या समभागांचा )कंपनीचा आंतरराष्ट्रीय डीमॅट सिक्युरिटी ओळख क्रमांक INE774D01024 आहे
Q15 मागील १० वर्षांमध्ये कंपनीने आपल्या समभागांवर अधिलाभांश व विभाजन कशा प्रकारे केले आहे ?
सन १९९६, मध्ये रु १० दर्शनी मूल्याच्या प्रत्येक समभागाला कंपनीने चार अधिलाभांश इक्विटीसमभाग याप्रमाणात अधिलाभांश देऊ केले होते. सन २०१२ मध्येइक्विटी समभागांचे विभाजन होऊन रु १० दर्शनी मूल्याचा प्रत्येक समभाग रु ५ च्या दर्शनी मूल्यामध्ये ५ भागात विभाजित करण्यात आला.
Q16 कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा(AGM) कोणत्या महिन्यात आयोजित केली जाते?
कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा(AGM) दर वर्षी जुलै महिन्यात आयोजित करण्यात येते.
Q17 कंपनी किती वेळा गुंतवणूकदार / विश्लेषक दिवस आयोजित करते ?
तिमाही कामगिरीची आकडेवारी जाहीर केल्यानंतर कंपनी तिमाही सभा आयोजित करीत असते. सभेच्या कामकाजाचा वृत्तांत समभागधारक आणि सामान्य जनतेसाठी कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतो.तसेच चौथ्या तिमाही व पूर्ण वर्षाची कामगिरी जाहीर केल्यावर कंपनी संस्थागत गुंतवणूकदार व विश्लेषकांची वार्षिक सभा भरवत असते. सदर सभांमध्ये सादरीकरण केलेली माहिती संकेतस्थळावर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असते. दरवर्षी होणाऱ्या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत(AGM) गुंतवणूकदार कंपनीशी संवाद साधू शकतात.
Q18 ट्रेडिंग विंडो बंद होण्याचा कालावधी काय असतो?
होय, दर तिमाही मध्ये आर्थिक कामगिरी घोषित करण्याच्या आधी कंपनी ट्रेडिंग विंडो बंद करण्याच्या कालावधीचे पालन करते. सदर कालावधीत कंपनी किंवा त्यांचे अन्य कोणतेही अधिकारी गुंतवणूकदार / विश्लेषक यांच्याशी संपर्क ठेवत नाहीत. आर्थिक कामगिरी घोषित करण्याच्या १५ दिवस अगोदर ट्रेडिंग विंडो बंद करण्याचाकालावधी सुरु होतो.
Q19 लाभांश केव्हा अदा करण्यात येतो. ?
वार्षिक सर्वसाधारण सभेने अधिलाभांश देण्यास मान्यता दिल्यावर लगेच अदा करण्यात येतो.
Q20 मी महिन्द्रा अँड महिन्द्रा फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडचे समभाग विकत घेतले आहेत. आता ते माझ्या नावावर कसे नोंदवायचे व त्यासाठी किती कालावधी लागेल?
तुम्हाला समभाग प्रमाणपत्र आणि समभाग हस्तांतरण करार ( कृपया फॉर्म एसएच-४ पहा ) नीट भरून तयार करावा लागेल, त्यासाठी अर्थमंत्रालय, महसूल विभाग, नवी दिल्लीने जारी केलेल्या सूचना क्रमांक एसओ 130(इ), दिनांक 28-01-2004 नुसार प्रत्येक रु. १०० किंवा समभागांच्या किमतीच्या भागासाठी रु. २५ मुद्रांक शुल्क भरावे लागेल. कृपया नोंद घ्या की वरील सर्व हस्तांतरण करणाऱ्यांची आणि हस्तांतरण करून घेणाऱ्यांची स्वयंप्रमाणीत पॅन कार्डाची प्रत आणि पत्त्याचा पुरावा दाखवणाऱ्या कागदपत्रांच्या ( रेशन कार्ड , पासपोर्ट, ड्रायविंग लायसन्स इत्यादी ) प्रति हस्तांतरणाच्या नोंदीसाठी सक्तीच्या आहेत. समभाग, समभाग हस्तांतरण करार आणि पॅन कार्डांच्या स्वयंप्रमाणीत प्रति व पत्त्याचा पुरावा कार्वी कम्प्युटरशेयर प्रायव्हेट लिमिटेड ह्यांना खालील पत्यावर पाठवा: कार्वी कम्प्युटरशेयर प्रायव्हेट लिमिटेड युनिट : महिन्द्रा अँड महिन्द्रा फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कार्वी सेलेनियम टॉवर्स ब, भूखंड ३१-३२ गचीबवली आर्थिक विभाग, नानकरामगुडाहैदराबाद ५०० ०३२ तेलंगण दूरध्वनी : +९१ ०४० ६७१६ १५१८ इ-मेल : [email protected] हस्तांतर प्रक्रियेस १५ दिवसांचा कालावधी लागतो. वैध आक्षेप किंवा नकार असल्यास, हस्तांतर होण्याची विनंती प्राप्त झाल्यावर १५ दिवसांच्या आत भागधारकांना सूचना देण्यात येते. एकदा समभाग आपल्या नावावर हस्तांतर झाल्यवर रीतसर पृष्ठांकित / हस्तांतरित झालेली मूळ समभाग प्रमाणपत्रे आपणास प्राप्त होतील. ठेव सहभाग्याच्या मार्फत आपले समभाग ठेवप्रतीत रुपांतरीत करणे फायद्याचे आहे. इलेक्ट्रोनिक व्यवहारांना मुद्रांक शुल्क लागू होत नाही. मात्र प्रत्येक ठेवप्रत सहभागीदार व्यवहार शुल्क आकारू शकतो. सदर शुल्काचा दर ठेवप्रत सहभागीदाराकडून अगोदर माहित करून घेणे उत्तम. अधिक तपशीलासाठी समभागांना ठेवप्रतीत रुपांतरीत करण्याचा विभागाचा संदर्भ घ्यावा .
Q21 काही समभाग मी माझी मुले / नातेवाईकांना भेट देऊ इच्छितो. त्यांच्या नावांची नोंदणी मी कशी करावी ? त्यामध्ये काही मुद्रांक शुल्क आकारले जाते काय ?
सर्वसामान्य हस्तांतरणासाठी असलेली प्रक्रियाच (प्रत्यक्ष स्वरुपात धारण केलेले) समभाग भेट देण्यासाठी सुद्धा लागू आहे. भेट दिलेल्या समभागांच्या दस्तऐवज निष्पादित केल्याच्या दिवसाच्या बाजारमूल्याच्या प्रत्येक रु १०० किंवा त्यांच्या भागाच्या मुल्यासाठी @ ०.२५ पैसे दराने मुद्रांक शुल्क देय आहे. जर समभाग ठेवप्रत स्वरुपात धारण केले असतील, तर मुद्रांक शुल्क लागू नाही. मात्र संबंधित ठेवप्रत सहभागीदार काही व्यवहार शुल्क आकारू शकतो.
Q22 हस्तांतरण होण्यासाठी मी समभाग कुठे पाठवावेत ? आपल्या शाखा कार्यालयात सोपवता येतील काय ?
समभाग हस्तांतरित केल्याची नोंदणी फक्त खालील ठिकाणी करण्यात येते
कार्वी कम्प्युटरशेयर प्रायव्हेट लिमिटेड
कार्वी सेलेनियम टॉवर्स ब, भूखंड ३१-३२
गचीबवली आर्थिक विभाग, नानकरामगुडा
हैदराबाद ५०० ०३२ तेलंगण
दूरध्वनी : +९१ ०४० ६७१६ १५१८
इ-मेल : [email protected]
समभाग आपणास व्यक्तीशः किंवा डाक / मान्यता प्राप्त कुरियर सेवेद्वारे सोपवावे लागतील. आमच्या शाखा कार्यालयांमध्ये समभाग हस्तांतरण प्रक्रिया होत नसल्यामुळे आपले समभाग आमच्या कंपनीच्या शाखा किंवा अन्य कार्यालयांमध्ये कृपया सोपवू नयेत.
दुसरा पर्याय म्हणजे आपण समभाग महिन्द्रा अँड महिन्द्रा फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड सचिव सेवा विभाग, महिन्द्रा टॉवर्स , पी के कुरणे चौक, वरळी मुंबई १८ ह्या पत्त्यावर आपले समभाग पाठवू शकता.
Q23 समभाग हस्तांतरण करण्यावर किती मुद्रांक शुल्क भरावे लागते ? सदर मुद्रांक मला कुठे प्राप्त होतील.
हस्तांतरण विलेख निष्पादित करण्याच्या दिनांकास सामाभागाच्या असलेल्या बाजारमूल्यावर ०.२५% मुद्रांक शुल्क लागू आहे.
ज्या बँकेत फ्रँन्किंग प्रक्रिया होत असेल, तिथे आपण कोणत्याही बँकेद्वारे आवश्यक स्टॅम्प फी सह हस्तांतरण विलेख फ्रँन्क करून घेऊ शकता.
Q24 हस्तांतर विलेख सादर करण्यापूर्वी तो पूर्ण झाला आहे, ह्याची खबरदारी मी कशी घ्यावी ?
जेव्हा हस्तांतरकाचे तपशील भरलेले हस्तांतरण विलेख आपल्याकडे येतील तेव्हा त्यामध्ये फोलिओ क्रमांक, प्रमाणपत्र क्रमांक, व विशिष्ट संख्या, धाराकाचे नाव, साक्षीदाराचे नाव व पत्ता हे सर्व लिहिलेले असल्याची खबरदारी घ्या. तसेच सर्व हस्तांतरकानी (संयुक्तधारकांच्या बाबतीत सर्वधारकांच्या स्वाक्षऱ्या ) व साक्षीदारांनी हस्तांतरण विलेखावर स्वाक्षऱ्या केल्याची व हस्तांतरक व हस्तांतरित यांचे स्वसाक्षांकित पॅनकार्डक्रमांकाच्या प्रती जोडण्याची खबरदारी घ्या.
हस्तांतरकाचे ज्या राष्ट्रीयीकृत बँकेत बचत खाते आहे, त्या बँकेच्या व्यवस्थापकाने हस्तांतरकाच्या स्वाक्षऱ्या साक्षांकित करणे आवश्यक आहे. तसेच व्यवस्थापकाने हस्तांतरकाच्या स्वाक्षऱ्या साक्षांकित करूनसुद्धा हस्तांतरकाच्या स्वाक्षरीत फरक आढळून आल्यास समभागांचे हस्तांतरण नाकारण्यात येईल.
कोणताही आक्षेप / त्रुटी राहू नये म्हणून हस्तांतर विलेखातील सर्व आवश्यक रकाने भरावेत व हस्तांतरीति म्हणून योग्य जागी स्वाक्षऱ्या करून सदर विलेख निष्पादित करण्याच्या दिनांकास असलेल्या समभागाच्या बाजार मूल्याच्या ०.२५% मुद्रांक शुल्क भरण्याची व्यवस्था करावी.
Q25 मी धारण केलेल्या समभागामध्ये मला अन्य व्यक्ती संयुक्त धारक म्हणून समाविष्ट करावयाची आहे. त्यासाठी मी कोणत्या प्रक्रियेचा अवलंब करावा ?
समभाग धारणांमध्ये संयुक्त धारक म्हणून नाव समाविष्ट करण्यासाठी कृपया मुद्रांकित हस्तांतर विलेख निष्पादित करावेत व हस्तांतरित होण्यासाठी कार्वीकडे सुपूर्द करावेत. असे समावेशान हे समभागांच्या मालकीचे हस्तांतरण असते व म्हणून उपरोक्त विवेचन केलेली प्रक्रिया अनुसरणे आवश्यक आहे .
Q26 महिन्द्रा अँड महिन्द्रा फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडचे समभाग मी खूप पूर्वी घेतलेले आहेत, पण ते माझ्या नावावर हस्तांतरित करण्याचे राहून गेले. आता मी कुठली प्रक्रिया अवलंबावी ?
कृपया उत्तर १ पाहावे.
Q27 प्रत्यक्ष स्वरूपातील समभागांच्या हस्तांतरण / प्रेषण / अदलाबदलीसाठी स्थायी खाते क्रमांक (PAN) सादर करणे अनिवार्य आहे काय ?
प्रतिभूती विनिमय मंडळाने (SEBI) खालील प्रकारच्या व्यवहारात स्थायी खाते क्रमांक (PAN) कंपनी / नोंदणी व हस्तांतरण अभिकरणाला सादर करणे अनिवार्य केले आहे अ) प्रतिभूती बाजारपेठेतील व्यवहार व बाजार बाह्य व्यवहारासाठी भौतिक स्वरूपात समभाग हस्तांतरित करणे ब) समभाग दोन किंवा जास्त धारकांच्या नावाने अस्टेल तेव्हा मृत धारकांची नावे वगळण्यासाठी क) जिथे मृत समभागधारक समभागांचा एकमेव धारक असतील तिथे समभाग कायदेशीर वारसांना प्रेषित करताना ड) समभागांची अदलाबदल करताना – दोन किंवा जास्त समभागधारकांच्या नावे प्रत्यक्ष समभाग संयुक्तरित्या धारण केले असतील तर त्यामधील नावाच्या क्रमाची अदलाबदल करताना
Q28 जर हस्तांतर फॉर्म काही आक्षेपास्तव परत केला गेल्यास हस्तांतरीताने (खरेदीदार ) काय करावे ?
हस्तांतरीतिने (खरेदीदार ) त्रुटी / चुका निराकरण करून घेण्यासाठी तातडीने पाउले उचलली पाहिजेत. हस्तांतरीतिने हस्तांतरकाशी (विक्रेता ) त्रुटी दुरुस्त करण्यासाठी किंवा त्या बदल्यात चांगल्या प्रतिभूती देण्यासाठी संपर्क साधला पाहिजे. प्रतीभूतींबाबत निराकरण झाल्यावर हस्तांतर होण्यासाठी सदर दस्तऐवज परत सादर करणे आवश्यक आहे. त्रुटी निराकरण होण्याच्या योग्य नसल्यास रक्कम परत मिळण्याचा मार्ग खरेदीदाराला उपलब्ध आहे.
Q29 संयुक्त धारकाच्या बाबत एक समभागधारक मृत झाल्यास हयात समभागधारकांनी समभाग त्यांच्या नावाने कसे करून घ्यावेत ?
हयात धारकांच्या पॅनकार्डची स्वसाक्षांकित प्रत, मयत समभागधारकाच्या मृत्यू प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत व संबंधित समभाग प्रमाणपत्रे ह्यासहित हयात समभागधारकांनी विनंती पत्र सादर करणे आवश्यक आहे. रीतसर निष्पादित केलेला प्रेषण फॉर्म दस्तावेजांसहित जोडल्यास अधिक चांगले. सदर फॉर्म संकेतस्थळावर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. हयात समभागधारकांनी रीतसर स्वाक्षरीत केलेला व भरलेला सदर दस्तऐवज कार्वी कडे सादर केल्यास मृत धाराकाचे नाव कंपनीकडील नोंदी तसेच प्रमाणपत्रातून कमी करता येईल.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, राजपत्रित अधिकारी व लेखप्रमाणक ( त्यांच्या पूर्ण नाव, पत्ता व नोंदणी क्रमांकासहित ) यांनी त्यांचा अधिकृत शिक्का मारून मृत्यू प्रमाणपत्र साक्षांकित करणे आवश्यक आहे. .(लेख प्रमाणक सार्वजनिक बाबतीत)
सदर दस्तऐवज प्राप्त झाल्यावर कंपनी मृत समभागधारकाचे नाव आपल्या नोंदीतून कमी करेल व आवश्यक ते पृष्ठांकन करून समभाग प्रमाणपत्रे अर्जदार / नोंदणीकृत धारकाला परत करेल.
इलेक्ट्रोनिक स्वरुपात धारण केलेल्या प्रतीभूतींसाठी आपल्या ठेवप्रत सहभाग्याशी संपर्क साधावा
टीप : भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळाच्या दिनांक २८ ऑक्टोबर २०१३ रोजीच्या परिपत्रकानुसार दावेदार / कायदेशीर वारसांकडून विहित दस्तऐवज प्राप्त झाल्यावर ठेवप्रत सहभाग्यांनी ठेवप्रत स्वरूपातील समभागांच्या प्रेषणासाठी ७ दिवस व प्रत्यक्ष स्वरूपातील समभागांसाठी कंपनी / नोंदणी व हस्तांतरण अभिकरण यांनी २१ दिवसात प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
Q30 एखादा एकल समभागधारक कोणतेही मृत्युपत्र न लिहिता मृत झाल्यास त्यांच्या कायदेशीर वारसांनी ( पती / पत्नी / मुलगा / मुलगी इत्यादी ) त्यांच्या नावावर समभाग कसे प्रेषित करून घ्यावेत ?
एकल धारणा असल्यास कायदेशीर वारसांनी उत्तराधिकार प्रमाणपत्र किंवा मृत्युपत्राचे प्रमाण किंवा प्रशासनाचे पत्र प्रमाणपत्रा सोबत सादर करणे आवश्यक आहे. (आमच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेला ) प्रेषण फॉर्म रीतसर भरून व कायदेशीर वारसदार / निष्पदकांनी स्वाक्षरीत करून सदर स्वाक्षऱ्या आपले बचत खाते असलेल्या बॅंकेच्या व्यवस्थापकाकडून त्याच्या अधिकृत शिक्का व नाव, हुद्दाव बँकेचे नाव व पत्त्यासह साक्षांकित करून घ्यावे. कायदेशीर दस्तएवजांचे साक्षांकन लेखप्रमाणकाने आपल्या नाव, पत्ता व नोंदणी क्रमांकासाहित करावे.
अशा पद्धतीचे कोणतेही कायदेशीर प्रमाणपत्र आपल्याकडे नसल्यास अधिक माहितीसाठी कार्वीला पत्र लिहावे.
व्यवहाराचे मूल्य रु दोन लाख पेक्षा कमी असल्यास आश्वासनपत्र, शपथपत्र व कायदेशीर वारसांकडून प्रमाणपत्र घेऊन समभाग प्रेषण प्रक्रिया करता येईल, व्यवहाराचे मूल्य रु दोन लाख पेक्षा जास्त असल्यास उत्तराधिकार प्रमाणपत्र, मृत्युपत्राचे प्रमाण ह्यासारखे दस्तऐवज आवश्यक आहेत. त्यामुळे सदर माहिती ही समभागांच्या प्रेषणासाठी कायदेशीर व बिगर कायदेशीर औपचारिकतांच्या पूर्ततेसाठी असलेल्या मार्गदर्शक सूचना समजण्यात याव्यात.
Q31 ज्या मृत कुटुंबातील सदस्याने स्वत: च्या नावावर समभाग धारण केलेले होते (एकल), त्याने / तिने मृत्युपत्र लिहिलेले असल्यास त्याच्या / तिच्या कायदेशीर वारसांनी समभाग त्यांच्या नावाने कसे प्रेषित करावेत ?
कायदेशीर वारसांनी सक्षम आधिकारीतेच्या उच्च न्यायालय / जिल्हा न्यायालयाकडून मृत्युपत्र प्रमाणित करून घेऊन त्याची प्रत आमच्याकडे पाठवावी. त्यासोबत समभागांचे तपशील असलेली संबंधित अनुसूची / जोडपत्र , मूळ समभाग प्रमाणपत्रे प्रेषण होण्यास्तव फॉर्म, सर्व दावेदारांच्या स्वसाक्षांकित पॅनकार्डचीची (PAN) प्रत व रहिवास पुरावा त्यासोबत जोडणे आवश्यक आहे.
Q32 अ व ब यांनी महिन्द्रा अँड महिन्द्रा फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडचे समभाग धारण केले आहेत. दोघेही मृत झाले आहेत. आता ते समभाग मी माझ्या नावाने कसे प्रेषित करून घ्यावेत ?
समभाग आपल्या नावावर प्रेषित होण्यासाठी कृपया मृत संयुक्त धारकांचे उत्तराधिकार प्रमाणपत्र / प्रशासन पत्र आपल्या नावे प्राप्त करावे व समभाग प्रेषित करण्याची प्रक्रिया अवलंबावी.
Q33 मी साक्षांकित / नोंदणीकृत मृत्युपत्र अगोदरच सादर केले आहे. त्याचे प्रमाणन करून घेण्यात खूप वेळ व रक्कम जाणार असल्यामुळे सदर प्रक्रिया टाळणे शक्य आहे काय ?
प्रश्नांकित मृत्युपत्र व इच्छापत्र हे मृताचे शेवटचेच होण्याची खात्री करून घेण्यासाठी ते न्यायालयाने प्राधिकृत / प्रमाणित करणे महत्वाचे आहे. गुंतवणूकदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठीच आणि त्याबाबत भविष्यातील वाद / दावे टाळण्यासाठीच ही सर्व प्रक्रिया आहे.
Q34 प्रथम धारकाने सोयीसाठी म्हणून संयुक्त धारकाचे नाव समाविष्ट केले होते. मीच कायदेशीर वारसदार आहे. मृत्युपत्र / प्रमाणपत्रानुसार आपण माझ्या नावे समभाग हस्तांतरित करू शकता काय ?
कायद्यानुसार संयुक्त धारकाची संयुक्त मिळकतीमध्ये अविभाज्य मालकी गृहीत धरलेली असते व नाव का व कसे समाविष्ट केले, याची खातरजमा कंपनी करू शकत नाही. कंपनीच्या संघ नियमावली नुसार हयात संयुक्त धारकच समभागधारक म्हणून ग्राह्य धरले जातात.
Q35 समभागांचे ठेवप्रतीत रूपांतरण म्हणजे काय व त्याचे काय लाभ आहेत ?
भौतिक स्वरूपातील समभाग प्रमाणपत्राचे त्याच धारणासंख्येसह इलेक्ट्रोनिक स्वरुपात रूपांतरण करणे हे डीमॅट मध्ये सूचित करते. .
माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड प्रगती झाल्यामुळे प्रचंड व अवजड कागदोपत्री कामावर आधारित कंपनीत ठेवलेल्या ठेवींचा दाखल्यावर आधारित प्रणालीला फाटा देऊन डीमॅट प्रणाली स्वीकारण्यात आली.
समभाग प्रमाणपत्रे भौतिक स्वरूपातून डीमॅट स्वरुपात रुपांतरीत केल्यावर त्यामधील अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे कागदविरहित खरेदीविक्रीला चालना कोणत्याही समभाग प्रमाणपत्र किंवा हस्तांतरण विलेखाशिवाय मिळून समभागांचे व्यवहार व हस्तांतरणे इलेक्ट्रोनिक पद्धतीने प्रक्रिया होतात.
डीमॅटमुळे समभाग हस्तांतरण करण्याची वेळखाऊ व गुंतागुंतीची प्रक्रिया टाळून समभाग खरेदीदारांच्या नावाने हस्तांतरितहोतात व चुकीच्या ठिकाणी सोपविल्या जाणे, प्रक्रियेत विलंब, टपालाद्वारे सोपविण्यातील फसवणुकीचे धोके इत्यादी अंतर्निहित समस्या निकालात निघतात.
समभागांचे डीमॅट करणे ऐच्छिक असून गुंतवणूकदार भौतिक स्वरुपात समभाग धारण करू शकतात. मात्र भांडवल बाजाराच्या माध्यमातून समभाग विकायचे असल्यास ते डीमॅट करून घ्यावे लागतील. त्याचप्रमाणे खरेदीदाराने समभाग खरेदी केल्यास त्यांना डीमॅट प्रणालीद्वारे समभाग सोपविले जातील.
संबंधित बाबी व ठेवीप्रत व डीमॅट परीचालन नियामित करण्यासाठी ठेवप्रत अधिनियम १९९६ अमलात आणण्यात आला आहे. राष्ट्रींय प्रतिभूती ठेवप्रत मर्यादित (NSDL) व केंद्रीय ठेविप्रात सेवा मर्यादित (CDSL) अशी दोन ठेवप्रत अभिकरणे कार्यरत आहेत.
Q36 ठेवप्रत प्रणाली कशी प्रचालीत होते ?
ठेवप्रत अभिकरण प्रणालीच्या प्रचालनामध्ये ठेवप्रत संस्था, सहभागी, कंपनी / निबंधक व गुंतवणूकदार सहभागी असतात
राष्ट्रींय प्रतिभूती ठेवप्रत मर्यादित (NSDL) व केंद्रीय ठेवप्रत सेवा मर्यादित (CDSL) ह्या सारख्या ठेवप्रत संस्था केंद्रीय बँके सारखे काम करतात. . जिथेठेवप्रत सहभाग्यांच्या मार्फत गुंतवणूकदारांच्या प्रतिभूती इलेक्ट्रोनिक स्वरुपात धारण केल्या जातात.
ठेवप्रत सहभागी हा ठेवप्रत अभिकरणाचा अभिकर्ता असून असे माध्यम आहे ज्याच्या द्वारे समभाग इलेक्ट्रोनिक स्वरुपात धारण केले जातात. ते गुंतवणूकदारांचे सुद्धा प्रतिनिधी असून ठेवप्रतीद्वारे गुंतवणूकदार व कंपनी / निबंधक यामधील दुवा म्हणून काम करतात.
दोन्ही प्रणालीमध्ये निधी किंवा प्रतिभूती न हाताळता त्यांचे हस्तांतरितहोते. बँक आणि ठेवप्रत हे अनुक्रमे निधी व प्रतिभूती सुरक्षित ठेवण्यासाठी जबाबदार आहेत. कंपनी राष्ट्रींय प्रतिभूती ठेवप्रत मर्यादित (NSDL) व केंद्रीय ठेवप्रतसेवा मर्यादित (CDSL) ह्या सारख्या ठेवप्रत संस्थाशी करार करते व प्रचलनासाठी आवश्यक यंत्रसामग्री / सॉफ्टवेअर स्थापित करते समानता पाहण्यासाठी, ठेवीदार यंत्रणेचे काम बँकिंग प्रणालीसमान असते. बँकेकडून खात्यांमध्ये निधी ठेवला जातो तर ठेवीदार ग्राहकांसाठी खात्यांमध्ये प्रतिभूती धारण करतात. बँकेकडून दोन खात्यांमध्ये निधी हस्तांतरित केला जातो आणि ठेवीदार दोन खात्यात प्रतिभूती हस्तांतरित करतात. दोन्ही यंत्रणेत, निधी किंवा प्रतिभूतींचे हस्तांतरण करताना निधी किंवा प्रतिभूतींची प्रत्यक्ष धारणा केली जात नाही. बँक आणि ठेवीदार दोघेही निधी आणि प्रतिभूती सुरक्षित ठेवण्याचे काम करतात. कंपनी ही एनएसडीएल / सीडीएसएल (ठेवीदार ) सोबत करार करते आणि संचलनासाठी आवश्यक हार्डवेअर/ सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतात.
Q37 मी माझे समभाग डीमॅट कसे करावेत ??
प्रथमतः ठेवप्रत सहभाग्याकडे (DP) आपले खाते उघडून विशिष्ट ग्राहक ओळख क्रमांक प्राप्त करा. त्यानंतर कृपया ठेवप्रत सहभाग्याने विहित केलेला डीमॅट विनंती अर्ज भरून डीमॅट करावयाचे भौतिक स्वरूपातील समभाग प्रमाणपत्रे सादर करा. समभाग व डीमॅट विनंती अर्ज(DRF) प्राप्त झाल्यावर ठेवप्रत सहभागी ठेवप्रत अभिकरणा मार्फत डीमॅटच्या पुष्टीसाठी कंपनी / निबंधकाकडे इलेक्ट्रोनिक विनंती पाठवतील. प्रत्येक विनंती सोबत वैयक्तिक व्यवहार क्रमांक असेल . त्यासोबतच कंपनी / निबंधकाकडे ठेवप्रत सहभागी, डीमॅटची पुष्टी करण्यासाठी समभाग व डीमॅट विनंती अर्ज(DRF) कंपनीला सादर करेल. ठेवप्रत सहभाग्याकडून प्राप्त झालेल्या दस्तऐवजाची खातरजमा केल्यावर कंपनी / निबंधक ठेवप्रत सहभाग्याकडे डीमॅटची पुष्टी करतील. आपले खाते ज्या ठेवप्रत सहभाग्याकडे ठेवले आहे त्यांना सदर पुष्टी सोपविण्यात येईल. पुष्टीची प्राप्ती झाल्यावर ठेवप्रत सहभागी आपले खाते डीमॅट समभागाने जमा करेल. मग ठेवप्रत सहभागी आपल्या वतीने डीमॅट केलेले समभाग धारण करेल व आपण डीमॅट केलेल्या समभागांचे लाभार्थी मालक व्हाल.
Q38 एकदा माझे समभाग डीमॅट केल्यावर ते परत भौतिक स्वरुपात रुपांतरीत करता येतात काय ?
आपण समभाग इलेक्ट्रोनिक स्वरुपात धारण केले असतील तर आपल्या ठेवप्रत सहभाग्याच्या द्वारे पुनर्भौतीकीकरण विनंती अर्ज (RRF) सादर करून आपण ते भौतिक स्वरुपात रुपांतरीत करू शकता. त्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे :
समभागधारकांनी संबंधित ठेवप्रत सहभाग्याकडे रीतसर भरलेला पुनर्भौतीकीकरण विनंती अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
ठेवप्रत सहभागी संबंधित ठेवप्रत अभिकरणाला अशी विनंती झाल्याबाबत कळवेल .
ठेवप्रत सहभागी पुनर्भौतीकीकरण विनंती अर्ज (RRF)कंपनीच्या निबंधक व हस्तांतरण अभिकरणाला सादर करेल.
ठेवप्रत अभिकरण पुनर्भौतीकीकरण विनंती अर्जाबाबत(RRF) कंपनीच्या निबंधक व हस्तांतरण अभिकरणालाकडे(R&TA) पुष्टी करते.
कंपनीचे निबंधक व हस्तांतरण अभिकरण(R&TA) लेखे अद्यायावत करून प्रमाणपत्र(त्रे) छापते व ठेवप्रत अभिकरणाला त्याप्रमाणे कळविते.
असे पुनर्भौतीकीकरण झालेल्या समभागांची नोंद लाभार्थीच्या खात्यातून कमी करून ते खाते अद्ययावत करण्यात येते.
कंपनीचे निबंधक व हस्तांतरण अभिकरण(R&TA) समभागधारकांना समभाग प्रमाणपत्रे पाठविते.
Q39 एखाद्याचे भौतिक स्वरूपातील समभाग डीमॅट स्वरुपात रुपांतरीत करण्यासाठी किती शुल्क भरावे लागते?
ते कंपनी भरेल की मला भरावे लागणार डीमॅटचे शुल्क समभागधारकाला सोसावे लागेल. ठेवप्रत अभिकरणा परत्वे सदर शुल्कात फरक पडू शकतो. त्यामुळे आपण संबंधित अभिकरणाशी संपर्क साधून त्याबाबत तपशील जाणून घ्यावा.
Q40 मी काही समभाग कागदी स्वरुपात खरेदी केले आहेत. सदर समभाग प्रमाणपत्रे माझ्या नावावर डीमॅट करण्यासाठी थेट ठेवप्रत सहभाग्याकडे सुपूर्द करू शकतो काय ?
समभागांचे डीमॅट करण्यापूर्वी ते आपल्या नावावर नोंदविले जाणे आवश्यक आहे. त्यासाठी समभाग हस्तांतरित करण्यासाठी सदर विभागात विवेचन केलेली प्रक्रिया अनुसरावी.
Q41 महिन्द्रा अँड महिन्द्रा फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडच्या समभागांची डीमॅट स्वरूपातच खरेदी विक्री करणे सक्तीचे आहे काय ? भौतिक स्वरुपात ते धारण करण्याचा पर्याय मला उपलब्ध आहे काय ?
होय दिनांक ५ एप्रिल १९९९ पासून समभागांची डीमॅट स्वरूपातच खरेदी विक्री करणे अनिवार्य आहे. मात्र ते भौतिक स्वरुपात धारण करण्याचा पर्याय आपणास उपलब्ध आहे.
Q42 डीमॅट समभागांवर मला लाभांश कसा मिळेल ? माझे समभाग डीमॅट केल्यावर मला वार्षिक अहवाल प्राप्त होईल काय ? वार्षिक सर्वसाधारण सभेला मला उपस्थित राहता येईल काय ?
नोंदणी दिनांकाला इलेक्ट्रोनिक स्वरुपात समभाग धारण केलेल्या डीमॅट खातेधारकांची यादी ठेवप्रत सहभागी कंपन्यांना सादर करतील (ह्या यादीला लाभार्थी यादी असे म्हणतात ) सदर लाभार्थी यादीच्या आधारावर कंपनी डीमॅट खातेधारकांच्या नावे लाभांश प्रदान करेल.
डीमॅट स्वरुपात समभाग धारण करणाऱ्या समभागधारकांचे अधिकार हे भौतिक स्वरुपात समभाग धारण करणाऱ्यांच्या समान दर्जाचेअसतात. त्यामुळे आपण वार्षिक अहवाल प्राप्त करण्यास पात्र आहात व समभागधारक म्हणून आपणास वार्षिक सर्वसाधारण सभेस हजर राहता येईल.
आपले सर्व लाभांश इलेक्ट्रोनिक पद्धतीने जमा करणे आम्हाला शक्य होण्यासाठी आपण राष्ट्रींय इलेक्ट्रोनिक जमा अनुदेश (NECS mandate) आपल्या ठेवप्रत सहभाग्याकडे नोंदविणे आवश्यक आहे.
Q43 डीमॅट खात्यात वादविवाद / अफरातफर होण्याची शक्यता कितपत आहे ? असे झाल्यास मी कोणाशी संपर्क साधावा ?
डीमॅट केलेले समभाग हे कागदविरहित स्वरुपात खरेदी विक्री होत असल्यामुळे स्वाक्षरी न जुळणे, पोस्टानेपाठवताना गहाळ होणे इत्यादी भौतिक स्वरूपातील समभागांच्या बाबतीत असलेले धोके निकालात निघतात.
काही वाद निर्माण झाल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी आपण आपल्या ठेवप्रत सहभाग्याशी संपर्क साधावा
Q44 बँकांकडून निधी / कर्जाची व्यवस्था करण्यासाठी मी माझे डीमॅट स्वरूपातील समभाग त्यांच्याकडे तारण म्हणून ठेऊ शकतो काय ?
होय
Q45 डीमॅट खात्यात नोंदविलेले तपशील बदलण्याची विनंती कंपनी का स्वीकारत नाही ?
ठेवप्रत नियमावली नुसार, संबंधित ठेवप्रत सहभाग्याने सादर केलेला (डीमॅट स्वरूपातील समभाग धारण केलेल्या ) समभागधारकांचा तपशील नोंदीवर घेणे कंपनी / निबंधक व हस्तांतरण अभिकरण (RTA) यांना अनिवार्य आहे. ठेवप्रत अभिकरणाकडून प्राप्त अशा नोंदींमध्ये कंपनी / निबंधक व हस्तांतरण अभिकरण कोणतेही बदल करू शकत नाही.
Q46 प्रमाणपत्रात नमूद नावांचा क्रम लाभार्थी खात्यातील नावांच्या क्रमापेक्षा भिन्न असल्यास भौतिक स्वरूपात संयुक्तरित्या धारण केलेले समभाग डीमॅट स्वरुपात रुपांतरीत करता येतील काय ?
संयुक्त धारकांना प्रतिभूती नावांच्या वेगवेगळ्या क्रमाने डीमॅट करणे शक्य होण्यासाठी ठेवप्रत अभिकरण “ अद्लाबदलाच्या सहित डीमॅट “ सुविधा देऊ केली आहे. त्यासाठी डीमॅट नोंदणी फॉर्म व अदलाबदल फॉर्म ठेवप्रत सहभाग्याकडे सुपूर्द करणे आवश्यक आहे.
Q47 अद्लाबदलाच्या सहित कमी करण्याच्या विनंती साठी कोणते दस्तऐवज सादर करणे आवश्यक आहे ?
डीमॅट खात्यांमध्ये जमा व नावे व्यवहारांची माहिती डीमॅट खातेधारकांना प्राप्त होण्यासाठी राष्ट्रींय प्रतिभूती ठेवप्रत मर्यादित (NSDL) व केंद्रीय ठेवप्रतसेवा मर्यादित (CDSL) यांनी खातेदारांना एस.एम.एसद्वारे सतर्क करण्याची सुविधा सुरु केली आहे. सदर सुविधेनुसार नावे ( हस्तांतरण ) / जमा व्यवहार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांना सतर्क करणारा संदेश प्राप्त होईल. ज्या खातेधारकांनी आपला भ्रमण दूरध्वनी क्रमांक ठेवप्रत सहभाग्याला सादर केला असेल, त्यांनाच सतर्क करणारा संदेश प्राप्त होईल. दिवसाला पाच पेक्षा कमी नावे ISIN व्यवहार असल्यासच त्याबाबत सतर्क करणारा संदेश प्राप्त होईल. दिवसाला पाच पेक्षा जास्त नावे ISIN व्यवहार असल्यास, सदर व्यवहार झाल्याचा सतर्क करणारा संदेश खातेधारकाला प्राप्त होईल व गुंतवणूकदार त्यांच्या ठेवप्रत सहभाग्याकडे त्याबाबतचा तपशील जाणून घेऊ शकतात.
Q48 नामनिर्देशन सुविधा म्हणजे काय आणि ती कोणाला उपयोगी आहे ?
कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम ७२ मधील तरतुदीनुसार नामनिर्देशन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या व्यक्तींनी एकल नावानेच समभाग धारण केले आहेत, त्यांच्यासाठी सदर सुविधा मुख्यत्वे करून उपयुक्त आहे. समभाग संयुक्त स्वरुपात धारण केले असल्यास सर्व धारकांच्या मृत्यूपश्चातच नामनिर्देशन अमलात येऊ शकेल.
Q49 नामनिर्देशित व्यक्तीचे काय अधिकार आहेत व तो ते कसे उपयोगात आणू शकेल ?
कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम ७२ मधील तरतुदीनुसार अन्य सर्व व्यक्तींना वगळून नामनिर्देशित व्यक्तीला मृत समभागधारकाच्या प्रतिभूतीबाबत सर्व अधिकार प्राप्त होतात. समभागधारक मृत झाल्यास समभागधरकाचे सर्व अधिकार नामनिर्देशित व्यक्तीकडे हस्तांतरितहोतील. संयुक्त धारण असल्यास सर्व संयुक्त धारक मृत झाल्यावरच त्यांचे सर्व अधिकार नामनिर्देशित व्यक्तीकडे अंतरित होतील. जसे लागू असेल त्यानुसार , नामनिर्देशन करणाऱ्या व्यक्ती मृत झाल्यास त्याच्या मृत्यू प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत सादर करून नामनिर्देशित व्यक्तीने कंपनी किंवा निबंधक व हस्तांतरण अभिकरण (RTA)किंवा ठेवप्रत सहभागी (DP)यांना नामनिर्देशन करणाऱ्या व्यक्तीची मृत्यू वार्ता कळविली पाहिजे.
Q50 नामनिर्देशन कोण करू शकते व कोणाला नामनिर्देशित म्हणून नेमता येते ?
एकल किंवा संयुक्त नावाने समभाग / कर्जरोखे धारण करणारे व्यक्तिगत समभागधारक नामनिर्देशित व्यक्तीची नेमणूक करू शकतात. संयुक्त धारणाच्या बाबतीत संयुक्त धारकांनी मिळून नामनिर्देशित व्यक्ती नेमायची आहे. करार करण्यास सक्षम व्यक्तीलाच नामनिर्देशित व्यक्ती म्हणून नेमता येते. कायदेशीर पालक असल्यास अज्ञान व्यक्तीस सुद्धा नामनिर्देशित व्यक्ती म्हणन नेमता येते.
Q51 मी धारण केलेल्या समभागांसाठी मी नामनिर्देशन कसे करावे ?
डीमॅट स्वरुपात धारण केलेल्या समभागांसाठी नामनिर्देशन करण्यासाठी रीतसर भरलेला व स्वाक्षरी केलेला नामनिर्देशन अर्ज नमुना ( फॉर्म एसएच -१३ ) दोन प्रतींमध्ये सादर करावा. जर आपण अन्य धारकांसोबत समभाग धारण करीत असाल, तर सर्व धारकांनी नामनिर्देशन फॉर्मवर स्वाक्षऱ्या करणे आवश्यक आहे.
नामनिर्देशन फॉर्म डाउनलोड करण्यासाठी संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
भौतिक स्वरुपात धारण केलेल्या समभागांच्या बाबतीत नामनिर्देशन अर्ज कंपनी किंवा निबंधक व हस्तांतरण अभिकरणाकडे (RTA) पाठविणे आवश्यक आहे. कंपनी किंवा निबंधक व हस्तांतरण अभिकरणाकडे अर्ज प्राप्त झाल्यावर व तो योग्य पद्धतीने भरलेला असल्यास सदर नामनिर्देषनाला नोंदणी क्रमांक देण्यात येईल. त्यानंतर आपण सादर केलेल्या नामनिर्देशन अर्जाच्या दुसऱ्या प्रतीवर नोंदणी क्रमांक व दिनांक दर्शवून सदर प्रत आपणास परत करण्यात येईल.
डीमॅट केलेल्या समभागांच्या बाबतीत आपले नामनिर्देशन ठेवप्रत सहभाग्याकडे नोंदविणे आवश्यक आहे.
फोलिओसाठी एकापेक्षा अधिक नामनिर्देशने करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
Q52 नामनिर्देशन अर्जासोबत समभाग प्रमाणपत्रे पाठविणे आवश्यक आहे काय ?
नामनिर्देशन अर्जासोबत समभाग प्रमाणपत्रे पाठविणे आवश्यक नाही
Q53 मी संयुक्त स्वरुपात समभाग धारण केले आहेत. संयुक्त धारक हे समभागांचे नामनिर्देशित व्यक्ती असतात काय ?
संयुक्त धारक हे कधीही नामनिर्देशित व्यक्ती असत नाहीत. ते संबंधित समभागांचे संयुक्त धारक असतात. संयुक्त धारकांपैकी एकाचा मृत्यू झाल्यास कंपनी हयात समभागधारकालाच कंपनी समभागधारक म्हणून मान्यता देते.
Q54 एकदा केलेले नामनिर्देशन बदलता येते काय ?
पुनश्च नामनिर्देशन करून आधी केलेले नामनिर्देशन रद्द करता येते. जर संयुक्त धारकांनी नामनिर्देशन केले असेल आणि संयुक्त धारक मृत झाल्यास हयात संयुक्त धारक नव्याने नामनिर्देशन करून आधी केलेले नामनिर्देशन रद्द करू शकतात.
Q55 नामनिर्देशन साक्षांकित करणे आवश्यक आहे काय ?
होय, नामनिर्देशन साक्षांकित करणे आवश्यक आहे
Q56 समभागधारक मृत झाल्यास नामनिर्देशित व्यक्तीची कायदेशीर स्थिती काय असते ?
एकल समभागधारणा असल्यास त्या समभागधारकाच्या मृत्यूनंतर अन्य सर्व कायदेशीर वारसदार / लाभार्थींना वगळून नामनिर्देशित व्यक्तीच्याच नावाने समभागांचे हस्तांतरणहोऊ शकते . दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, वैध नामनिर्देशन असल्यास कंपनी अन्य कोणत्याही कायदेशीर वारसदार / लाभार्थींच्या दाव्यांचा विचार न करता नामनिर्देशित व्यक्तीच्या नावाने समभाग प्रेषित करेल.
संयुक्त धारकांनी नामनिर्देशन केले असल्यास, सदर संयुक्त धारकांच्या मृत्युपश्चातच ते अमलात येईल. त्यामुळे संयुक्त समभागधारकांपैकी एक मृत झाल्यास नामनिर्देशित व्यक्तीला वगळून सर्व समभाग हयात समभागधारकाच्या नावाने होतील. अशा परिस्थितीत हयात समभागधारक हे त्यांची इच्छा असल्यास नव्याने नामनिर्देशन करू शकतात.
Q57 नामनिर्देशित व्यक्तीच्या नावे समभाग होण्यासाठी काय प्रक्रिया आहे ?
जर समभाग भौतिक स्वरुपात धारण केले असतील तर समभागधारकाचे निधन झाल्यावर नामनिर्देशित व्यक्तीला तिच्या नावाने समभाग हस्तांतरित करून घ्यावयाचा अधिकार प्राप्त होतो. त्यासाठी मूळ समभाग प्रमाणपत्र व मृत समभागधारकाच्या मृत्यू प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत यासह त्याने / तिने लेखी स्वरुपात सूचना देणे आवश्यक आहे.
नामनिर्देशित व्यक्तीने त्याच्या / तिच्या नवे समभाग नोंदणी करण्याचा पर्याय निवडल्यास त्याने / तिने प्रेषण अर्जासोबत, पॅनकार्डचीव व रहिवासी पुरावा जसे पारपत्राची प्रत , मतदार ओळखपत्र, वाहन चालविण्याचा परवाना किंवा अन्य रहिवास पुरावा सादर करणे आवश्यक आहे.
नामनिर्देशित व्यक्तीने सादर केलेल्या दस्तएवजाची छाननी केल्यावर समभाग त्याच्या / तिच्या नावे प्रेषित होऊन समभाग प्रमाणपत्रे रीतसर पृष्ठांकन करून त्याला / तिला परत करण्यात येतील.
समभाग डीमॅट स्वरुपात धारण केले असल्यास आपल्या ठेवप्रत सहभाग्याशी संपर्क साधावा.
Q58 माझ्याकडे डीमॅट स्वरुपातील समभाग आहेत. त्याबाबत नामनिर्देशन करण्यासाठी मी नामनिर्देशन अर्ज कंपनीकडे पाठवू शकतो काय ?
डीमॅट स्वरुपातील समभागांच्या नामनिर्देशनासाठी आपण आपल्या ठेवप्रत सहभाग्याशी संपर्क करावा.
Q59 माझी समभाग प्रमाणपत्रे हरवली / गहाळ झाली आहेत, त्या बदल्यात दुसरी प्रमाणपत्रे प्राप्त करण्यासाठी मी कोणती पाउले उचलावीत ?
समभाग प्रमाणपत्रे गहाळ झाल्याबाबत आमचे निबंधक व समभाग हस्तांतरण अभिकरण म्हणजेच कार्वी कम्प्युटरशेयर प्रायव्हेट लिमिटेड (कार्वी ) यांना कळवावे. स्थानिक पोलीस ठाण्यात ह्याबाबत तक्रार नोंदविणे योग्य. सदर दाखल तक्रारीची / प्रथम माहिती(FIR) खबरीची प्रत पुढील कार्यवाहीसाठी कार्वीकडे पाठवून द्यावी. त्यामध्ये खालील बाबी नमूद कराव्यात :
त्यामध्ये खालील बाबी नमूद कराव्यात
जर गहाळ प्रमाणपत्रांची विशिष्ट संख्या आपणास माहित नसेल, तर आपल्या ताब्यात असलेल्या अन्य प्रमाणपत्रांचे विशिष्ट संख्या द्यावी.. तसेच प्रमाणपत्र चोरी झाली आहेत की गहाळ झाली आहे हे सुद्धा नमूद करावे. जर प्रमाणपत्रांची चोरी झाली असेल, तर आम्हाला प्रथम माहिती खबरीची (FIR) पोलिसांनी जारी केलेली प्रत आवश्यक राहील. गहाळ / चोरी झालेल्या प्रमाणपत्रांची माहिती आपण कंपनी / निबंधक व समभाग हस्तांतरण अभिकरण(RTA) यांना सुद्धा कळवावी. समभागाची दुसरी प्रत प्राप्त करण्यासाठी आवश्यक दस्तऐवज आम्ही आपणास पाठवून देऊ.
गहाळ झालेल्या समभाग प्रमाणपत्रांचे हस्तांतरण न होण्यासाठी आम्ही त्वरित आपल्या फोलिओवर खबरदारी बाळगण्याचा शेरा मारु.
प्रमाणपत्रे गहाळ झाल्याची माहिती प्राप्त झाल्यावर प्रमाणपत्राची दुसरी प्रत प्राप्त करण्यासाठी आवश्यक औपचारिकता पूर्ण करण्यासाठी आम्ही आपणास परत कळवू.
Q60 मी रीतसर निष्पादित केलेल्या हस्तांतरण विलेखासह समभाग प्रमाणपत्रे माझ्याकडून गहाळ झाली आहेत. प्रमाणपत्राची दुसरी प्रत प्राप्त करण्यासाठी मी काय करावे ?
आपण विक्रेत्याशी संपर्क साधावा म्हणजे ते त्याप्रमाणे कंपनी / निबंधक व समभाग हस्तांतरण अभिकरण(RTA) यांना कळवतील व समभाग प्रमाणपत्राच्या दुसऱ्या प्रती प्राप्त करण्यासाठी अर्ज करतील. ते प्राप्त झाल्यावर एसएच -४(SH-4) नमुन्यात नवीन हस्तांतरण विलेख निष्पादित करून आपण समभाग हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.
Q62 गहाळ झाल्याचे कंपनीला कळवलेले मूळ प्रमाणपत्र मला परत प्राप्त झाल्यास मी काय कार्यवाही करावी ?
समभाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत प्राप्त झाली असल्यास कृपया मूळ प्रमाणपत्र कार्वीकडे सुपूर्द करावे. मात्र प्रमाणपत्राची दुसरी प्रत प्राप्त करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या आधी आपणास मूळ समभाग प्रमाणपत्र मिळाल्यास आपण त्याप्रमाणे कार्वीला कळवावे, जेणेकरून आपल्या फोलिओवरून खबरदारीचा शेरा काढता येईल.
Q62 माझ्या पत्त्यात बदल झाल्यास त्याची नोंदणी कंपनीकडे करण्यासाठी काय प्रक्रिया आहे ?
एकल / संयुक्त धारकांनी रीतसर स्वाक्षरी केलेले नवीन पत्ता व फोलिओसंख्या नमूद करणारे पत्र कार्वीला पाठवणे आवश्यक आहे. प्रथम धारकाची स्वाक्षरी ही कार्वीकडे नोंदविलेल्या नमुना स्वक्षरीशी जुळण्याची खबरदारी घेणे आवशयक आहे.
आमच्या नोंदिवरील आपला पत्ता अद्ययावत केल्यावर त्याची पुष्टी करणारे संगणकीकृत पावती आपल्या नव्या पत्त्यावर पाठविण्यात येईल.
आपणाकडे डीमॅट स्वरूपातील धारणा असल्यास आपण आपल्या ठेवप्रत सहभाग्याला त्वरित कळवावे व आपला नवीन पत्ता नोंदविला असल्याची पुष्टी त्यांच्याकडून प्राप्त करण्याची खबरदारी घ्यावी.
Q63 एका फोलिओसाठी अनेक पत्ते असू शकतील काय ?
नाही एका फोलिओसाठी फक्त एकच पत्ता असेल
Q65 समभाग डीमॅट केलेले असल्यास पत्त्यातील बदलासाठी काय प्रक्रिया आहे ?
आपल्या डीमॅट केलेल्या समभागांच्या नोंदी ठेवप्रत सहभाग्याकडे असल्यामुळे , आपण बदललेल्या पत्त्याची नोंद करण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधावा.
Q65 मला लाभांश प्राप्त झालेला नाही. मी काय कार्यवाही करावी ?
जो लाभांश प्राप्त झालेला नाही, त्याचा तपशील आपण कार्वीकडे कळवावा. (डीमॅट समभागांच्या बाबतीत ) आपला फोलिओ क्रमांक / ग्राहक ओळख क्रमांक नमूद करावा. कंपनीच्या नोंदींची तपासणी केली जाईल व त्याप्रमाणे लाभांश दिलेले नसल्यासलाभांश अधिपत्र जारी करण्यात येईल.
Q66 लाभांश अधिपत्राची दुसरी प्रत प्राप्त करण्यासाठी काय प्रक्रिया आहे ?
मूळ अधिपत्राच्या वैधतेच्या कालावधीत अधिपत्राची दुसरी प्रत जारी करता येत नाही. त्यामुळे गहाळ लाभांश अधिपत्राची वैधता अद्याप समाप्त झाली नसल्यास ती समाप्त होईपर्यंत आपणास थांबावे लागेल. मात्र एकदा वैधता कालावधी समाप्त झाल्यावर आमच्या बँक खात्याच्या विवरणात लाभांश अधिपात्र अद्याप दिलेले नसल्याचेदर्शविलेले असल्यास आपल्याकडून आश्वासनपत्र प्राप्त झाल्यावर आम्ही आपणास लाभांश अधिपत्राची दुसरी प्रत जारी करण्याची व्यवस्था करू. आश्वासनपत्र नमुना कंपनीच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येईल.
Q67 मूळ अधिपत्राचा वैधता कालावधी समाप्त होईपर्यंत समभाग धारकांना का थांबावे लागते ? मूळ अधिपत्राचे प्रदान थांबविण्याची सूचना बँकेला देऊन दुसरी प्रत जारी करणे आपणास शक्य नाही काय ?
लाभांश अधिपत्रे ही लाभांश प्रदान करणाऱ्या बँकेच्या देशभरातील सर्व शाखांमधून सममूल्य तत्वावर देय असल्यामुळे सदर अधिपत्राचे प्रदान थांबविण्याची सूचना बँकेला करणे व्यवहार्य नाही. त्यामुळे मूळ अधिपत्राचा वैधता कालावधी समाप्त होईपर्यंत थांबणे आपणास आवश्यक आहे. अधिपत्र समभागधारकाच्या नावानेच जारी करण्यात येते, जेणेकरून त्याचे फसवणुकीद्वारे रोखीकरण होणे जवळपास अशक्य असते.
Q68 मागील वर्षांचे जे जुने घोषित केलेले लाभांश मला प्राप्त झालेले नाहीत, त्यावर मी दावा करू शकतो काय ?
न दिलेला किंवा हक्क न सांगितलेला राहील, , तो गुंतवणूकदार प्रशिक्षण व संरक्षण निधीत (IEPF) हस्तांतरितकरणे आवश्यक असते. हक्क न सांगितलेलालाभांश जास्तीतजास्त प्रदान केला जाण्याची खबरदारी घेण्यासाठी कंपनी गुंतवणूकदारांना सतत स्मरणपत्रे पाठवत असते. कोणताही प्रतिसाद न मिळाल्यावर विहित कालावधीने सदर न दिलेला लाभांश गुंतवणूकदार प्रशिक्षण व संरक्षण निधीत (IEPF) अंतरित करण्यात येतो.
सन २००८-०९ पर्यंतचा अदत्त / हक्क न सांगितलेलालाभांश केंद्र सरकारच्या सर्वसामान्य राजस्व खात्यात हस्तांतरित करण्यात आला आहे. सदर कालावधीसाठी ज्या सभासदांनी लाभांश दावित केलेला नाही त्यांनी गुंतवणूकदार प्रशिक्षण व संरक्षण निधीच्या (IEPF) प्राधिकार्यांच्या कडे दावा सादर करावा
कंपनी अधिनियम २०१३ मधील कलम १२४ नुसार ज्या समभागांवरील लाभांश सात किंवा जास्त वर्षांच्या कालावधीसाठी सतत अदावित आहे, असा लाभांश कंपनीने गुंतवणूकदार प्रशिक्षण व संरक्षण निधीत (IEPF) अंतरित करणे आवश्यक आहे. तसेच ज्या समभागधारकांच्या रकमा व समभाग वरीलप्रमाणे गुंतवणूकदार प्रशिक्षण व संरक्षण निधीत (IEPF) अंतरित होतील त्यांनी कंपनी अधिनियम २०१३ नुसार विहित प्रक्रिया पूर्ण केल्यास त्यांना गुंतवणूकदार प्रशिक्षण व संरक्षण निधीतून (IEPF) लाभांशाचा परतावा व समभाग अंतरित करण्याचा दावा सादर करण्याचा अधिकार असेल.
Q69 गुंतवणूकदार प्रशिक्षण व संरक्षण निधीत (IEPF) अंतरित न झालेले दावा न केलेलेलाभांश कुठे पहायला मिळेल ?
कंपनीकडे पडून असलेल्या न दिलेला व अदावित लाभांश रकमांचे तपशील कंपनीने दिनांक २२ ऑगस्ट २०१६ रोजी संकेतस्थळावर "(www.mahindrafinance.com)अपलोड केले आहेत, ज्याद्वारे समभागधारक पाहू शकतो.
Q70 फसवणूक करून रोखीकरणापासून संरक्षण प्राप्त होण्यासाठी माझ्या लाभांश अधिपत्रात माझ्या बँक खात्याचा तपशील समाविष्ट व्हावा अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी काय प्रक्रिया आहे ?
जर आपले समभाग भौतिक स्वरुपात धारण केले असतील, तर आमच्या संकेतस्थळावरून राष्ट्रीय इलेक्ट्रोनिक निकासी सेवेचा (NECS) फॉर्म डाउनलोड करून तो पूर्णपणे भरून सर्व तपशील व रद्द केलेल्या धनादेशाच्या प्रतीसह कार्वी कडे सादर करण्यात यावा. जेणेकरून तो सर्व तपशील भविष्यातील लाभांश प्रदानामध्ये समाविष्ट करता येईल.
मात्र आपण डीमॅट स्वरुपात समभाग धारण केले असतील तर सदर तपशील आपले डीमॅट खाते असणाऱ्या ठेवप्रत सहभाग्याकडे कळवावा.
Q71 राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक निकासी सेवा (NECS) म्हणजे काय ?
सदर प्रणालीनुसार आपण ठेवप्रत सहभाग्याकडे / कंपनीकडे / निबंधक व हस्तांतरण अभिकरण(RTA) यांच्याकडे नोंदविलेल्या बँक खात्यावर आपला लाभांश थेट जमा करून घेऊ शकता. त्यामुळे भौतिक स्वरूपातील लाभांश अधिपत्राच्या तुलनेत आपल्या खात्यात थेट जमा होणे सुलभ ठरते.
Q72 मी राष्ट्रीय इलेक्ट्रोनिक निकासी सेवेचा (NECS) लाभ कसा घेऊ शकतो ?
जर आपले समभाग भौतिक स्वरुपात धारण केले असतील, तर आमच्या संकेतस्थळावरून राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक निकासी सेवेचा (NECS) फॉर्म डाउनलोड करून तो पूर्णपणे भरून सर्व तपशील व रद्द केलेल्या धनादेशाच्या प्रतीसह कार्वी कडे सादर करण्यात यावा. जेणेकरून भविष्यातील सर्व लाभांश आपल्या बँक खात्यात थेट जमा करता येईल.
मात्र आपण डीमॅट स्वरुपात समभाग धारण केले असतील तर राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिकनिकासी सेवेचा (NECS) तपशील अद्ययावत करण्यासाठी आपले डीमॅट खाते असणाऱ्या ठेवप्रत सहभाग्याकडे कळवावा
Q73 राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिकनिकासी सेवेची (NECS) सुविधा संपूर्ण देशात उपलब्ध आहे काय ?
Q74 पर्यावरण पूरक उपक्रम म्हणजे काय ? त्यासाठी मी कुठे नोंदणी करू शकतो.
भारत सरकारच्या पर्यावरणपूरक उपक्रमानुसार कागदाचा किमान वापर व्हावा जेणेकरून पर्यावरण रक्षणासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो.
त्यास्तव कंपनी व्यवहार मंत्रालयाने त्यांच्या दिनांक २१.०४.२०११ रोजीच्या परिपत्रक क्रमांक १७ /२०११ व दिनांक २९.४.२०११ रोजीच्या परिपत्रक क्रमांक १८ /२०११ नुसार “निगमीय प्रशासनात पर्यावरणपूरक उपक्रम “ सुरु केला असून कंपन्यांना वार्षिक अहवाल व अन्य दस्तऐवज इलेक्ट्रॉनिकपद्धतीने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची परवानगी दिली आहे
पर्यावरणपूरक उपक्रमासाठी नोंदणी करून प्रत्येक समभागधारकाला ह्या उदात्त उपक्रमात भाग घेऊन पुढील पिढ्यांसाठी पर्यावरण रक्षणाचे पुण्यकर्म मिळवण्याची संधी आहे. तसेच ज्यांनी पर्यावरणपूरक उपक्रमासाठी नोंदणी केली आहे , त्यांना संचालक मंडळाची सभा, तिमाही आर्थिक कामगिरी इत्यादीची माहिती कंपनी वेळोवेळी आपल्या समभागधारकांना इ- संपर्काद्वारे पाठवत असते.
Q75 इ-संपर्कासाठी मी कोठे नोंदणी करावी ?
इ- संपर्कासाठी नोंदणी करण्यासाठी आपल्याकडे इ-मेल पत्ता असणे गरजेचे आहे. आपण भौतिक स्वरुपात समभाग धारण केले असल्यास समभागधारक माहिती अद्ययावतीकरण फॉर्म भरून आपण कार्वीला किंवा कंपनीला कळवू शकता.
डीमॅट स्वरुपात समभाग धारण केले असल्यास आपल्या ठेवप्रत सहभाग्याकडे ते अद्ययावत करावे.
Q76 समभागधारकांच्या नावातील बदल नोंदविण्यासाठी काय प्रक्रिया आहे ?
भौतिक स्वरुपात समभाग धारण करणाऱ्या समभागधारकांनी कंपनीच्या निबंधक व हस्तांतरण अभिकरण (R&TA)म्हणजेच कार्वीला समभाग प्रमाणपत्रावरील व कंपनीच्या नोंदीतील नावात बदल करण्यासाठी विनंती करावी. त्यास्तव मूळ समभाग प्रमाणपत्रे, शपथपत्र, ( वैवाहिक स्थितीत बदल झाल्यामुळे होणाऱ्या नाव बदलासाठी ) विवाह प्रमाणपत्राच्या रीतसर साक्षांकित केलेल्या प्रती, न्यायालयाचा आदेश इत्यादी दस्तऐवज कार्वी कडे सादर करावा. सदर दस्तऐवजांची खातरजमा केल्यावर कार्वी नावात बदल करून समभाग प्रमाणपत्रे समभागधारकांना नवीन नावाने जारी करून पाठवून देईल
Q77 सन २०१३ मध्ये कंपनीने रु १० दर्शनी मूल्य असलेले समभाग रु २ च्या दर्शनी मूल्यामध्ये रुपांतरीत केले. मी मात्र अजूनही रु १० दर्शनी मूल्य असलेली समभाग प्रमाणपत्रेच बाळगतो आहे . मला रु २ दर्शनीमूल्याची समभाग प्रमाणपत्रे कशी मिळतील ?
नोंदणीकृत समभागधारकांनी स्वाक्षरीत केलेल्या विनंती पत्रासह जुनी समभाग प्रमाणपत्रे कार्वीकडे अग्रेषित करावीत.
Q78 आमचे समभाग संयुक्त नावाने आहेत आणि आम्हाला नावांचा अनुक्रम बदलायचा आहे.
कार्वीकडे नोंदविलेल्या नमुना स्वाक्षरीनुसार सर्व नोंदणीकृत समभागधारकांनी रीतसर स्वाक्षरीत केलेल्या विनंती पत्रासह समभाग प्रमाणपत्रे कार्वीकडे अग्रेषित करावीत
Q79 माझा स्थायी खाते क्रमांक (PAN) मी का नोंदवावा ?
स्थायी खाते क्रमांकाची (PAN) मी नोंदणी केल्यास गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करता येईल. समभागधारकांच्या विविध विनंत्यांची सत्यता पडताळण्यासाठी स्थायी खाते क्रमांक हा अनन्य तपासणी बिंदू आहे.
जर समभाग डीमॅट स्वरुपात धारण केले असतील तर डीमॅट खाते उघडून ते प्रचलीत करण्यासाठी स्थायी खाते क्रमांक (PAN) अनिवार्य आहे.
Q80 लाभांश व समभाग विक्री संदर्भात करसंबंधित काय तरतुदी आहेत ?
लाभांश व समभाग विक्री संदर्भात करसंबंधित तरतुदी समभागधारकांच्या माहितीसाठी थोडक्यात खाली दिल्या आहेत
समभाग खरेदी केल्याच्या दिनांकापासून १२ महिन्यांच्या कालावधी नंतर अधिकृत भांडवली बाजारात विक्री केल्यास व प्रतिभूती व्यवहार कर भरणा (STT)केला असल्यास कोणताही दीर्घ मुदती भांडवली लाभ कर (LTCG) देय असणार नाही.
मात्र अन्य बाबतीत खालील पैकी जे कमी असेल तो दीर्घ मुदती भांडवली लाभ कर देय असेल :
वाहन कर्जासाठी अर्ज करण्यासाठी
"MFLOAN" असा ५६३६३ वर लघुसंदेश पाठवा
छोट्या व मध्यम उद्योग कर्जासाठी अर्ज करायचा असल्यास
"MFSME" असा ५६३६३ वर लघुसंदेश पाठवा
मुदत ठेवींसाठी अर्ज करण्यासाठी
"MFFD" असा ५६३६३ वर लघुसंदेश पाठवा
Locate Now
Email: [email protected]
Toll free number: 1800 233 1234 (सोमवार-रविवार, सकाळी 8 ते रात्री 10)
(Except National Holidays)
WhatsApp number: 7066331234
इथे क्लिक करा सर्वात जवळील महिन्द्रा फायनान्स शाखा शोधण्यासाठी
© महिन्द्रा फायनान्स
द्वारा डिझाइन आणि विकसित इव्होल्यूशनको
For Android Phone
For iPhone
EMI Amount 2000
For illustration purpose only
Total Amount Payable
50000
This document has been prepared on the basis of publicly available information, internally developed data and other sources believed to be reliable. Mahindra & Mahindra Financial Services Ltd, ('MMFSL') does not warrant its completeness and accuracy. Whilst we are not soliciting any action based upon this information, all care has been taken to ensure that the facts are accurate and opinions given are fair and reasonable. This information is not intended as an offer or solicitation for the purchase or sale of any financial instrument receipt of this information should rely on their own investigations and take their own professional advice. Neither MMFSL nor any of its employees shall be liable for any direct, indirect, special, incidental, consequential, punitive or exemplary damages, including lost profits arising in any way from the information contained in this material.
MMFSL and its affiliates, officers, directors, and employees, including people involved in the preparation or issuance of this material, may vary from time to time, have long or short positions in, and buy or sell the securities thereof, of the company mentioned herein. MMFSL may at any time solicit or provide, credit, advisory or other services to the issuer of any security referred to herein. Accordingly, information may be available to MMFSL, which is not reflected in this material, and MMFSL may have acted upon or used the information prim to, or immediately following its publication.
Your form has been submitted successfully. Our representative will get in touch with you shortly.